मुख्य सामग्रीवर वगळा

61अस-सफ्फ (Battle Array)

61 अस-सफ्फ  (Battle Array)
*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 जे काही आकाशात आहे व जे काही पृथ्वीवर आहे, हे सर्व अल्लाहचेच स्तुतिगान करीत असतात, तोच सर्वांवर नियंत्रण ठेवणारा आहे, अस्सल बुद्धीवान आहे. 2 श्रद्धावंतांनो ! तुम्ही बोलता एक आणि करता दुसरेच असे का ? ( तुम्ही आपल्या आचार व विचारात फरक का करता ?) 3 अल्लाहच्या नजरेत तुमचे असे कृत्य अत्यंत अप्रिय आहे की , बोलायचे एक आणि करायचे दुसरेच. 4 अल्लाहला तर ते लोक प्रिय आहेत. जे त्याच्या कार्यासाठी पंक्तिबद्ध होऊन लढतात, जणू ते सर्व एक मजबूत अशी भिंत आहेत.

5 ( आणि ती वेळ आठवा ) जेव्हा मुसाने आपल्या लोकांना म्हटले, 'माझ्या बांधवांनो ! तुम्ही मला त्रास का देता, जेव्हा तुम्ही हे जाणून आहात की, मी तुमच्याकडे पाठविण्यात आलेला पैगंबर आहे ; मग जेव्हा त्यांनी सन्मार्गापासून दूर जाणे पसंत केले. तेव्हा अल्लाहनेही त्यांच्या हृदयांना सत्यापासून दूर करून टाकले. कारण अल्लाह आज्ञाभंग करणाऱ्या लोकांना सन्मार्ग दाखवीत नसतो.

6 (असेच तेव्हाही घडले ) जेव्हा मरियमपुत्र येशू मसीहने म्हटले, 'इस्राईलच्या मुलांनो ! मी तुमच्याकडे अल्लाहकडून पाठविलेला पैगंबर आहे; माझ्यापूर्वीच्या तौरात या ग्रंथांपैकी जे सत्य बाकी राहिलेले आहे, त्यास प्रमाणित करणारा ( मी ) आहे. तसेच तुम्हाला एका पैगंबराविषयी शुभवार्ता देतो आहे, जो माझ्यानंतर येईल. ज्याचे नाव अहमद असेल.' आणि जेव्हा तो त्यांच्याकडे सत्याचे सर्व स्पष्ट प्रमाण घेऊन आला, तेव्हा ते म्हणाले, 'ही केवळ जादू आहे.' 7 आणि त्याच्यापेक्षा अधिक दुष्ट माणूस कोण असू शकतो, ज्याला, अल्लाहला समर्पित अशी जीवनपद्धती ( म्हणजेच इस्लाम ) कडे येण्याचे आवाहन केले जात असतानाही, तो अल्लाहविषयी खोट्या गोष्टी रचत असतो. पण अल्लाह अत्याचारी लोकांना सन्मार्ग दाखवीत नसतो. 8 जे आपल्या तोंडाच्या फुंकरेने अल्लाहचा प्रकाश विझवून टाकू इच्छितात. पण अल्लाह आपला प्रकाश पूर्णपणे सर्वत्र पसरविल्याशिवाय राहणार नाही. मग सत्य नाकारणाऱ्यांना याबद्दल कितीका वाईट वाटेना. 9 त्यानेच आपल्या पैगंबराला मार्गदर्शन आणि सत्यधर्म यांच्यासह पाठविले आहे, या उद्देशाने की, सत्यधर्माला इतर सर्व धर्मांवर ( वैचारिक ) प्रभुत्व करून द्यावे, मग ते अनेकेश्वरवाद्यांना कितीका अप्रिय वाटत नाही.

10 (पैगंबर ! लोकांना सांगा,) श्रद्धावंतांनो ! मी तुम्हाला अशा फायद्याच्या सौद्याविषयी मार्गदर्शन करू का, जो तुम्हाला दुःखदायी शिक्षेपासून वाचवू शकतो ? 11 ( तो हा की,) तुम्ही अल्लाह व त्याच्या पैगंबरावर विश्वास ठेवणारे बना आणि अल्लाहच्या मार्गात आपले धन व प्राण यांच्यासह प्रयत्नांची पराकाष्ठा (म्हणजेच जिहाद ) करा. तुम्हाला हे समजत असेल , तर यात तुमचे (निश्चितपणे) भले आहे. 12 ( तुम्ही असे केल्यास ) अल्लाह तुमच्या चुका माफ करून टाकेल. आणि तुम्हाला अशा बागांमध्ये प्रवेश देईल. ज्यातून पाण्याचे ( नयनरम्य ) प्रवाह ( नेहमी ) वाहत असतील. तसेच राहण्यासाठी सुंदर घरे तो देईल, जे ( घरे ) शाश्वत व सुखदायी बागांमध्ये असतील. हेच सर्वश्रेष्ठ यश आहे. 13 ( त्या सर्वांसह ) तुमच्यावर ( या जगातही ) आणखी एक कृपा तो करेल, ज्याची तुम्ही अभिलाषा बाळगून आहात.- अल्लाहकडून मिळणारे साहाय्य आणि लवकरच विजयाची प्राप्ती. (पैगंबर ! याविषयी ) श्रद्धावंतांना शुभवार्ता देऊन टाका.

