मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

85 अल - बुरुज

 85 अल - बुरुज  आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  1 नक्षत्रांचे वेगवेगळे समूह असलेल्या त्या आकाशाची शपथ. 2 वचन दिलेल्या (त्या पुनरुत्थानाच्या) दिवसाची शपथ. 3 साक्ष देणाऱ्याची आणि ज्याच्याविषयी साक्ष दिली जाते त्याची शपथ. 4 नाश पावले खंदकवाले. 5 जो (खंदक) इंधनाने भडकविलेल्या आगीने भरलेला होता. 6 ते त्याच्यापाशी बसलेले होते. 7 श्रद्धावंतांबरोबर जे (अत्याचार) केले जात होते, ते पाहण्यासाठी (तिथे बसलेले होते). 8 त्यांच्याशी त्यांचे शत्रुत्व केवळ यासाठी होते की, त्यांनी अल्लाहवर श्रद्धा धारण केली, जो सर्वशक्तिमान आहे, सर्व प्रकारच्या स्तुतीस पात्र आहे. 9 त्याचीच सत्ता आहे आकाशात आणि पृथ्वीवर आणि तो प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून आहे. 10 जे लोक श्रद्धावंत पुरुष व श्रद्धावंत स्त्रिया यांचा छळ करतात. आणि त्याबद्दल त्यांनी पश्चात्ताप केला नाही तर अशांना निश्चितपणे नरकात (विविध) शिक्षा भोगाव्या लागतील. (शिवाय) त्यांना जळण्याची शिक्षाही भोगावी लागेल. 11 पण जे लोक श्रद्धा धारण करून सत्कर्मे करतात, त्यांना मोबदल्यात अशा बागा प्रदान केले जातील, ज्यातून पाण्याचे (नयनरम्य...

84 अल - इनशिकाक

 84 अल - इनशिकाक आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  1 जेव्हा आकाश फाटून जाईल. 2 आणि तो आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाचे पालन करेल, जे त्याचे कर्तव्य आहे. 3 आणि जमिनीला पसरवून अगदी सपाट प्रदेश बनविण्यात येईल. 4 तिच्यामध्ये जे काही आहे, ते सर्व बाहेर टाकून ती रिकामी होऊन जाईल. 5 ती आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाचे पालन करील, जे तिचे कर्तव्य आहे. 6 हे मानवा ! आपल्या पालनकर्त्याकडे जाण्याचा तुझा परिश्रमपूर्वक प्रवास सुरु आहे, फार खडतर (प्रवास). आणि त्याला तू भेटणार आहेस. 7 तेव्हा ज्याची कर्मवही त्याच्या उजव्या हातात दिली जाईल. 8 त्याचा हिशेब लगेच सहजपणे आटोपला जाईल. 9 आणि तो आपल्या लोकांकडे आनंदाने परत येईल. 10 आणि ज्याची कर्मवही त्याच्या पाठीच्या मागून देण्यात येईल. 11 तो, त्याला कायमस्वरूपी संपवून टाकण्यासाठी विनवणी करील. 12 आणि तो धगधगत्या आगीत प्रवेश करेल. 13 तो आपल्या लोकांमधे खुशाल ( व निश्चित ) राहत होता. 14 आपल्याला (एके दिवशी अल्लाहकडे) परत जावे लागेल असे त्याला कधीही वाटत नव्हते. 15 अर्थातच ! (त्याला परत यावे लागणारच होते) त्याचा पालनकर्ता नेहमी त्याच्यावर...

83 अल - मुतफफिफिन

83 अल - मुतफफिफिन   *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  1 नाश पावणार आहेत ते, जे कमी माप देतात. 2 जे स्वतःसाठी घेताना पुरेपूर माप घेतात. 3 पण इतरांना मापून किंवा वजन करून देतांना कमी देतात. 4 अशा लोकांना या गोष्टीची जाणीव नाही का की, त्यांना उठवून उभे केले जाणार आहे? 5 (जाब देण्यासाठी) एका भयंकर दिवशी. 6 ज्या दिवशी संपूर्ण मानवजात, सर्वांचा मालक असलेल्या (अल्लाहसमोर) उभी राहील? 7 खरोखर, दुष्ट लोकांच्या कृत्यांचा रेकॉर्ड सिज्जीनमध्ये असेल. 8 आणि तुम्हाला काय माहीत, 'सिज्जीन ' काय आहे? 9 ते लिहून ठेवलेले महारेकॉर्ड आहे. 10 सत्य नाकारणारे नाश पावणार आहेत, त्या दिवशी. 11 जे न्यायाच्या दिवसाला खोटे ठरवितात. 12 त्यास तोच ठरवितो जो मर्यादांचे उल्लंघन करणारा पापी आहे. 13 जेव्हा त्याला आमचे संदेश ऐकविले जातात, तेव्हा तो म्हणतो, 'या केवळ आधीच्या लोकांच्या कहाण्या आहेत.' 14 नव्हे ! वस्तुस्थिती ही आहे की, त्यांच्या दुष्कृत्यांचा, त्यांच्या हृदयावर गंज चढलेला आहे. 15 निश्चितपणे ! त्या दिवशी त्यांना त्यांच्या पालनकर्त्यापासून दूर ठेवले जाईल (ते पालनकर्त्याला पाहू श...

