मुख्य सामग्रीवर वगळा

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noha यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...


प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noah(नोहा) यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ... 

59 आम्ही नूह (अ.) ला त्याच्या लोकसमूहाकडे पाठविले त्याने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवांनो! अल्लाहची भक्ती करा, त्याच्याव्यतिरिक्त तुमचा कोणीही ईश्वर नाही. मला तुमच्याबाबतीत एका भयंकर दिवसाच्या प्रकोपाचे भय वाटते.’’

60 त्याच्या जनसमूहातील सरदारांनी उत्तर दिले, ’’आम्ही तर असे पहतो की तुम्ही उघड पथभ्रष्टतेत अडकले आहात.’’

61 नूह (अ.) ने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवानो! मी कोणत्याच पथभ्रष्टतेत पडलेलो नाही, उलट मी सर्व जगांच्या पालनकर्त्याचा प्रेषित आहे.

62 मी तुम्हाला आपल्या पालनकर्त्याचे संदेश पोहोचवितो व मी तुमचा हितचिंतक आहे आणि मला अल्लाहकडून ते सर्वकाही माहीत आहे जे तुम्हाला माहीत नाही.

63 काय तुम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की तुमच्यापाशी खुद्द तुमच्याच जातीबांधवांपैकी एका माणसाद्वारे तुमच्या पालनकर्त्याकडून स्मरण आले, जेणेकरून तुम्हाला सावध करावे आणि तुम्ही दुर्वर्तनापासून वाचावे आणि तुम्हावर कृपा केली जावी?’’

64 परंतु त्यांनी त्याला नाकारले. सरतेशेवटी आम्ही त्याला व त्याच्या सोबत्यांना एका नावेतून सुटका दिली आणि त्या लोकांना बुडविले ज्यांनी आमची संकेतवचने खोटी ठरविली होती. निःसंशय ते आंधळे लोक होते.

(कुरआन 7:59-64)

================================================

25 (आणि अशीच परिस्थिती होती जेव्हा) आम्ही नूह (अ.) ला त्याच्या लोकांकडे पाठविले होते. (त्याने म्हटले) ’’मी तुम्हा लोकांना स्पष्टपणे खबरदार करतो,

26 की अल्लाहशिवाय इतर कोणाची भक्ती करू नका अन्यथा मला भीती आहे की तुम्हांवर एके दिवशी दुःखदायक प्रकोप कोसळेल.’’

27 उत्तरादाखल त्याच्या समुदायाचे पुढारी ज्यांनी त्याचे म्हणणे ऐकण्यास नकार दिला होता, म्हणाले, ’’आमच्या दृष्टीत तर तुम्ही यापेक्षा वेगळे काही नाही की तुम्ही केवळ एक मनुष्य आहात आमच्यासारखे आणि आम्ही पाहात आहोत की आमच्यापैकी केवळ त्या लोकांनी जे आमच्या येथे कनिष्ठ होते त्यांनी विचार न करता तुमचे अनुकरण स्वीकारले आहे आणि आम्हाला अशी कोणतीही गोष्ट आढळत नाही की ज्यांत तुम्ही लोक आमच्यापेक्षा काही पुढारलेले आहात, उलट आम्ही तर तुम्हाला खोटे समजतो.’’

28 त्याने म्हटले ’’हे देशबंधनो, जरा विचार तरी करा जर मी आपल्या पालनकर्त्याकडून एका स्पष्ट साक्षीवर अटळ होतो आणि त्याने मला आपल्या विशेष कृपेने देखील उपकृत केले. परंतु ती तुम्हाला दिसली नाही तर शेवटी आमच्याजवळ कोणते साधन आहे की तुम्ही मान्य करू इच्छित नाही आणि आम्ही जबरदस्तीने तुमच्या माथी मारावे?

29 आणि हे देशबंधुंनो, मी या कामासाठी तुमच्याकडून कोणताही माल मागत नाही, माझा मोबदला तर अल्लाहपाशी आहे, आणि मी त्या लोकांना पिटाळू शकत नाही ज्यांनी माझे ऐकले आहे, ते स्वतःच आपल्या पालनकर्त्याच्या पुढे हजर होणार आहेत परंतु मी पाहात आहे की तुम्ही अडाणीपणा करीत आहात.

