मुख्य सामग्रीवर वगळा

70अल- मआरिज (The ways of Ascent)

 70 अल - मआरिज (The ways of Ascent)
*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 
1 त्या अटळ शिक्षेविषयी शंका घेणाऱ्याने ती (लवकर) यावी म्हणून मागणी केली. 2 सत्य नाकारणाऱ्या लोकांपासून तिला कोणीही दूर सारू शकत नाही. 3 जेव्हा ती अल्लाहकडून येईल, जो सदैव उंच असणाऱ्या प्रमुख स्थानांचा मालक आहे. 4 त्याच्याकडे स्वर्गदूत व जिब्रील (प्रमुख स्वर्गदूतांपैकी एक)(दररोज) चढून जात असतात. जो दिवस (म्हणजे पृथ्वीवरील) पन्नास हजार वर्षांचा असल्याप्रमाणे असतो. 5 (श्रद्धावंतांनो!) तुम्ही सहनशीलतेचा अंगीकार करा, ---- सकारात्मक सहनशीलतेचा. 6 लोकांना (न्यायाचा दिवस) फार दूर असल्याचे वाटते. 7 पण आम्ही त्यास फार जवळ असल्याचे पाहत आहोत. 8 त्या दिवशी आकाश वितळलेल्या तांब्यासारखे (लाल) होईल. 9 आणि पर्वत लोकरीच्या पिंजलेल्या पुंजक्याप्रमाणे होईल. 10 आणि कोणीही मित्र आपल्या मित्राविषयी विचारपूस (देखील) करणार नाही. 11 जरी ते एकमेकांना समोर पाहतील (तरीही कोणी कोणाला विचारणार नसेल), तेव्हा अपराधी माणसामध्ये (एका प्रकारची व्यर्थ) इच्छा जागृत होईल की, त्या दिवसाच्या शिक्षेपासून सर्वांचे बळी देऊनही स्वतःची सुटका होणार असेल तर ती व्हावी. (जसे) त्याची स्वतःची मुले, 12 त्याची पत्नी व त्याचा भाऊ, 13 आणि त्याचे सर्व कुटुंबीय, जे त्याला नेहमी आधार द्यायचे. आणि 14 पृथ्वीवरील सर्व लोकांनाही 'मुक्तिदंड' म्हणून देऊन केवळ आपली सुटका करून घ्यावी. 
15 पण नाही ! त्याच्यासाठी तर नरकाची धगधगती आग तयार असेल. 16 जी त्याच्या त्वचा सोलून काढील. 17 त्या सर्वांना ती स्वतःकडे बोलावील, ज्यांनी (सत्यापासून) पाठ फिरविली आणि (त्यापासून ) दूर निघून गेले. 18 ज्याने (भरपूर) संपत्ती गोळा केली व (स्वतःभोवतीच) तिचा संचय करून ठेवत होता. 19 खरोखर, माणूस उतावीळ स्वभावासह जन्माला आलेला आहे. 20 जेव्हा त्याला कष्ट पोहोचते, तेव्हा तो शोक करू लागतो. 21आणि जेव्हा तो सुस्थितीत असतो, तेव्हा तो कंजूषपणाचे वर्तन करतो. 22 पण असे न करणारे ते आहेत, जे नमाजा च्या माध्यमातून अल्लाहकडे वळलेले आहेत. 23 जे नित्य नमाजाचे पालन करतात. 24 तसेच जे आपल्या संपत्तीतून योग्य तो हिस्सा (दानकार्यात) देतात. 25 मागणाऱ्या गरजू लोकांना आणि (न मागणाऱ्या) गरजू लोकांना. 