80 अबस *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1(पैगंबराने) एवढ्यावरून कपाळाला आठ्या घातल्या व तोंड फिरविले. 2 की, एक आंधळा माणूस त्यांच्याकडे आला. 3 (पैगंबर !) तुम्हाला काय माहीत की, कदाचित (ईश्वरीय संदेश ग्रहण करून) तो सुधारू शकला असता, 4 किंवा त्याने उपदेश ऐकले असते, तर ते त्याच्यासाठी लाभदायी ठरू शकले असते. 5 जो मनुष्य (उपदेशांप्रति) अनास्था दाखवत होता. 6 तुम्ही मात्र त्याच्याकडे लक्ष देण्याच्या बाबतीत उत्सुक होता. 7 त्याने जर स्वतःची सुधारणा केली नाही, तर त्याबद्दल तुमच्यावर काही दोष येणार नाही. 8 पण जो मनुष्य तुमच्याकडे धावत येतो, (उपदेश ग्रहण करण्याच्या) उत्सुकतेसह. 9 आणि तो अल्लाहप्रति आदरयुक्त भय बाळगणारा आहे. 10 तुम्ही अशा माणसाकडे दुर्लक्ष करता. 11 निश्चितच हे (कुराण) एक बोधग्रंथ आहे. 12 तर हवे त्याने (यापासून) बोध ग्रहण करावे. 13 जो अशा पृष्ठांवर नमूद आहे, जी अर्थातच आदरास पात्र आहेत. 14 जी उच्चा दर्जाची व पवित्र आहेत. 15 अशा लिहिणाऱ्यांच्या हाती. 16 जे सन्माननीय व सदाचारी आहेत. 17 नाश पावो माणूस ! किती कृतघ्न आहे तो! 18 (अल्लाहने) त्यास कशापा...
कुराण चे चॅप्टर्स 1-114