82 अल -इनफितार(The Shattering)

82 अल -इनफितार (The Shattering) *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  1 जेव्हा आकाश फाटून जाईल.  2 आणि जेव्हा तारे विखुरुन जातील. 3 आणि जेव्हा (महाभयानक सुनामीप्रमाणे) समुद्र वाहू लागतील. 4 आणि जेव्हा कबरी उघडल्या जातील. 5 प्रत्येकाला कळून येईल की, त्याने (स्वतःसाठी) पुढे काय पाठविले आहे. आणि मागे काय सोडले आहे. 6  हे मानवा ! आपल्या कृपावंत पालनकर्त्याविषयी तुझी कोणत्या गोष्टीने फसवणूक केली आहे? 7 ज्याने तुला निर्माण केले, मग तुझ्या शरीरातील अवयवांची संतुलित अशी रचना करून तुला घडविले.  8 ज्या रूपात इच्छिले तसे तुला रूप दिले. 9 तरीही (लोकांनो!) तुम्ही न्यायाच्या दिवसाला खोटे समजता! 10 पण सत्य हे आहे की, तुमच्यावर पहारेकरी नियुक्त आहेत (जे न्यायाच्या दिवशी तुमच्याविषयी साक्ष देतील). 11 ते (खरोखर) सन्मानास पात्र आहेत, ते (तुमच्या प्रत्येक कृत्याची काळजीपूर्वक ) नोंद करीत आहेत. 12 तुम्ही जे काही करता, ते सर्व जाणतात. 13 निःसंदेह, सदाचारी लोक सर्वसुखसंपन्न (अशा स्वर्गात) असतील. 14 तर याउलट दुराचारी लोक नरकात असतील. 15 न्यायाच्या दिवशी त्यात प्रवेश करतील. ...

लुकमान यांचा सत्य वृत्तांत....

लुकमान यांचा सत्य वृत्तांत.... *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  12 आम्ही लुकमान यास विवेक प्रदान केले होते. व त्यास असे सांगितले होते की, अल्लाहप्रति नेहमी कृतज्ञ राहा. जो कोणी (अल्लाहप्रति) कृतज्ञ राहील तर त्यात त्याचेच भले आहे. तसेच जो कोणी कृतघ्नतेचे प्रदर्शन करील तर अल्लाह स्वयंपूर्ण आहे (त्याला भक्तांच्या आभाराची गरज नाही), तोच आहे सदा स्तुतीस पात्र ! 13 लुकमान (जो एक विवेकशील माणूस होता एकदा) आपल्या मुलास उपदेश करताना म्हणाला, 'हे माझ्या मुलं ! कोणालाही (कधीही) अल्लाहचे समकक्ष ठरवू नकोस. कारण कोणालाही अल्लाहच्या ईश्वरत्वामध्ये सहभागी ठरविणे, फार मोठे अत्याचारी कृत्य आहे.'  14 (अल्लाह म्हणतो) 'आम्ही मानवाला त्याच्या आईवडलांच्या बाबतीत (भली वागणूक करण्याची) ताकीद दिली.' त्याच्या आईने त्याला दुःखावर दुःख सहन करून त्याला आपल्या पोटात ठेवले. मग दोन वर्षांपर्यंत तो पूर्णपणे तिच्यावर अवलंबून राहिला (म्हणजे दोन वर्षांपर्यंत ती त्याला अंगावर दूध पाजवीत राहिली). (आम्ही म्हणालो की, तू माझ्या आणि आपल्या आईवडिलांप्रति आभार व्यक्त क...

Life

2 लोकांना असे वाटते कि काय? त्यांच्या केवळ (तोंडाने) इतके बोलण्यावर त्यांना सोडून दिले जाईल कि, 'आम्ही श्रद्धा धारण केली आहे.' आणि त्यांना आजमावून पहिले जाणार नाही? 3 आम्ही त्या लोकांनाही आजमावून पहिले होते, जे यांच्यापूर्वी होऊन गेले. निश्चितच अल्लाह त्या लोकांना चिन्हांकित करून त्यांची निवड करेल, ज्यांनी स्वतःला  सत्यवचनी सिद्ध केले असेल. तसेच तो असत्यावर (आधारित जीवन जगलेल्यांनाही) चिन्हांकित करून बाजूला काढेल.  [कुरआन 29:2-3] ============================================= 214 तुम्हाला असे वाटते की काय, कुठल्याही कष्टमय परिस्थितीतून गेल्याशिवाय तुम्ही स्वर्गात प्रवेशास असेच पात्र ठराल? पण तुमच्यावर त्या श्रद्धावंतांप्रमाणे कष्टमय परिस्थिती आलीच नाही जे तुमच्या आधी होऊन गेले. त्यांच्यावर संकट आणि दुःखाचे प्रसंग आले, ज्यामुळे ते इतके हादरले की, पैगंबर आणि त्याच्याबरोबर असलेल्या श्रद्धावंतांच्या तोंडून असे शब्द बाहेर पडले, 'अल्लाहकडून साहाय्य येईल तरी केव्हा?' निःसंशय अल्लाहचे साहाय्य अगदी जवळ आहे.  [कुरआन 2:214] ============================================= 199 (पैगं...

आदम अलैहिस्सलाम यांच्याविषयी कुरआन पवित्र मध्ये संदर्भ..

आदम अलैहिस्सलाम यांच्याविषयी कुरआन पवित्र मध्ये संदर्भ...     *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.           30 जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने स्वर्गदूतांना सांगितले की, मी पृथ्वीवर उत्तराधिकारी नेमणार आहे. (पृथ्वीवर जिन्ननंतर मानवाला वसवण्यात आले.) तेव्हा ते म्हणाले, 'तू पृथ्वीवर अशांना वसवणार आहेस का जे अनाचार घडवतील आणि रक्तपात करतील? (हे प्रभू) आम्ही तर तुझ्या असीम महानतेचे व पावित्र्याचे गुणगान करतो!' अल्लाहने उत्तर दिले, 'तुम्ही ते जाणत नाही, जे मी जाणतो.' 31 आणि अल्लाहने आदमला सर्व गोष्टींची नावे शिकविली. आणि त्या सर्वांना स्वर्गदूतांसमोर उपस्थित केले आणि म्हटले, 'तुमचे म्हणणे खरे असेल, तर मला या सर्वांची नावे सांगा.' 32 त्यांनी उत्तर दिले, 'असीम आहे तुझी महिमा! जे ज्ञान तू आम्हाला प्रदान केले त्याव्यतिरिक्त आम्हाला कोणतेही ज्ञान नाही. निःसंशय तूच सर्व गोष्टींचा जाणकार आणि अस्सल बुद्धिमान आहेस.' 33 तेव्हा अल्लाहने सांगितले, 'हे आदम ! त्यांना यांची नावे सांग. ' जेव्हा आदमने (स्वर्गदूतांना) त्यांची नावे सांग...

