78 अन-नबा *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1 लोक आपसात कोणत्या गोष्टीविषयी विचारणा करीत आहेत? 2 (पुरुत्थानाच्या) त्या महाभयानक गोष्टीविषयी? 3 ज्याबद्दल ते मतभेद बाळगून आहेत. 4 पण त्यांना लवकरच कळून येईल. 5 होय! त्यांना लवकरच कळून चुकेल. 6 आम्ही पृथ्वीला ( मानवजातीसाठी ) विश्रांतीचे स्थान नाही बनविले? 7 आणि पर्वतांना आधारस्तंभाप्रमाणे (नाही बनविले का )? 8 आणि आम्ही तुम्हाला जोड्या-जोड्यांच्या स्वरूपात निर्माण केले आहे. 9 आणि झोपेला तुमचा थकवा दूर करण्याचे साधन बनवले. 10 आणि रात्रीला आम्ही आवरण बनविले. 11 आणि दिवसाला जीवनप्रवास पुढे सुरु ठेवण्याचे माध्यम बनविले. 12 आणि आम्ही तुमच्यावर सात भक्कम आकाश निर्माण केले. 13 आणि ( आकाशात सूर्यरूपी) एक दीपक स्थापित केले. 14 आणि आम्ही वारे हाकून नेणाऱ्या जड ढगांतून विपुल प्रमाणात पाण्याचा वर्षाव करतो. 15 त्याद्वारे धान्य व वनस्पती आम्ही निर्माण करतो. 16 आणि घनदाट बागबगीचेही. 17 न्यायाच्या दिवसाची वेळ ठरलेली आहे, यात मुळीच शंका नाही. 18 ज्या दिवशी शिंग फुंकले जाईल आणि तुमचे ताफेचं ताफे येऊ लागतील. 19 आणि आ...
कुराण चे चॅप्टर्स 1-114