30 आणि हे देशबंधुंनो, जर मी या लोकांना हाकलून लावले तर अल्लाहच्या तावडीतून मला वाचविण्यासाठी कोण येईल? तुम्हा लोकांना एवढी गोष्ट देखील कळत नाही का?

31 आणि मी तुम्हाला सांगत नाही की माझ्याजवळ अल्लाहचे खजिने आहेत, हे देखील सांगत नाही की मला परोक्षाचे ज्ञान आहे, हासुद्धा माझा दावा नाही की मी दूत आहे आणि हेदेखील मी सांगू शकत नाही की ज्या लोकांना तुमचे डोळे तुच्छतेने पाहतात त्यांना अल्लाहने कोणताच भलेपणा दिला नाही, त्यांची मनःस्थिती अल्लाहच अधिक चांगली जाणतो, जर मी असे म्हटले तर अत्याचारी ठरेन.’’

32 सरतेशेवटी ते लोक म्हणाले की, ’’हे नूह (अ.) तुम्ही आमच्याशी भांडण केले आणि आता खूप झाले. आता तर फक्त तो प्रकोप घेऊन या ज्याची तुम्ही आम्हाला धमकी देत आहात, जर तुम्ही खरे असाल.’’

33 नूह (अ.) ने उत्तर दिले, ’’तो तर अल्लाहच आणील जर त्याने इच्छिले आणि तुमच्यात ते सामर्थ्य नाही की तुम्ही त्याला रोखू शकाल.

34 आता जर मी तुमचे काही हितचिंतन करू इच्छिले तरी माझे हितचिंतन तुम्हाला कोणतेच लाभ देऊ शकणार नाही जेव्हा अल्लाहनेच तुम्हाला भटकविण्याचा इरादा केला असेल. तोच तुमचा पालनकर्ता आहे आणि त्याच्याकडे तुम्हाला परतावयाचे आहे.’’

36नूह (अ.) कडे दिव्य प्रकटन केले गेले की तुमच्या लोकांपैकी ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली, बस्स त्यांनीच ठेवली, आता कोणी मानणार नाही, त्यांच्या कृत्यांवर दुःख करण्याचे सोडून द्या

37 आणि आमच्या देखरेखीत आमच्या दिव्य प्रकटनानुसार एक नौका बनविण्यास प्रारंभ करा. आणि पहा ज्या लोकांनी अत्याचार केला आहे त्यांच्यासंबंधी माझ्याकडे कोणतीही शिफारस करू नका, हे सर्वच्यासर्व आता बुडणारे आहेत.

38 नूह (अ.) नौका बनवीत होता आणि त्याच्या जनसमूहाच्या सरदारांपैकी जो कोणी त्याच्या जवळून जात असे तो त्याची टिंगल उडवीत असे. त्याने सांगितले, ’’जर तुम्ही आमच्यावर हसत आहात तर आम्ही देखील तुमच्यावर हसत आहोत,

39 लवकरच तुम्हाला स्वतः कळून चुकेल की कोणावर तो प्रकोप येईल ज्याने त्याची नामुष्की होईल आणि कोणावर ती आपत्ती कोसळेल जी टाळता टळणार नाही.’’

40 येथपावेतो की जेव्हा आमचा हुकूम आला आणि तो तुफान उफाळला तेव्हा आम्ही सांगितले, ’’प्रत्येक जातीच्या प्राण्याची एक, एक जोडी नावेत ठेवा, आपल्या कुटुंबियांनादेखील, त्या व्यक्तींना सोडून ज्यांचा निर्देश अगोदरच केला गेला आहे. तिच्यात स्वार व्हा आणि त्या लोकांनासुद्धा बसवा ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे.’’

41 आणि थोडेच लोक होते ज्यांनी नूह (अ.) बरोबर श्रद्धा ठेवली होती. नूह (अ.) यांनी सांगितले, ’’स्वार व्हा यात, अल्लाहच्या नावानेच आहे हिचे चालणे आणि हिचे थांबणेसुद्धा, माझा पालनकर्ता मोठा क्षमाशील व कृपाळू आहे.’’

