मुख्य सामग्रीवर वगळा

63 अल -मुनाफिकून (The Hypocrites)(दांभिक लोक)( असे आतून वेगळे आणि बाहेरून वेगळे लोक)

63 अल -मुनाफिकून (The Hypocrites)(दांभिक लोक)( असे आतून वेगळे आणि बाहेरून वेगळे लोक)

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 (पैगंबर !) जेव्हा दांभिक लोक तुमच्याकडे येतात, तेव्हा ते म्हणतात, 'आम्ही अशी साक्ष देतो की, तुम्ही निःसंदेह अल्लाहचे पैगंबर आहात.' अल्लाह जाणतो की, तुम्ही निःसंदेह त्याचे पैगंबर आहात. आणि अल्लाह या गोष्टीची साक्ष देतो की , हे दांभिक खोटे बोलणारे आहे. 2 त्यांनी (खोटे बोलण्याचा उद्योग करण्यासाठी) आपल्या शपथांना ढाल बनविलेले आहे. आणि ते (त्याद्वारे ) लोकांना अल्लाहच्या मार्गापासून परावृत्त करीत असतात. जे ते करीत आहे, खरोखर फार वाईट आहे. 3 (ते दांभिक ) अशाप्रकारे बनले की , त्यांनी सुरुवातीला ( वरवर ) श्राद्ध धारण केली, पण (मनोमनी) ते सत्य नाकारतात (व ते त्यांच्या कृत्यांतूनही दिसून येते), (परिणामी अल्लाहने ) त्यांची मने (सत्याच्या प्रवेशासाठी ) सीलबंद करून टाकली. आता त्यांना सत्य उमजतच नाही.

4 आता जेव्हा तुम्ही त्यांना पाहता, त्यांचे दर्शनी रूप तुम्हाला चांगले वाटू शकते. आणि जेव्हा ते बोलतात, तेव्हा तुम्ही त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकता. (पण ते तुमच्यासमोर असे बसतात) जणू भिंतीला टेकवून उभे केलेले लाकडाचे ओंडके आहेत , प्रत्येक जोराची आवाज त्यांच्याचविरुद्ध (काहीतरी) असल्याचे त्यांना वाटते. हे (धर्माचे खरे)शत्रू आहेत, तर यांच्यापासून (नेहमी )सावध राहा. त्यांच्यावर अल्लाहचा प्रकोप होवो ! ते कुठे भलतीकडे जात आहेत ! 5 कारण जेव्हा त्यांना म्हटले जाते, 'या, पैगंबर तुमच्यासाठी अल्लाहकडे क्षमायाचना करेल.' तेव्हा ते (नकार दर्शवीत) आपली डोकी हालवतात . आणि तुम्ही त्यांना पाहाल, मगरूरीचे प्रदर्शन करीत तिथून निघून जातात. 6 तुम्ही त्यांच्यासाठी (अल्लाहकडे) क्षमायाचना करा किंवा करू नका, दोन्ही गोष्ट सारख्या आहेत . ( कारण परिणाम शून्यच असेल ). अल्लाह त्यांना कदापि क्षमा करणार नाही. कारण अल्लाह विद्रोही लोकांना सन्मार्ग दाखवत नसतो.

7 हेच ते आहेत, जे (आपल्या साथीदारांना ) म्हणतात, 'जे लोक अल्लाहच्या पैगंबरांसोबत आहेत, त्या लोकांवर (आपले धन) खर्च करू नका, ( परिणामी ) त्यांची गोची होऊन ते ( पैगंबराची ) साथ सोडून देतील.' पण या दांभिक लोकांना हे माहीत नाही की, आकाश व पृथ्वीचे सर्व खजिने, अल्लाहच्या मालकीचे आहेत. 8 आणि ते म्हणतात,' आम्ही मदिनेला परतल्यानंतर, (आम्ही) तेथील सर्वाधिक सन्माननीय लोक, तेथून त्या सर्वात तुच्छ अशा लोकांना निश्चितपणे हाकलून लावू.' पण या दांभिक लोकांना या गोष्टीची जाण नाही की, सर्व प्रकारचे मन-सन्मान अल्लाहसाठी आहे, त्याच्या पैगंबरासाठी आहे व श्रद्धावंतांसाठी आहे.

9 श्रद्धावंतांनो ! तुमची धनसंपत्तीं व तुमची मुले तुम्हाला अल्लाहच्या आठवणीपासून ढळण्यास कारणीभूत ठरायला नको. आणि ज्याला या गोष्टी (अल्लाहच्या स्मरणापासून विचलित करतील) तर असेच लोक (शेवटी) नाश पावणारे असतींल. 10 आणि तुम्हाला जे काही दिलेले आहे, त्यातून तुमच्यापैकी एखाद्याला मृत्यू येण्यापूर्वी त्याने खर्च करावे. मग तो म्हणू लागेल, ' हे माझ्या पालनकर्त्या ! तू मला आणखी काही काळ उसंत का नाही दिलीस? की , मी दानकार्य केले असते आणि सदाचारी लोकांपैकी झालो असतो.' 11 पण अल्लाह कोणालाही त्याची नियत वेळ येऊन ठेपल्यावर उसंत देत नसतो. आणि तुम्ही जे काही करता, अल्लाह ते सर्व जाणतो.