81 अत- तकवीर

 81 अत- तकवीर  *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  1 जेव्हा सूर्य गुंडाळून टाकला जाईल. 2 आणि जेव्हा तारे तेजशून्य होतील. 3 आणि जेव्हा पर्वतांना चालविले जाईल. 4 आणि जेव्हा दहा महिन्यांचा गर्भ असलेल्या उंटिणी मोकाट सोडून दिल्या जातील. 5 जेव्हा जंगली जनावरांना एकत्र आणले जाईल. 6 आणि जेव्हा (सुनामीप्रमाणे) समुद्र खवळतील. 7 जेव्हा सर्व लोकांची (त्यांच्या कृत्यांनुसार) विविध गटांत विभागणी केली जाईल. 8 आणि जेव्हा जिवंत गाडल्या गेलेल्या तान्ह्या मुलीला विचारले जाईल. 9 कोणत्या अपराधापोटी तिला मारून टाकण्यात आले? 10 आणि जेव्हा लोकांचे कर्मपत्र उघडले जातील. 11 जेव्हा आकाशाचे आवरण खेचून त्यास उघडे केले जाईल. 12 आणि जेव्हा नरकाची आग भडकविली जाईल. 13 जेव्हा स्वर्ग जवळ आणले जाईल. 14 तेव्हा प्रत्येकाला नीट कळून जाईल की, त्याने स्वतःसाठी काय तयार केलेले आहे.  15 मी मागे हटणाऱ्या ताऱ्यांना साक्ष ठेवतो. 16 त्या ग्रहांनाही जे आपल्या कक्षेत फिरतात व अस्त पावतात. 17 आणि त्या रात्रीचीही (शपथ) जी सरत असते. 18 आणि त्या पहाटेची, जेव्हा ती उदय पावते ( मी या सर्व गोष्टींची शप...

80 अबस

 80 अबस *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  1(पैगंबराने) एवढ्यावरून कपाळाला आठ्या घातल्या व तोंड फिरविले. 2 की, एक आंधळा माणूस त्यांच्याकडे आला. 3 (पैगंबर !) तुम्हाला काय माहीत की, कदाचित (ईश्वरीय संदेश ग्रहण करून) तो सुधारू शकला असता, 4 किंवा त्याने उपदेश ऐकले असते, तर ते त्याच्यासाठी लाभदायी ठरू शकले असते. 5 जो मनुष्य (उपदेशांप्रति) अनास्था दाखवत होता. 6 तुम्ही मात्र त्याच्याकडे लक्ष देण्याच्या बाबतीत उत्सुक होता. 7 त्याने जर स्वतःची सुधारणा केली नाही, तर त्याबद्दल तुमच्यावर काही दोष येणार नाही. 8 पण जो मनुष्य तुमच्याकडे धावत येतो, (उपदेश ग्रहण करण्याच्या) उत्सुकतेसह. 9 आणि तो अल्लाहप्रति आदरयुक्त भय बाळगणारा आहे. 10 तुम्ही अशा माणसाकडे दुर्लक्ष करता. 11 निश्चितच हे (कुराण) एक बोधग्रंथ आहे. 12 तर हवे त्याने (यापासून) बोध ग्रहण करावे. 13 जो अशा पृष्ठांवर नमूद आहे, जी अर्थातच आदरास पात्र आहेत. 14 जी उच्चा दर्जाची व पवित्र आहेत. 15 अशा लिहिणाऱ्यांच्या हाती. 16 जे सन्माननीय व सदाचारी आहेत.  17 नाश पावो माणूस ! किती कृतघ्न आहे तो! 18 (अल्लाहने) त्यास कशापा...

79 अन - नाजिआत

79 अन - नाजिआत  *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  1 त्या ( वाऱ्यांची) शपथ जे प्रचंड शक्तीने सर्व काही उपटून काढतात. 2 आणि त्या वाऱ्यांची जे हळुवार वाहतात. 3 आणि त्या ( ढगांची,) जे वेगाने तरंगत असतात. 4 आणि त्यांची, जे एकमेकांच्या पुढे जातात. 5 त्यांची, जे ( निर्मात्याच्या ) आदेशांना अमलात आणतात. 6 ज्या दिवशी भयानक भूकंपाने ( संपूर्ण पृथ्वी ) हादरून जाईल. 7 आणि त्या पाठोपाठ ( आणखी ) हादरे बसतील. 8 त्या दिवशी ( लोकांची) हृदये ( त्या दहशतीमुळे वेगाने) धडधडू लागतील. 9 त्यांच्या नजरा खाली खिळलेल्या असतील. 10 ( पुनरुत्थानास नाकारणारे) म्हणतात, '(मृत्यूनंतर) आम्हाला (जिवंत करून) पुन्हा पूर्वीच्या स्थितीत आणले जाणार का? 11 जेव्हा आम्ही जीर्ण हाडे बनलेले असू?' 12 ते म्हणतात, 'असे झाले, तर ते परतणे, नुकसानाची गोष्ट असेल. 13 ' (पण जेव्हा ती शेवटची घटका त्यांच्यावर येईल,) एका जोराची हाकाटी असेल. 14 आणि लगेच, ते ( सर्व जीर्ण हाडे झालेले) मैदानात हजर होतील! 15 तुम्हाला मूसाचा वृत्तांत पोचला का? 16 जेव्हा त्याच्या पालनकर्त्याने तुवाच्या पवित्र खोऱ्यापाशी त्यास हाक...

