मुख्य सामग्रीवर वगळा

80 अबस

 80 अबस

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 

1(पैगंबराने) एवढ्यावरून कपाळाला आठ्या घातल्या व तोंड फिरविले. 2 की, एक आंधळा माणूस त्यांच्याकडे आला. 3 (पैगंबर !) तुम्हाला काय माहीत की, कदाचित (ईश्वरीय संदेश ग्रहण करून) तो सुधारू शकला असता, 4 किंवा त्याने उपदेश ऐकले असते, तर ते त्याच्यासाठी लाभदायी ठरू शकले असते. 5 जो मनुष्य (उपदेशांप्रति) अनास्था दाखवत होता. 6 तुम्ही मात्र त्याच्याकडे लक्ष देण्याच्या बाबतीत उत्सुक होता. 7 त्याने जर स्वतःची सुधारणा केली नाही, तर त्याबद्दल तुमच्यावर काही दोष येणार नाही. 8 पण जो मनुष्य तुमच्याकडे धावत येतो, (उपदेश ग्रहण करण्याच्या) उत्सुकतेसह. 9 आणि तो अल्लाहप्रति आदरयुक्त भय बाळगणारा आहे. 10 तुम्ही अशा माणसाकडे दुर्लक्ष करता. 11 निश्चितच हे (कुराण) एक बोधग्रंथ आहे. 12 तर हवे त्याने (यापासून) बोध ग्रहण करावे. 13 जो अशा पृष्ठांवर नमूद आहे, जी अर्थातच आदरास पात्र आहेत. 14 जी उच्चा दर्जाची व पवित्र आहेत. 15 अशा लिहिणाऱ्यांच्या हाती. 16 जे सन्माननीय व सदाचारी आहेत. 

17 नाश पावो माणूस ! किती कृतघ्न आहे तो! 18 (अल्लाहने) त्यास कशापासून निर्माण केले ? 19 वीर्याच्या एका बिंदूपासून ! त्यास तो निर्माण करतो आणि त्याची स्वभाववैशिष्टे निश्चित करतो. 20 आणि त्याच्यासाठी (जीवनाचा)मार्ग सुकर करतो. 21 आणि शेवटी त्यास मृत्यू देऊन कबरीत पोचवतो. 22 आणि मग जेव्हा तो इच्छिल त्यास पुन्हा जिवंत करून उभा करेल. 23 तरीही माणूस त्याच्या आदेशांनुसार कृती करण्यास नकार देतो (जो माणसाचा सर्वप्रकारे कर्ताकरविता आहे. 24 माणसाने आपल्या अन्नाकडे पाहावे (ते त्याला कसे उपलब्ध करून दिले जाते, त्यावर त्याने चिंतन करावे.) 25 आम्ही कसे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वर्षाव करतो ). 26 आणि मग आम्ही जमिनीला फाडून (नवीन वनस्पती निर्माण करतो). 27 मग आम्ही तिच्यातून धान्य उगवितो. 28 आणि द्राक्षे व भाजीपाला. 29 आणि जैतून व खजूर. 30 आणि घनदाट बागा. 31आणि फळे व चारा. 32 तुमच्या व तुमच्या गुराढोरांसाठी उपजिविकेचे साधन म्हणून.

33 जेव्हा कान बहिरे करणारा प्रचंड आवाज होईल. 34 (तो पुनरुत्थानाचा दिवस असेल) ज्या दिवशी मनुष्य आपल्या भावापासून दूर पळेल. 35 आणि आपल्या आई -वडिलांपासून आणि 36 आपली पत्नी व मुले यांच्यापासून. 37 त्या दिवशी प्रत्येक जण स्वतःचीच अशी चिंता करीत असेल की, दुसऱ्याकडे लक्ष देण्याचा विचार त्याच्या मनात येणार नाही. 38 काही चेहरे त्या दिवशी प्रफुल्लित असतील. 39 हसत असतील, आनंद साजरा करीत असतील. 40 आणि त्या दिवशी काही चेहरे धुळीने माखलेले असतील. 41 त्यांच्यावर उदासीनता पसरलेली असेल. 42 हेच लोक सत्य नाकारणारे दुराचारी होते. 

===========================

अनुवादक -अब्दुर रहमान चाऊस, नांदेड 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लुकमान यांचा सत्य वृत्तांत....