26 जे न्यायाच्या दिवसावर दृढ विश्वास ठेवतात. 27आणि जे आपल्या पालनकर्त्याच्या शिक्षेचे भय बाळगून असतात. 28 (आणि) होय, कोणालाही आपल्या पालनकर्त्याच्या शिक्षेपासून निर्धास्त होता कामा नये. 29 आणि जे आपले चारित्र्य कलंकित होऊ नये म्हणून नेहमी दक्ष असतात.30 पण त्यांच्या पत्नी व (विवाहबंधनात दाखल झालेल्या)दासी, यांच्याबाबतीत काही आक्षेपार्ह नाही. 31 पण जे मर्यादांच्या पलीकडे जाऊ पाहतात. तर असेच लोक (अल्लाहच्या नजरेत) मर्यादांचे उल्लंघन करणारे लोक आहेत. 32 आणि जे आपली विश्वासार्हता व आपल्या वचनांप्रति (पूर्णपणे) दक्ष असतात. 33 आणि जे सत्याची साक्ष देण्याच्या बाबतीत दृढनिश्चयी असतात. 34 तसेच जे नियमितपणे नमाजरुपी प्रार्थना करीत असतात. 35 यांनाच (सर्वसुखसंपन्न) अशा स्वर्गात सन्मानाचे जीवन लाभेल. 
36 पण या सत्य नाकारणाऱ्यांना काय झाले आहे की, ते तुमच्याकडे धावत येत आहेत.... 37 उजव्या बाजूने आणि डाव्या बाजूने व गटातटाने? 38 त्यांच्यापैकी प्रत्येकजण, अशी अपेक्षा बाळगून आहे का की , त्याला सर्वसुखसंपन्न अशा स्वर्गात प्रवेश दिला जाईल ? 39 नाही, कदापि नाही, आम्ही त्यांना अशा गोष्टीपासून निर्माण केलेले आहे, जी त्यांना ठाऊक आहे. 
40 कदापि नाही! मी सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या सर्व स्थानांचा मालक असलेल्या (अल्लाहची) शपथ घेऊन सांगतो, आम्ही यासाठी समर्थ आहोत की, 41 त्यांच्याजागी त्यांच्यापेक्षाही उत्तम लोकांना आणू शकतो. आणि असे करण्यापासून आम्हाला रोखू शकेल असा कोणीही नाही. 42 तर त्यांना तोपर्यंत व्यर्थ बडबड करीत व शब्दांचा खेळ खेळत राहू द्या, जेव्हा ते त्या दिवसाला सामोरे जातील, ज्याचे त्यांना वचन दिले गेलेले आहे. 43 ज्या दिवशी ते आपल्या कबरींतून घाईघाईने बाहेर पडतील आणि (जमा होण्याच्या ठिकाणी) असे धावत सुटतील जणू एका खांबाकडे धावण्याची शर्यतच करीत आहेत. 44 त्यांच्या नजरा जमिनीवर खिळलेल्या असतील, शरमेने त्यांचे चेहरे ग्रस्त असतील. हाच तो दिवस आहे, ज्याचे त्यांना वचन देण्यात आलेले होते.
==============================