78 अन-नबा

78 अन-नबा  *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  1 लोक आपसात कोणत्या गोष्टीविषयी विचारणा करीत आहेत? 2 (पुरुत्थानाच्या) त्या महाभयानक गोष्टीविषयी? 3 ज्याबद्दल ते मतभेद बाळगून आहेत. 4 पण त्यांना लवकरच कळून येईल. 5  होय! त्यांना लवकरच कळून चुकेल. 6 आम्ही पृथ्वीला ( मानवजातीसाठी ) विश्रांतीचे स्थान नाही बनविले? 7 आणि पर्वतांना आधारस्तंभाप्रमाणे (नाही बनविले का )? 8 आणि आम्ही तुम्हाला जोड्या-जोड्यांच्या स्वरूपात निर्माण केले आहे. 9 आणि झोपेला तुमचा थकवा दूर करण्याचे साधन बनवले. 10 आणि रात्रीला आम्ही आवरण बनविले. 11 आणि दिवसाला जीवनप्रवास पुढे सुरु ठेवण्याचे माध्यम बनविले. 12 आणि आम्ही तुमच्यावर सात भक्कम आकाश निर्माण केले. 13 आणि ( आकाशात सूर्यरूपी) एक दीपक स्थापित केले. 14 आणि आम्ही वारे हाकून नेणाऱ्या जड ढगांतून विपुल प्रमाणात पाण्याचा वर्षाव करतो. 15 त्याद्वारे धान्य व वनस्पती आम्ही निर्माण करतो. 16 आणि घनदाट बागबगीचेही. 17 न्यायाच्या दिवसाची वेळ ठरलेली आहे, यात मुळीच शंका नाही.  18 ज्या दिवशी शिंग फुंकले जाईल आणि तुमचे ताफेचं ताफे येऊ लागतील. 19 आणि आ...

77 अल - मुरसलात (Those sent forth)

77 अल - मुरसलात (Those sent forth) *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  1 त्या वाऱ्यांची शपथ जे एका मागून एक पाठविले जातात. 2 आणि मग ते वादळाची गती धारण करतात. 3 आणि जे (पाऊस वर्षिणाऱ्या) ढगांना दूरवर पसरवितात. 4 मग त्यांना एकमेकांपासून वेगळे करतात. 5 (त्यांची) शपथ जे आपल्याबरोबर (अल्लाहकडून) उपदेश (ग्रंथ) घेऊन येतात. 6 काहींसाठी क्षमा तर काहींसाठी सावधानतेचा इशारा. 7 ज्या गोष्टीचे तुम्हाला वचन दिले जात आहे, ती निश्चितपणे घटित होणार आहे.  8 (ती घटना तेव्हा घटित होईल ) जेव्हा तारे निस्तेज होऊन जातील. 9 आणि जेव्हा आकाश फाटून जाईल. 10 आणि जेव्हा पर्वत धुळीप्रमाणे विखुरले जातील. 11 आणि जेव्हा निर्धारित समयी पैगंबरांना एकत्र आणले जाईल. 12 या सर्व गोष्टी कोणत्या दिवसासाठी टाळल्या जात होत्या. 13 न्यायाच्या दिवसासाठी. 14 आणि तुम्हाला काय माहीत की, न्यायाचा दिवस म्हणजे आहे तरी काय? 15 सत्याला असत्या ठरविणारे, नाश पावणार आहेत, त्या दिवशी. 16 आम्ही आधीच्या (अपराध्यांना) नष्ट केले नाही का? 17 आणि आम्ही त्यांच्या नंतरच्या (अपराध्यांनाही) त्यांच्या पाठोपाठ (विनाशाच्या खाईत...

76 अद-दहर (अल इंसान)(Man)

76 अद-दहर *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.            1 मनुष्यावर एक अशी वेळ आलेली नाही का, जेव्हा तो वर्णन करण्यास योग्य असा नव्हता? 2 आम्ही मनुष्याला एक मिश्रित अशा वीर्यबिंदूने निर्माण केले. आणि त्याची परीक्षा पाहण्यासाठी आम्ही त्याला ऐकणारा व पाहणारा बनविले. 3 आम्हीच त्याला मार्ग दाखवला आहे. आता स्वतःला कृतज्ञ किंवा कृतघ्न त्याला सिद्ध करून दाखवायचे आहे. 4 आम्ही सत्य नाकारणाऱ्या कृतघ्न लोकांसाठी साखळदंड, गळ्यात घालावयाची लोखंडी कडी आणि नरकाची धगधगती आग तयार ठेवलेली आहे. 5 याउलट सच्चे सदाचरणी लोक असे प्याले पितील, ज्यात कापूराचा  थंडावा जाणवेल. 6 हा एक असा स्रोत आहे, ज्यातून अल्लाहचे भक्त पितील. आणि हवे तिकडे (त्याच्या शाखा काढून) त्यास प्रवाहित करतील. 7 (खरे सदाचरणी ते आहेत,) जे आपल्या वचनपूर्तीच्या बाबतीत फार दक्ष असतात. आणि त्या दिवसाचे भय बाळगतात, ज्याचे संकट सर्वदूर पसरलेले असेल. 8 आणि ते ( केवळ अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी ) स्वतः गरजवंत असूनही (इतर) गरजवंत, अनाथ व कैदी यांना खाऊ घालतात. 9 (म्हणतात) 'आम्ही केवळ अल्लाहच्या...