42 या लोकांना घेऊन नौका चालली होती आणि एक, एक लाट पर्वतासमान उसळत होती. नूह (अ.) चा मुलगा दूर अंतरावर होता. नूह (अ.) ने हाक देऊन सांगितले, ’’पुत्रा, आमच्याबरोबर स्वार हो, अश्रद्धावंतांबरोबर राहू नकोस.’’

43 त्याने उलट उत्तर दिले, ’’मी आताच एका पर्वतावर चढून जातो जो पाण्यापासून माझे रक्षण करील.’’ नूह (अ.) ने सांगितले, ’’आज कोणतीही वस्तू अल्लाहच्या आज्ञेतून वाचविणारी नाही, याशिवाय की अल्लाह एखाद्यावर दया दाखवील.’’ इतक्यात एक लाट दोघांच्यामध्ये आली आणि तो देखील बुडणार्‍यांमध्ये सामील झाला.

44 आज्ञा झाली, ’’हे पृथ्वी, आपले संपूर्ण पाणी गिळून टाक आणि हे आकाशा, थांब.’’ यावर पाणी जमिनीत ओसरले, निर्णय लावण्यात आला, नौका जुदीवर ठेपली आणि म्हटले गेले की दूर झाला अत्याचार्‍यांचा समूदाय.

45 नूह (अ.) ने आपल्या पालनकर्त्याला पुकारले. सांगितले, ’’हे पालनकर्त्या! माझा मुलगा माझ्या कुटुंबियांपैकी आहे आणि तुझा वायदा खरा आहे आणि तू सर्व सत्ताधीशापेक्षा मोठा व श्रेष्ठ सत्ताधीश आहेस.’’

46 उत्तरात फर्माविले गेले, ’’हे नूह (अ.)! तो तुझ्या कुटुंबियांपैकी नाही, तो तर एक दुराचारी आहे. म्हणून तू त्या गोष्टीची याचना माझ्याकडे करू नकोस ज्याची वास्तविकता तुला माहीत नाही, मी तुला उपदेश करतो की आपल्या स्वतःला अज्ञान्याप्रमाणे बनवू नकोस.’’

47. नूह (अ.) ने लगेच विनविले, ’’हे माझ्या पालनकर्त्या, मी तुझा आश्रय मागतो यापासून की ती गोष्ट तुझ्याजवळ मागावी जिचे ज्ञान मला नाही. जर तू मला माफ केले नाहीस आणि दया केली नाहीस तर मी नष्ट होऊन जाईन.’’

48. आज्ञा झाली, ’’हे नूह (अ.) उतर, आमच्याकडून सुरक्षा व समृद्धी आहे तुझ्यावर आणि त्या समुहावर जे तुझ्यासमवेत आहेत, आणि काही समूह असे देखील आहेत, ज्यांना आम्ही काही काळ जीवनसामग्री प्रदान करू मग त्यांना आमच्याकडून दुःखदायक यातना पोहचेल.’’

49. हे पैगंबर (स.), या परोक्षाच्या वार्ता आहेत ज्या आम्ही तुमच्याकडे दिव्यप्रकटन करीत आहोत. यापूर्वी तुम्ही त्यांना जाणत नव्हता आणि तुमचे लोक देखील. म्हणून संयम बाळगा, कार्याचा शेवट तर ईशपरायण लोकांसाठीच आहे.

(कुरआन 11:25-49)

========================================================

1 आम्ही नूह (अ.) ला त्याच्या राष्ट्राकडे पाठविले (या आदेशानिशी) की आपल्या राष्ट्राच्या लोकांना खबरदार करावे यापूर्वी की त्यांच्यावर एक यातनादायक प्रकोप कोसळेल.

त्याने सांगितले, ’’हे माझ्या राष्ट्रबांधवांनो, मी तुमच्यासाठी एक स्पष्टपणे खबरदार करणारा (पैगंबर) आहे (तुम्हाला सावध करतो) की

अल्लाहची भक्ती करा आणि त्याच्या कोपाचे भय बाळगा व माझी आज्ञा पाळा.