14 श्रद्धावंतांनो ! तुम्ही ( त्याप्रमाणे ) अल्लाहची मदत करणारे बना, ज्याप्रमाणे मरियमपुत्र येशू मसीहने आपल्या अनुयायांना म्हटले होते,' अल्लाहकडे ( लोकांना बोलावण्याच्या ) कार्यात कोण माझी मदत करेल?' त्याच्या अनुयायांनी उत्तर दिले होते, ' आम्ही अल्लाहची मदत करण्यासाठी तयार आहोत.' तेव्हा इस्राईलच्या मुलांपैकी ( म्हणजे ज्यू लोकांपैकी) काहींनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि काहींनी नकार दिला. मग आम्ही श्रद्धा धारण केलेल्या लोकांची त्याच्या शत्रूंच्या विरुद्ध मदत केली, परिणामी ते विजयी झाले.

(अब्दूर रहमान चाऊस, नांदेड यांचे मराठीतले भाषांतर)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लुकमान यांचा सत्य वृत्तांत....

लुकमान यांचा सत्य वृत्तांत.... *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  12 आम्ही लुकमान यास विवेक प्रदान केले होते. व त्यास असे सांगितले होते की, अल्लाहप्रति नेहमी कृतज्ञ राहा. जो कोणी (अल्लाहप्रति) कृतज्ञ राहील तर त्यात त्याचेच भले आहे. तसेच जो कोणी कृतघ्नतेचे प्रदर्शन करील तर अल्लाह स्वयंपूर्ण आहे (त्याला भक्तांच्या आभाराची गरज नाही), तोच आहे सदा स्तुतीस पात्र ! 13 लुकमान (जो एक विवेकशील माणूस होता एकदा) आपल्या मुलास उपदेश करताना म्हणाला, 'हे माझ्या मुलं ! कोणालाही (कधीही) अल्लाहचे समकक्ष ठरवू नकोस. कारण कोणालाही अल्लाहच्या ईश्वरत्वामध्ये सहभागी ठरविणे, फार मोठे अत्याचारी कृत्य आहे.'  14 (अल्लाह म्हणतो) 'आम्ही मानवाला त्याच्या आईवडलांच्या बाबतीत (भली वागणूक करण्याची) ताकीद दिली.' त्याच्या आईने त्याला दुःखावर दुःख सहन करून त्याला आपल्या पोटात ठेवले. मग दोन वर्षांपर्यंत तो पूर्णपणे तिच्यावर अवलंबून राहिला (म्हणजे दोन वर्षांपर्यंत ती त्याला अंगावर दूध पाजवीत राहिली). (आम्ही म्हणालो की, तू माझ्या आणि आपल्या आईवडिलांप्रति आभार व्यक्त क...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noha यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noah(नोहा) यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...  59  आम्ही नूह (अ.) ला त्याच्या लोकसमूहाकडे पाठविले त्याने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवांनो! अल्लाहची भक्ती करा, त्याच्याव्यतिरिक्त तुमचा कोणीही ईश्वर नाही. मला तुमच्याबाबतीत एका भयंकर दिवसाच्या प्रकोपाचे भय वाटते.’’ 60  त्याच्या जनसमूहातील सरदारांनी उत्तर दिले, ’’आम्ही तर असे पहतो की तुम्ही उघड पथभ्रष्टतेत अडकले आहात.’’ 61  नूह (अ.) ने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवानो! मी कोणत्याच पथभ्रष्टतेत पडलेलो नाही, उलट मी सर्व जगांच्या पालनकर्त्याचा प्रेषित आहे. 62  मी तुम्हाला आपल्या पालनकर्त्याचे संदेश पोहोचवितो व मी तुमचा हितचिंतक आहे आणि मला अल्लाहकडून ते सर्वकाही माहीत आहे जे तुम्हाला माहीत नाही. 63  काय तुम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की तुमच्यापाशी खुद्द तुमच्याच जातीबांधवांपैकी एका माणसाद्वारे तुमच्या पालनकर्त्याकडून स्मरण आले, जेणेकरून तुम्हाला सावध करावे आणि तुम्ही दुर्वर्तनापासून वाचावे आणि तुम्हावर कृपा केली जावी?’...

67 अल - मुल्क Dominion (The sovereignty)

67 अल - मुल्क Dominion(The sovereignty) *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1 असीम समृद्ध आहे तो, ज्याच्या हाती समस्त विश्वाची (ची) सत्ता आहे. प्रत्येक वस्तुमात्रावर त्याचेच नियंत्रण आहे. 2 त्यानेच तुमची कसोटी पाहण्यासाठी जीवन व मृत्यू निर्माण केले. तुमच्यापैकी कोण चांगली कामे करतो, (हे त्याला पाहायचे आहे). तो सर्वशक्तिमान (असूनही) फार क्षमाशील आहे. 3 ज्याने एकावर एक असे सात आकाश निर्माण  केले. कृपावंत (अल्लाहच्या) निर्मितीमध्ये तुम्हाला कोणताही दोष असल्याचे आढळून येणार नाही. (एकदा पाहिल्याने दोष न आढळल्यास) पुन्हा एकदा पाहा, की , तुम्हाला आढळतो का कुठे काही दोष ? 4 मग आणखी पुन्हा - पुन्हा पाहा, (प्रत्येक वेळेस) तुमच्या (दोष शोधणाऱ्या) नजरा थकून व निराश होऊन तुमच्याकडे परततील (पण अल्लाहच्या निर्मितीमध्ये दोष कुठेही आढळणार नाही). 5 आणि आम्ही पृथ्वीसाठी सर्वात जवळ असलेल्या आकाशाला दिव्यांनी सजवलेले आहे. आणि (वाईट हेतूने आपल्या मर्यादा ओलांडणाऱ्या) सैतानांना पिटाळून लावण्याचे त्यांना साधन बनविले आहे.आणि त्यांच्यासाठी धगधगत्या आगीची (भयंकर) शिक्षा तयार आहे. 6  ज...