74अल मुद्दस्सीर (One wrapped up)

74 अल मुद्दस्सीर *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  1 स्वतःवर चादर पांघरून असलेल्या (पैगंबरा!) 2 उठ आणि लोकांना सावध कर. 3 आणि आपल्या  पालनकर्त्याचे स्तुतीगान कर. 4 आपली वस्त्रे स्वच्छ ठेव. 5 आणि सर्व प्रकारच्या अपवित्रतेपासून स्वतःला दूर ठेव. 6 आणि परोपकारी कृत्य करून बदल्यात अधिक प्राप्त करण्याची इच्छा बाळगू नको. 7 (संदेश पोचविताना, जे विघ्न  येतील) ते आपल्या  पालनकर्त्याखातर सहन कर.  8 मग जेव्हा (पुनरुत्थानाचे) शिंग फुंकण्यात येईल. 9 तो फार कठीण दिवस असेल. 10 सत्य नाकारत राहिलेल्या लोकांसाठी मुळीच सुखकर असणार नाही. 11 त्याच्याबरोबर मला एकटा सोडा, ज्याला मी निर्माण केलेले आहे (त्याला मी पाहून घेईन). 12 आणि त्याला मी विपुल प्रमाणात धनसंपत्ती दिली. 13 आणि त्याच्याबरोबर असणारी मुले. 14 आणि त्याच्यासाठी सर्व प्रकारची साधने उपलब्ध केली. 15 पण तो (माझे आभार म्हणण्याऐवजी,) मी त्याला आणखी जास्त द्यावे, अशी लालसा बाळगतो. 16 कदापि नाही! तो तर आमच्या संदेशांचा शत्रू आहे. 17 लवकरच मी त्याला अशा पर्वतावर चढायला लावीन, (ज्यावर चढून त्याचे) फार वाईट हाल ह...

73 अल - मुज्जम्मिल (Folded in Garments)

73 अल - मुज्जम्मिल  *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  1 स्वतःवर चादर पांघरून असलेल्या (हे पैगंबर!) 2 रात्रीच्या समयी (नमाजामध्ये अल्लाहसमोर) उभे राहा, रात्रीचा काही भाग. 3 (म्हणजे) रात्रीचा अर्धा भाग किंवा त्यापेक्षा काही कमी. 4 किंवा त्यापेक्षा थोडासा अधिक. कुराणाचे पठण करताना, सावकाश पण विचारपूर्वक (पठण) करा. 5 आम्ही तुमच्यावर (आमचे संदेश पोचविण्याचे) फार मोठे दायित्व सोपवीत आहोत (तर त्यासाठी तुम्ही तयार असा.) 6 निश्चितच, रात्रीच्या समयी (प्रार्थनेसाठी) उठणे कठीण (असले तरी) स्वतःच्या मनावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. आणि तेव्हा (प्रार्थनाही) मनापासून (माणूस) करू शकतो.  7 कारण दिवसा तुम्हाला (संदेश पोचविण्याच्या जबाबदारी संबंधाने) बरीच कामे असतात. 8 (दिवस असो वा रात्र) आपल्या पालनकर्त्याच्या नावाचे (प्रत्येक प्रसंगी) स्मरण करीत राहा आणि संपूर्ण निष्ठेने त्याच्याप्रती समर्पित असा. 9 तो पूर्व आणि पश्चिम यांचा (म्हणजे संपूर्ण जगाचा) मालक आहे. त्याच्याशिवाय दुसरा कोणीच उपासनेयोग्य नाही. म्हणून त्यालाच तुम्ही आपला साम्भाळकर्ता...

112 अल इखलास 113 अल फ़लक 114 अन नास💐

💐चॅप्टर 112 अल इखलास 💐 *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1 (पैगंबर ! हे लोक अल्लाहविषयीं विचारतात), तुम्ही त्यांना सांगा, 'अल्लाह एकच आहे, 2 तो आत्मनिर्भर (व स्वयंपूर्ण) आहे. 3 ना तो कोणाला (अपत्यरूपी) जन्म देतो. ना तो कोणापासून जन्माला आलेला आहे (असा आहे अल्लाह). 4 आणि त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही.' [कुराण 112 :1 -4 ] -------------------------------------------------------- 💐चॅप्टर 113 अल फ़लक 💐 *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1 (पैगंबर !)सांगा, 'सकाळ निर्माण करणाऱ्या पालनकर्त्याचे मी शरण प्राप्त करू इच्छितो. 2 त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीच्या अपायापासून (स्वतःला वाचविण्यासाठी).3 आणि रात्रीच्या अपायापासून , जेव्हा ती सर्वत्र (अंधार ) पसरवते. 4 तसेच त्यांच्या अपायापासून जे काही गूढ प्रयास करून फुंकर मारतात. 5 तसेच मत्सर बाळगणारा जेव्हा मत्सर बाळगतो, त्याच्या अपायापासून वाचवण्यासाठी ( त्याचे शरण अवश्य आहे).' [कुराण 113 : 1 -5 ] -------------------------------------------------------- 💐चॅप्टर 114 अन नास💐 * ...