(अब्दूर रहमान चाऊस, नांदेड यांचे मराठीतले भाषांतर )


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लुकमान यांचा सत्य वृत्तांत....

लुकमान यांचा सत्य वृत्तांत.... *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  12 आम्ही लुकमान यास विवेक प्रदान केले होते. व त्यास असे सांगितले होते की, अल्लाहप्रति नेहमी कृतज्ञ राहा. जो कोणी (अल्लाहप्रति) कृतज्ञ राहील तर त्यात त्याचेच भले आहे. तसेच जो कोणी कृतघ्नतेचे प्रदर्शन करील तर अल्लाह स्वयंपूर्ण आहे (त्याला भक्तांच्या आभाराची गरज नाही), तोच आहे सदा स्तुतीस पात्र ! 13 लुकमान (जो एक विवेकशील माणूस होता एकदा) आपल्या मुलास उपदेश करताना म्हणाला, 'हे माझ्या मुलं ! कोणालाही (कधीही) अल्लाहचे समकक्ष ठरवू नकोस. कारण कोणालाही अल्लाहच्या ईश्वरत्वामध्ये सहभागी ठरविणे, फार मोठे अत्याचारी कृत्य आहे.'  14 (अल्लाह म्हणतो) 'आम्ही मानवाला त्याच्या आईवडलांच्या बाबतीत (भली वागणूक करण्याची) ताकीद दिली.' त्याच्या आईने त्याला दुःखावर दुःख सहन करून त्याला आपल्या पोटात ठेवले. मग दोन वर्षांपर्यंत तो पूर्णपणे तिच्यावर अवलंबून राहिला (म्हणजे दोन वर्षांपर्यंत ती त्याला अंगावर दूध पाजवीत राहिली). (आम्ही म्हणालो की, तू माझ्या आणि आपल्या आईवडिलांप्रति आभार व्यक्त क...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noha यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noah(नोहा) यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...  59  आम्ही नूह (अ.) ला त्याच्या लोकसमूहाकडे पाठविले त्याने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवांनो! अल्लाहची भक्ती करा, त्याच्याव्यतिरिक्त तुमचा कोणीही ईश्वर नाही. मला तुमच्याबाबतीत एका भयंकर दिवसाच्या प्रकोपाचे भय वाटते.’’ 60  त्याच्या जनसमूहातील सरदारांनी उत्तर दिले, ’’आम्ही तर असे पहतो की तुम्ही उघड पथभ्रष्टतेत अडकले आहात.’’ 61  नूह (अ.) ने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवानो! मी कोणत्याच पथभ्रष्टतेत पडलेलो नाही, उलट मी सर्व जगांच्या पालनकर्त्याचा प्रेषित आहे. 62  मी तुम्हाला आपल्या पालनकर्त्याचे संदेश पोहोचवितो व मी तुमचा हितचिंतक आहे आणि मला अल्लाहकडून ते सर्वकाही माहीत आहे जे तुम्हाला माहीत नाही. 63  काय तुम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की तुमच्यापाशी खुद्द तुमच्याच जातीबांधवांपैकी एका माणसाद्वारे तुमच्या पालनकर्त्याकडून स्मरण आले, जेणेकरून तुम्हाला सावध करावे आणि तुम्ही दुर्वर्तनापासून वाचावे आणि तुम्हावर कृपा केली जावी?’...

67 अल - मुल्क Dominion (The sovereignty)

67 अल - मुल्क Dominion(The sovereignty) *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1 असीम समृद्ध आहे तो, ज्याच्या हाती समस्त विश्वाची (ची) सत्ता आहे. प्रत्येक वस्तुमात्रावर त्याचेच नियंत्रण आहे. 2 त्यानेच तुमची कसोटी पाहण्यासाठी जीवन व मृत्यू निर्माण केले. तुमच्यापैकी कोण चांगली कामे करतो, (हे त्याला पाहायचे आहे). तो सर्वशक्तिमान (असूनही) फार क्षमाशील आहे. 3 ज्याने एकावर एक असे सात आकाश निर्माण  केले. कृपावंत (अल्लाहच्या) निर्मितीमध्ये तुम्हाला कोणताही दोष असल्याचे आढळून येणार नाही. (एकदा पाहिल्याने दोष न आढळल्यास) पुन्हा एकदा पाहा, की , तुम्हाला आढळतो का कुठे काही दोष ? 4 मग आणखी पुन्हा - पुन्हा पाहा, (प्रत्येक वेळेस) तुमच्या (दोष शोधणाऱ्या) नजरा थकून व निराश होऊन तुमच्याकडे परततील (पण अल्लाहच्या निर्मितीमध्ये दोष कुठेही आढळणार नाही). 5 आणि आम्ही पृथ्वीसाठी सर्वात जवळ असलेल्या आकाशाला दिव्यांनी सजवलेले आहे. आणि (वाईट हेतूने आपल्या मर्यादा ओलांडणाऱ्या) सैतानांना पिटाळून लावण्याचे त्यांना साधन बनविले आहे.आणि त्यांच्यासाठी धगधगत्या आगीची (भयंकर) शिक्षा तयार आहे. 6  ज...