अनुवादक - अब्दुर-रहमान चाऊस, नांदेड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लुकमान यांचा सत्य वृत्तांत....

लुकमान यांचा सत्य वृत्तांत.... *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  12 आम्ही लुकमान यास विवेक प्रदान केले होते. व त्यास असे सांगितले होते की, अल्लाहप्रति नेहमी कृतज्ञ राहा. जो कोणी (अल्लाहप्रति) कृतज्ञ राहील तर त्यात त्याचेच भले आहे. तसेच जो कोणी कृतघ्नतेचे प्रदर्शन करील तर अल्लाह स्वयंपूर्ण आहे (त्याला भक्तांच्या आभाराची गरज नाही), तोच आहे सदा स्तुतीस पात्र ! 13 लुकमान (जो एक विवेकशील माणूस होता एकदा) आपल्या मुलास उपदेश करताना म्हणाला, 'हे माझ्या मुलं ! कोणालाही (कधीही) अल्लाहचे समकक्ष ठरवू नकोस. कारण कोणालाही अल्लाहच्या ईश्वरत्वामध्ये सहभागी ठरविणे, फार मोठे अत्याचारी कृत्य आहे.'  14 (अल्लाह म्हणतो) 'आम्ही मानवाला त्याच्या आईवडलांच्या बाबतीत (भली वागणूक करण्याची) ताकीद दिली.' त्याच्या आईने त्याला दुःखावर दुःख सहन करून त्याला आपल्या पोटात ठेवले. मग दोन वर्षांपर्यंत तो पूर्णपणे तिच्यावर अवलंबून राहिला (म्हणजे दोन वर्षांपर्यंत ती त्याला अंगावर दूध पाजवीत राहिली). (आम्ही म्हणालो की, तू माझ्या आणि आपल्या आईवडिलांप्रति आभार व्यक्त क...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noha यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noah(नोहा) यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...  59  आम्ही नूह (अ.) ला त्याच्या लोकसमूहाकडे पाठविले त्याने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवांनो! अल्लाहची भक्ती करा, त्याच्याव्यतिरिक्त तुमचा कोणीही ईश्वर नाही. मला तुमच्याबाबतीत एका भयंकर दिवसाच्या प्रकोपाचे भय वाटते.’’ 60  त्याच्या जनसमूहातील सरदारांनी उत्तर दिले, ’’आम्ही तर असे पहतो की तुम्ही उघड पथभ्रष्टतेत अडकले आहात.’’ 61  नूह (अ.) ने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवानो! मी कोणत्याच पथभ्रष्टतेत पडलेलो नाही, उलट मी सर्व जगांच्या पालनकर्त्याचा प्रेषित आहे. 62  मी तुम्हाला आपल्या पालनकर्त्याचे संदेश पोहोचवितो व मी तुमचा हितचिंतक आहे आणि मला अल्लाहकडून ते सर्वकाही माहीत आहे जे तुम्हाला माहीत नाही. 63  काय तुम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की तुमच्यापाशी खुद्द तुमच्याच जातीबांधवांपैकी एका माणसाद्वारे तुमच्या पालनकर्त्याकडून स्मरण आले, जेणेकरून तुम्हाला सावध करावे आणि तुम्ही दुर्वर्तनापासून वाचावे आणि तुम्हावर कृपा केली जावी?’...

67 अल - मुल्क Dominion (The sovereignty)

67 अल - मुल्क Dominion(The sovereignty) *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1 असीम समृद्ध आहे तो, ज्याच्या हाती समस्त विश्वाची (ची) सत्ता आहे. प्रत्येक वस्तुमात्रावर त्याचेच नियंत्रण आहे. 2 त्यानेच तुमची कसोटी पाहण्यासाठी जीवन व मृत्यू निर्माण केले. तुमच्यापैकी कोण चांगली कामे करतो, (हे त्याला पाहायचे आहे). तो सर्वशक्तिमान (असूनही) फार क्षमाशील आहे. 3 ज्याने एकावर एक असे सात आकाश निर्माण  केले. कृपावंत (अल्लाहच्या) निर्मितीमध्ये तुम्हाला कोणताही दोष असल्याचे आढळून येणार नाही. (एकदा पाहिल्याने दोष न आढळल्यास) पुन्हा एकदा पाहा, की , तुम्हाला आढळतो का कुठे काही दोष ? 4 मग आणखी पुन्हा - पुन्हा पाहा, (प्रत्येक वेळेस) तुमच्या (दोष शोधणाऱ्या) नजरा थकून व निराश होऊन तुमच्याकडे परततील (पण अल्लाहच्या निर्मितीमध्ये दोष कुठेही आढळणार नाही). 5 आणि आम्ही पृथ्वीसाठी सर्वात जवळ असलेल्या आकाशाला दिव्यांनी सजवलेले आहे. आणि (वाईट हेतूने आपल्या मर्यादा ओलांडणाऱ्या) सैतानांना पिटाळून लावण्याचे त्यांना साधन बनविले आहे.आणि त्यांच्यासाठी धगधगत्या आगीची (भयंकर) शिक्षा तयार आहे. 6  ज...