75 अल कियामह (The Resurrection)

🔥chapter 75 अल कियामह 🔥 🔥🔥🔥(The Resurrection)🔥🔥🔥 *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1 मी पुनरुत्थानाच्या दिवसाला साक्षी ठेवून सांगतो. 2 तसेच ( मानवाचे ) मन , जे ( वाईट कामांविषयी ) त्याला दोष देत असते, त्यास साक्ष ठेवून सांगतो. 3 मानवाला असे वाटते कि काय, आम्ही त्याची हाडे पुन्हा एकत्र करून त्याचे ( पुनरुत्थान ) करू शकत नाही ? 4 अर्थातच, आम्हाला त्याच्या बोटांची पेर अन पेर ( जशाचे तसे ) बसवण्याचे सामर्थ्य प्राप्त आहे. 5 पण माणूस त्याच्यापुढे, जे येणार आहे त्यास नाकारू इच्छितो ( म्हणजेच पुनरुत्थानास, कारण त्याला निर्भयपणे दुष्कृत्ये करता यावीत ). 6 ( चेष्टा करत ) तो विचारतो, ' तो पुनरूत्थानाचा दिवस येणार तरी केव्हा ? 7 जेव्हा ( दहशतीने ) डोळे दिपून जातील. 8 आणि चंद्राला ग्रहण लागेल. 9 जेव्हा सूर्य व चंद्र एकत्र आणले जातील.10 त्या दिवशी मनुष्य म्हणेल, ' आता कुठे पळून जाऊ ?' 11 नाही, ( हे मानवा !) तुझ्यासाठी आता कुठेही आश्रय नाही ! 12 त्या दिवशी केवळ तुझ्या पालनकर्त्यापाशीच आश्रयस्थान आहे ! 13 त्या दिवशी मनुष्यासमोर त्याने जे काही आपल्यापुढे पाठविल...

64 अत तगाबुन️ (Mutual loss and gain)

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1 जे काही आकाशात आणि जे काही  पृथ्वीवर आहे, ते सर्व अल्लाहचे स्तुतिगान करीत असतात. सर्वत्र त्याचीच सत्ता आहे -- व सर्वत्र त्याचीच स्तुती आहे. आणि सर्व वस्तुमात्रांवर त्यालाच पूर्ण नियंत्रण प्राप्त आहे. 2 त्यानेच तुम्हा (सर्वांना) निर्माण केले, मग तुमच्यात काही सत्य नाकारणारे तर काही सत्य स्वीकारणारे (श्रद्धावंत) आहेत. तुम्ही जे काही करता, त्यावर अल्लाह (नेहमी)नजर ठेवून असतो. 3 त्यानेच आकाश व पृथ्वी यांना उचित उद्देशासहित निर्माण केलेले आहे. आणि त्याने तुम्हाला आकार दिला , उत्तम आकार दिला. आणि त्याच्याकडेच तुम्हा सर्वांना परत जायचे आहे. 4 जे काही आकाशात आहे व जे काही पृथ्वीवर आहे, ते सर्व तो जाणतो. तसेच तो तुम्ही जे लपवता व जे प्रकट करता तेही जाणतो. कारण अल्लाहलाच (लोकांच्या) मनात काय काय आहे, याचे पूर्ण ज्ञान आहे. 5 तुम्हाला त्या लोकांची जाणीव झाली नाही का, ज्यांनी यापूर्वी सत्य नाकारण्याचे (अपकृत्य) केले ? मग आपल्या कर्मांची फळे चाखली . आणि (यानंतरच्या जीवनात) तर त्यांच्यासाठी (याहूनही) कठोर शिक्षा आहे. 6 असे (पुन्हा-पुन्हा) य...

63 अल -मुनाफिकून (The Hypocrites)(दांभिक लोक)( असे आतून वेगळे आणि बाहेरून वेगळे लोक)

63 अल -मुनाफिकून (The Hypocrites)(दांभिक लोक)( असे आतून वेगळे आणि बाहेरून वेगळे लोक) *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1 (पैगंबर !) जेव्हा दांभिक लोक तुमच्याकडे येतात, तेव्हा ते म्हणतात, 'आम्ही अशी साक्ष देतो की, तुम्ही निःसंदेह अल्लाहचे पैगंबर आहात.' अल्लाह जाणतो की, तुम्ही निःसंदेह त्याचे पैगंबर आहात. आणि अल्लाह या गोष्टीची साक्ष देतो की , हे दांभिक खोटे बोलणारे आहे. 2 त्यांनी (खोटे बोलण्याचा उद्योग करण्यासाठी) आपल्या शपथांना ढाल बनविलेले आहे. आणि ते (त्याद्वारे ) लोकांना अल्लाहच्या मार्गापासून परावृत्त करीत असतात. जे ते करीत आहे, खरोखर फार वाईट आहे. 3 (ते दांभिक ) अशाप्रकारे बनले की , त्यांनी सुरुवातीला ( वरवर ) श्राद्ध धारण केली, पण (मनोमनी) ते सत्य नाकारतात (व ते त्यांच्या कृत्यांतूनही दिसून येते), (परिणामी अल्लाहने ) त्यांची मने (सत्याच्या प्रवेशासाठी ) सीलबंद करून टाकली. आता त्यांना सत्य उमजतच नाही. 4 आता जेव्हा तुम्ही त्यांना पाहता, त्यांचे दर्शनी रूप तुम्हाला चांगले वाटू शकते. आणि जेव्हा ते बोलतात, तेव्हा तुम्ही त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकता. (पण ...