अल्लाह तुमच्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष करील आणि तुम्हाला एका ठराविक वेळेपर्यंत बाकी ठेवील, वास्तविकता अशी आहे की अल्लाहने निश्चित केलेली वेळ जेव्हा येऊन ठेपते तेव्हा ती टाळता येत नाही, जर तुम्हाला याचे ज्ञान झाले असते?

त्याने विनविले, ’’हे माझ्या पालनकर्त्या, मी आपल्या राष्ट्रातील लोकांना रात्रंदिवस हांक दिली

परंतु माझ्या हांकेने त्यांच्या पलायनातच वृद्धी केली

आणि ज्या ज्या वेळी मी त्यांना बोलाविले जेणेकरून तू त्यांना माफ करावे, त्यांनी कानात बोटे खुपसली आणि आपल्या वस्त्रांनी तोंडे झाकली आणि आपल्या चालीवर अडून बसले आणि मोठा गर्व केला.

मग मी त्यांना पुकारून व हाक देऊन आवाहन केले.

मग मी जाहीरपणेही त्यांच्यात प्रचार केला व गुपचुपगुपचुपदेखील समजाविले.

10 मी सांगितले, ’’आपल्या पालनकर्त्याची क्षमा मागा, निःसंदेह तो मोठा क्षमाशील आहे

11 तो तुमच्यावर आकाशांतून खूप पावसाचा वर्षाव करील.

12 तुम्हाला मालमत्ता आणि संततीने उपकृत करील. तुमच्यासाठी बागा निर्माण करील आणि तुमच्यासाठी कालवे प्रवाहीत करील.

13 तुम्हाला झाले तरी काय की अल्लाहसाठी तुम्ही कोणत्याही प्रतापाची अपेक्षा धरीत नाही?

14 वस्तुतः त्याने तर्‍हेतर्‍हेने तुम्हाला बनविले आहे.

15 काय पाहत नाही की कसे अल्लाहने सात आकाश थरावर थर बनविले

16 आणि त्यात चंद्राला प्रकाश व सूर्याला दीप बनविले? 

17 आणि अल्लाहने तुम्हाला जमिनीतून गवताप्रमाणे उगविले,

18 मग तो तुम्हाला याच जमिनीत परत नेईल आणि यातून अकस्मात तुम्हाला काढून उभे करील.

19 आणि अल्लाहने पृथ्वीला तुमच्यासाठी बिछान्याप्रमाणे अंथरले

20 जेणेकरून तुम्ही त्यात खुल्या मार्गाने वाटचाल करावी.’’

21 नूह (अ.) ने सांगितले, ’’माझ्या पालनकर्त्या, यांनी माझे म्हणणे रद्द केले आणि त्या (श्रीमंता) चे अनुकरण केले जे मालमत्ता व संतती लाभल्याने अधिकच विफल झाले आहेत.

22 या लोकांनी महाभयंकर कुटिलतेचे जाळे पसरून ठेवले आहे.

23 यांनी सांगितले, कदापि सोडू नका आपल्या उपास्यांना, आणि ’वद्द’ व ’सुवाअ’ यांनाही सोडू नका आणि यगूस व यऊक आणि नसरलादेखील.

24 यांनी बर्‍याचशा लोकांना मार्गभ्रष्ट केले आहे, आणि तूसुद्धा या अत्याचार्‍यांना पथभ्रष्टतेखेरीज इतर कोणत्याच गोष्टीत उन्नती देऊ नकोस.’’

25 आपल्या अपराधापायीच ते बुडवून टाकले गेले आणि अग्नीत झोकून दिले गेले, मग त्यांना स्वतःसाठी अल्लाहपासून वाचविणारा कोणीही सहायक आढळला नाही.

26 आणि नूह (अ.) ने सांगितले, ’’माझ्या पालनकर्त्या, या अश्रद्धावंतांपैकी पृथ्वीवर कोणी निवास करणारा सोडू नकोस.

27 जर तू यांना सोडून दिलेस तर हे तुझ्या दासांना पथभ्रष्ट करतील आणि यांच्या वंशात जो कोणी जन्मेल तो दुराचारी आणि कट्टर अश्रद्धावंतच असणार.