लुकमान यांचा सत्य वृत्तांत.... *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  12 आम्ही लुकमान यास विवेक प्रदान केले होते. व त्यास असे सांगितले होते की, अल्लाहप्रति नेहमी कृतज्ञ राहा. जो कोणी (अल्लाहप्रति) कृतज्ञ राहील तर त्यात त्याचेच भले आहे. तसेच जो कोणी कृतघ्नतेचे प्रदर्शन करील तर अल्लाह स्वयंपूर्ण आहे (त्याला भक्तांच्या आभाराची गरज नाही), तोच आहे सदा स्तुतीस पात्र ! 13 लुकमान (जो एक विवेकशील माणूस होता एकदा) आपल्या मुलास उपदेश करताना म्हणाला, 'हे माझ्या मुलं ! कोणालाही (कधीही) अल्लाहचे समकक्ष ठरवू नकोस. कारण कोणालाही अल्लाहच्या ईश्वरत्वामध्ये सहभागी ठरविणे, फार मोठे अत्याचारी कृत्य आहे.'  14 (अल्लाह म्हणतो) 'आम्ही मानवाला त्याच्या आईवडलांच्या बाबतीत (भली वागणूक करण्याची) ताकीद दिली.' त्याच्या आईने त्याला दुःखावर दुःख सहन करून त्याला आपल्या पोटात ठेवले. मग दोन वर्षांपर्यंत तो पूर्णपणे तिच्यावर अवलंबून राहिला (म्हणजे दोन वर्षांपर्यंत ती त्याला अंगावर दूध पाजवीत राहिली). (आम्ही म्हणालो की, तू माझ्या आणि आपल्या आईवडिलांप्रति आभार व्यक्त क...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noha यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noah(नोहा) यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...  59  आम्ही नूह (अ.) ला त्याच्या लोकसमूहाकडे पाठविले त्याने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवांनो! अल्लाहची भक्ती करा, त्याच्याव्यतिरिक्त तुमचा कोणीही ईश्वर नाही. मला तुमच्याबाबतीत एका भयंकर दिवसाच्या प्रकोपाचे भय वाटते.’’ 60  त्याच्या जनसमूहातील सरदारांनी उत्तर दिले, ’’आम्ही तर असे पहतो की तुम्ही उघड पथभ्रष्टतेत अडकले आहात.’’ 61  नूह (अ.) ने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवानो! मी कोणत्याच पथभ्रष्टतेत पडलेलो नाही, उलट मी सर्व जगांच्या पालनकर्त्याचा प्रेषित आहे. 62  मी तुम्हाला आपल्या पालनकर्त्याचे संदेश पोहोचवितो व मी तुमचा हितचिंतक आहे आणि मला अल्लाहकडून ते सर्वकाही माहीत आहे जे तुम्हाला माहीत नाही. 63  काय तुम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की तुमच्यापाशी खुद्द तुमच्याच जातीबांधवांपैकी एका माणसाद्वारे तुमच्या पालनकर्त्याकडून स्मरण आले, जेणेकरून तुम्हाला सावध करावे आणि तुम्ही दुर्वर्तनापासून वाचावे आणि तुम्हावर कृपा केली जावी?’...

67 अल - मुल्क Dominion (The sovereignty)

67 अल - मुल्क Dominion(The sovereignty) *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1 असीम समृद्ध आहे तो, ज्याच्या हाती समस्त विश्वाची (ची) सत्ता आहे. प्रत्येक वस्तुमात्रावर त्याचेच नियंत्रण आहे. 2 त्यानेच तुमची कसोटी पाहण्यासाठी जीवन व मृत्यू निर्माण केले. तुमच्यापैकी कोण चांगली कामे करतो, (हे त्याला पाहायचे आहे). तो सर्वशक्तिमान (असूनही) फार क्षमाशील आहे. 3 ज्याने एकावर एक असे सात आकाश निर्माण  केले. कृपावंत (अल्लाहच्या) निर्मितीमध्ये तुम्हाला कोणताही दोष असल्याचे आढळून येणार नाही. (एकदा पाहिल्याने दोष न आढळल्यास) पुन्हा एकदा पाहा, की , तुम्हाला आढळतो का कुठे काही दोष ? 4 मग आणखी पुन्हा - पुन्हा पाहा, (प्रत्येक वेळेस) तुमच्या (दोष शोधणाऱ्या) नजरा थकून व निराश होऊन तुमच्याकडे परततील (पण अल्लाहच्या निर्मितीमध्ये दोष कुठेही आढळणार नाही). 5 आणि आम्ही पृथ्वीसाठी सर्वात जवळ असलेल्या आकाशाला दिव्यांनी सजवलेले आहे. आणि (वाईट हेतूने आपल्या मर्यादा ओलांडणाऱ्या) सैतानांना पिटाळून लावण्याचे त्यांना साधन बनविले आहे.आणि त्यांच्यासाठी धगधगत्या आगीची (भयंकर) शिक्षा तयार आहे. 6  ज...