62 अल - जुमुआ (The Assembly) (Friday prayer)

62 अल - जुमुआ (The Assembly)(Friday prayer) *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1 जे काही आकाशात आहे आणि जे काही पृथ्वीवर आहे, ते सर्व अल्लाहचे स्तुतीगान करीत असतात. तो अस्सल सम्राट आहे, सर्व उणिवांपासून मुक्त असा, सर्वशक्तिमान आहे, बुद्धिमान आहे. 2 त्यानेच निरक्षर ( उम्मी) लोकांमध्ये त्यांच्यामधूनच एक पैगंबर उभा केला, जो त्यांना त्याचे ( म्हणजे अल्लाहचे ) संदेश ऐकवीत असतो. आणि ( मानसिकदृष्टया ) त्यांचे शुद्धीकरण करतो. आणि त्यांना ग्रंथ व शहाणपणाचे धडे देत असतो. ते या यापूर्वी स्पष्टरित्या वाट चुकलेले होते. 3 ( मक्केतील निरक्षरांव्यतिरिक्त ) इतर लोकांकडेही ( हा संदेश पोचविण्याची त्याच्यावर जबाबदारी आहे ), ते लोक ज्यांचा ( या मक्कावासीयांशी ) अद्याप संबंध आलेला नाही. तोच सर्वशक्तिमान आहे आणि अस्सल बुद्धिवान आहे. 4 ही ( पैगंबरी ) अल्लाहची कृपा होय, तो इच्छितो त्यास, ती प्रदान करतो. अल्लाह असीम कृपावंत आहे. 5 ज्या लोकांच्या ( शिरावर ) तौरात ( या अल्लाहच्या ) ग्रंथाची जबाबदारी सोपवण्यात आली होती , पण त्यांनी ती जबाबदारी ( गंभीरतापूर्वक ) पेलली नाही. त्यांची तुलना त्या गा...

61अस-सफ्फ (Battle Array)

61 अस-सफ्फ  (Battle Array) *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1 जे काही आकाशात आहे व जे काही पृथ्वीवर आहे, हे सर्व अल्लाहचेच स्तुतिगान करीत असतात, तोच सर्वांवर नियंत्रण ठेवणारा आहे, अस्सल बुद्धीवान आहे. 2 श्रद्धावंतांनो ! तुम्ही बोलता एक आणि करता दुसरेच असे का ? ( तुम्ही आपल्या आचार व विचारात फरक का करता ?) 3 अल्लाहच्या नजरेत तुमचे असे कृत्य अत्यंत अप्रिय आहे की , बोलायचे एक आणि करायचे दुसरेच. 4 अल्लाहला तर ते लोक प्रिय आहेत. जे त्याच्या कार्यासाठी पंक्तिबद्ध होऊन लढतात, जणू ते सर्व एक मजबूत अशी भिंत आहेत. 5 ( आणि ती वेळ आठवा ) जेव्हा मुसाने आपल्या लोकांना म्हटले, 'माझ्या बांधवांनो ! तुम्ही मला त्रास का देता, जेव्हा तुम्ही हे जाणून आहात की, मी तुमच्याकडे पाठविण्यात आलेला पैगंबर आहे ; मग जेव्हा त्यांनी सन्मार्गापासून दूर जाणे पसंत केले. तेव्हा अल्लाहनेही त्यांच्या हृदयांना सत्यापासून दूर करून टाकले. कारण अल्लाह आज्ञाभंग करणाऱ्या लोकांना सन्मार्ग दाखवीत नसतो. 6 (असेच तेव्हाही घडले ) जेव्हा मरियमपुत्र येशू मसीहने म्हटले, 'इस्राईलच्या मुलांनो ! मी तुमच्याकडे अ...

67 अल - मुल्क Dominion (The sovereignty)

67 अल - मुल्क Dominion(The sovereignty) *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1 असीम समृद्ध आहे तो, ज्याच्या हाती समस्त विश्वाची (ची) सत्ता आहे. प्रत्येक वस्तुमात्रावर त्याचेच नियंत्रण आहे. 2 त्यानेच तुमची कसोटी पाहण्यासाठी जीवन व मृत्यू निर्माण केले. तुमच्यापैकी कोण चांगली कामे करतो, (हे त्याला पाहायचे आहे). तो सर्वशक्तिमान (असूनही) फार क्षमाशील आहे. 3 ज्याने एकावर एक असे सात आकाश निर्माण  केले. कृपावंत (अल्लाहच्या) निर्मितीमध्ये तुम्हाला कोणताही दोष असल्याचे आढळून येणार नाही. (एकदा पाहिल्याने दोष न आढळल्यास) पुन्हा एकदा पाहा, की , तुम्हाला आढळतो का कुठे काही दोष ? 4 मग आणखी पुन्हा - पुन्हा पाहा, (प्रत्येक वेळेस) तुमच्या (दोष शोधणाऱ्या) नजरा थकून व निराश होऊन तुमच्याकडे परततील (पण अल्लाहच्या निर्मितीमध्ये दोष कुठेही आढळणार नाही). 5 आणि आम्ही पृथ्वीसाठी सर्वात जवळ असलेल्या आकाशाला दिव्यांनी सजवलेले आहे. आणि (वाईट हेतूने आपल्या मर्यादा ओलांडणाऱ्या) सैतानांना पिटाळून लावण्याचे त्यांना साधन बनविले आहे.आणि त्यांच्यासाठी धगधगत्या आगीची (भयंकर) शिक्षा तयार आहे. 6  ज...

66 अत-तहरीम

66  अत-तहरीम (Holding something to be forbidden) *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू आणि कृपाळू आहे. 1 पैगंबर ! तुम्ही आपल्या पत्नींच्या  प्रसन्नतेखातर  त्या गोष्टीला (स्वतःसाठी) का अवैध ठरवता, जी अल्लाहने तुमच्यासाठी वैध ठरविलेली आहे. पण अल्लाह फार क्षमाशील व दयाळू आहे. 2 अल्लाहने तुम्हाला आपल्या शपथांमधून मुक्त होण्याचे (नियमासहित) आधीच बजावलेले आहे, कारण अल्लाह तुमचा साम्भाळकर्ता आहे. आणि तोच सर्व काही जाणणारा व बुद्धिमान आहे. 3 आणि (एकदा असे घडले की,) पैगंबराने आपल्या पत्नींपैकी एकीला एखादी गोपनीय गोष्ट सांगितली. पण तिने ती गोष्ट गुप्त ठेवली नाही. आणि अल्लाहने पैगंबराला याबद्दल सूचित केले. तेव्हा पैगंबराने तिला त्यांपैकी काही भाग सांगितला आणि काही भाग सांगायचे टाळले. मग जेव्हा पैगंबराने आपल्या पत्नीस हे सांगितले, (जे त्यास अल्लाहद्वारे कळविण्यात आले होते), तेव्हा तिने विचारले, 'तुम्हाला याविषयी कोणी सांगितले?' पैगंबराने उत्तर दिले, ' मला त्याने हे सांगितले जो सर्व काही जाणणारा आहे व प्रत्येक गोष्टीविषयी जागरूक आहे.        ...