28 माझ्या पालनकर्त्या मला व माझ्या आईवडिलांना आणि त्या प्रत्येक माणसाला जो माझ्या घरात श्रद्धावंत म्हणून शिरला आहे आणि सर्व श्रद्धावंत पुरुषांना आणि स्त्रियांना क्षमा कर, आणि अत्याचार्‍यांसाठी विनाशाशिवाय अन्य कोणत्याही गोष्टीत वाढ करू नकोस.’’

(कुरआन 71:1-28)

========================================================


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लुकमान यांचा सत्य वृत्तांत....

लुकमान यांचा सत्य वृत्तांत.... *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  12 आम्ही लुकमान यास विवेक प्रदान केले होते. व त्यास असे सांगितले होते की, अल्लाहप्रति नेहमी कृतज्ञ राहा. जो कोणी (अल्लाहप्रति) कृतज्ञ राहील तर त्यात त्याचेच भले आहे. तसेच जो कोणी कृतघ्नतेचे प्रदर्शन करील तर अल्लाह स्वयंपूर्ण आहे (त्याला भक्तांच्या आभाराची गरज नाही), तोच आहे सदा स्तुतीस पात्र ! 13 लुकमान (जो एक विवेकशील माणूस होता एकदा) आपल्या मुलास उपदेश करताना म्हणाला, 'हे माझ्या मुलं ! कोणालाही (कधीही) अल्लाहचे समकक्ष ठरवू नकोस. कारण कोणालाही अल्लाहच्या ईश्वरत्वामध्ये सहभागी ठरविणे, फार मोठे अत्याचारी कृत्य आहे.'  14 (अल्लाह म्हणतो) 'आम्ही मानवाला त्याच्या आईवडलांच्या बाबतीत (भली वागणूक करण्याची) ताकीद दिली.' त्याच्या आईने त्याला दुःखावर दुःख सहन करून त्याला आपल्या पोटात ठेवले. मग दोन वर्षांपर्यंत तो पूर्णपणे तिच्यावर अवलंबून राहिला (म्हणजे दोन वर्षांपर्यंत ती त्याला अंगावर दूध पाजवीत राहिली). (आम्ही म्हणालो की, तू माझ्या आणि आपल्या आईवडिलांप्रति आभार व्यक्त क...

67 अल - मुल्क Dominion (The sovereignty)

67 अल - मुल्क Dominion(The sovereignty) *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1 असीम समृद्ध आहे तो, ज्याच्या हाती समस्त विश्वाची (ची) सत्ता आहे. प्रत्येक वस्तुमात्रावर त्याचेच नियंत्रण आहे. 2 त्यानेच तुमची कसोटी पाहण्यासाठी जीवन व मृत्यू निर्माण केले. तुमच्यापैकी कोण चांगली कामे करतो, (हे त्याला पाहायचे आहे). तो सर्वशक्तिमान (असूनही) फार क्षमाशील आहे. 3 ज्याने एकावर एक असे सात आकाश निर्माण  केले. कृपावंत (अल्लाहच्या) निर्मितीमध्ये तुम्हाला कोणताही दोष असल्याचे आढळून येणार नाही. (एकदा पाहिल्याने दोष न आढळल्यास) पुन्हा एकदा पाहा, की , तुम्हाला आढळतो का कुठे काही दोष ? 4 मग आणखी पुन्हा - पुन्हा पाहा, (प्रत्येक वेळेस) तुमच्या (दोष शोधणाऱ्या) नजरा थकून व निराश होऊन तुमच्याकडे परततील (पण अल्लाहच्या निर्मितीमध्ये दोष कुठेही आढळणार नाही). 5 आणि आम्ही पृथ्वीसाठी सर्वात जवळ असलेल्या आकाशाला दिव्यांनी सजवलेले आहे. आणि (वाईट हेतूने आपल्या मर्यादा ओलांडणाऱ्या) सैतानांना पिटाळून लावण्याचे त्यांना साधन बनविले आहे.आणि त्यांच्यासाठी धगधगत्या आगीची (भयंकर) शिक्षा तयार आहे. 6  ज...