65 अत- तलाक

65 अत- तलाक * आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1 पैगंबर !  जेव्हा तुमच्यापैकी कोणीही आपल्या पत्नींना घटस्फोट (तलाक) देईल तर (त्याने) त्यांना त्यांच्या स्वच्छतेच्या (म्हणजे मासिक पाळी नसलेल्या) काळात तलाक द्यावा. आणि त्या काळाची गणना काळजीपूर्वक करा. आणि आपला पालनकर्ता असलेल्या अल्लाहसमोर (जाब देण्याची सदैव) जाण  ठेवा. (तलाकची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत) त्यांना त्यांच्या घरातून काढू नका. तसेच त्यांनीही घर सोडून जाऊ नये. पण फक्त त्यांनी जर उघड-उघड काही निर्लज्जपणाचे कृत्य केलेले असेल (तर त्यांना घराबाहेर घालवू शकता). या अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादा आहेत आणि जो कोणी अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादा भंग करेल, तर तो स्वतःवरच अन्याय करणारा आहे. (हे माणसा!) तू जाणत नाहीस की, अल्लाह त्यानंतर कदाचित काही नवीन (कल्याणकारी) स्थिती निर्माण करेल. 2 मग त्यांच्या प्रतीक्षेची मुदत पूर्ण झाल्यांनंतर, त्यांना सन्मानाने ठेवून घ्या किंवा सन्मानाने सोडून द्या. आणि आपल्या (नातेवाईकांपैकी) दोन विश्वसनीय लोकांना साक्ष म्हणून बोलावून घ्या. (आणि साक्ष देणाऱ्यांनी गरज अ...

72अल - जिन्न (The jinn)

72 अल  - जिन्न  *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  1 (पैगंबर!) लोकांना सांगा, ' माझ्याकडे असा संदेश प्रकट करण्यात आला आहे की, जिन्नच्या  एका समूहाने या कुराणास ऐकले, तेव्हा ते आपल्या (साथीदारांना) म्हणाले, "आम्ही (अगदी) भारावून टाकणारे असे कुराण ऐकले आहे. 2 जो सन्मार्ग दाखवणारा आहे, आणि म्हणून आम्ही त्यावर श्रद्धा धारण केली, आणि आम्ही कोणालाही आमच्या पालनकर्त्याचे समकक्ष ठरविणार नाही. 3 आमच्या पालनकर्त्याची  महिमा फार मोठी आहे. त्याने स्वतःसाठी ना पत्नी बनविली, ना पुत्र. 4 आमच्यातील मूर्ख अल्लाहविषयी काही असत्य व निराधार विधाने करीत असत. 5 आम्हाला तर वाटले होते, माणूस व जिन्न अल्लाहविषयी खोट्या गोष्टी कधीही उच्चारणार नाहीत. 6 माणसांमध्ये काही असे होते, जे भूतकाळात जिन्नपैकी काहींचा आश्रय मागायचे, असे करून त्यांनी केवळ त्या जिन्नांच्या गर्वात वाढ केली होती. 7 आणि जसे तुम्हाला वाटत होते, तसेच त्यांनाही वाटत होते की, अल्लाहने कधीही कोणालाही पैगंबर बनवून पाठविलेले नाही (ना पुढे पाठवेल.)  8 आम्ही आकाशाकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला ...

71नूह (Noah)

71नूह  *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  1 आम्ही नूहला त्याच्या लोकांकडे पैगंबर बनवून पाठविले. (त्यास आम्ही म्हटले की), आपल्या  लोकांना, त्यांच्यावर दुःखदायी शिक्षा येण्यापूर्वी, सावध कर. 2 (नूहने) म्हटले, 'माझ्या बांधवांनो ! मला तुमच्याकडे स्पष्टरित्या सावध करणारा बनवून पाठविले गेले आहे. 3 तुम्ही (केवळ) अल्लाहची उपासना करा, आणि त्याची नेहमी जाण ठेवा आणि माझ्या आज्ञेचे पालन करा. 4 अल्लाह तुमच्या चुका माफ करून टाकेल, आणि एका निर्धारित अवधीपर्यंत तुम्हाला उसंत देईल. पण जेव्हा अल्लाहने निर्धारित केलेली वेळ येते, मग तिला कोणत्याही प्रकारे टाळता येत नाही. कदाचित तुम्हाला हे समजले असते, तर (बरे झाले असते).' 5  (दीर्घ काळापर्यंत संदेश पोचविण्याचे कर्तव्य पार पडल्यानंतर) नूहने (अल्लाहकडे) प्रार्थना केली, 'हे प्रभू ! मी आपल्या लोकांना अहोरात्र (तुझ्याकडे) येण्याचे आवाहन केले. 6 पण माझ्या सततच्या आवाहनाने, ते (तुझ्यापासून) केवळ दूर आणि दूर गेले. 7 आणि जेव्हा-जेव्हा मी त्यांना बोलविले की, (त्यांनी तुझ्याकडे वळावे) व तू त्यांना क्षमा करावी. पण त्यांनी प्रत्य...