मुख्य सामग्रीवर वगळा

81 अत- तकवीर

 81 अत- तकवीर 

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 

1 जेव्हा सूर्य गुंडाळून टाकला जाईल. 2 आणि जेव्हा तारे तेजशून्य होतील. 3 आणि जेव्हा पर्वतांना चालविले जाईल. 4 आणि जेव्हा दहा महिन्यांचा गर्भ असलेल्या उंटिणी मोकाट सोडून दिल्या जातील. 5 जेव्हा जंगली जनावरांना एकत्र आणले जाईल. 6 आणि जेव्हा (सुनामीप्रमाणे) समुद्र खवळतील. 7 जेव्हा सर्व लोकांची (त्यांच्या कृत्यांनुसार) विविध गटांत विभागणी केली जाईल. 8 आणि जेव्हा जिवंत गाडल्या गेलेल्या तान्ह्या मुलीला विचारले जाईल. 9 कोणत्या अपराधापोटी तिला मारून टाकण्यात आले? 10 आणि जेव्हा लोकांचे कर्मपत्र उघडले जातील. 11 जेव्हा आकाशाचे आवरण खेचून त्यास उघडे केले जाईल. 12 आणि जेव्हा नरकाची आग भडकविली जाईल. 13 जेव्हा स्वर्ग जवळ आणले जाईल. 14 तेव्हा प्रत्येकाला नीट कळून जाईल की, त्याने स्वतःसाठी काय तयार केलेले आहे. 

15 मी मागे हटणाऱ्या ताऱ्यांना साक्ष ठेवतो. 16 त्या ग्रहांनाही जे आपल्या कक्षेत फिरतात व अस्त पावतात. 17 आणि त्या रात्रीचीही (शपथ) जी सरत असते. 18 आणि त्या पहाटेची, जेव्हा ती उदय पावते ( मी या सर्व गोष्टींची शपथ घेऊन, म्हणजे त्यांना साक्षी बनवून सांगतो). 19 की, हे कुराण एका आदरणीय पैगंबराकडे प्रकट केलेली ईश्वरवाणी होय. 20 सामर्थ्यशाली असा, सृष्टीच्या महासिंहासनावर आरूढ असलेल्या अल्लाहकडे सन्माननीय असा (ग्रंथ). 21 तेथे त्याच्या आज्ञेचे पालन केले जाते. आणि तो विश्वासपात्र आहे. 22 (मक्केतील लोकांनो !) तुमचा( हा ) साथी वेडा नाही. 23 पैगंबराने (हा ग्रंथ अल्लाहकडून आणणाऱ्या स्वर्गदूताला ) खुल्या क्षितिजावर पाहिले, हे सत्य आहे. 24 कोणाचीही बुद्धी जिथे पोचू शकत नाही अशा अदृश्य गोष्टी जाणण्यासाठी तो (पैगंबर) काही हपापलेला नाही. 25 हे कुराण काही शापित सैतानाची वाणी नाही (तर शुद्ध ' अल्लाहची वाणी' आहे.) 26 मग तुम्ही लोक कुठे (भटकत) जात आहात ? 27 हा केवळ उपदेशपर संदेश आहे, समस्त मानवजातीसाठी. 28 तुमच्यामधील त्या प्रत्येक माणसासाठी जो सरळ मार्गांचा अवलंब करू इच्छितो. 29 पण तुम्ही तोपर्यंत त्या गोष्टीची इच्छा करू शकत नाही, जोपर्यंत सर्व जगांचा पालनकर्ता असलेला अल्लाह ती इच्छित नाही. 

================================

अनुवादक- अब्दुर -रहमान चाऊस, नांदेड. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लुकमान यांचा सत्य वृत्तांत....

लुकमान यांचा सत्य वृत्तांत.... *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  12 आम्ही लुकमान यास विवेक प्रदान केले होते. व त्यास असे सांगितले होते की, अल्लाहप्रति नेहमी कृतज्ञ राहा. जो कोणी (अल्लाहप्रति) कृतज्ञ राहील तर त्यात त्याचेच भले आहे. तसेच जो कोणी कृतघ्नतेचे प्रदर्शन करील तर अल्लाह स्वयंपूर्ण आहे (त्याला भक्तांच्या आभाराची गरज नाही), तोच आहे सदा स्तुतीस पात्र ! 13 लुकमान (जो एक विवेकशील माणूस होता एकदा) आपल्या मुलास उपदेश करताना म्हणाला, 'हे माझ्या मुलं ! कोणालाही (कधीही) अल्लाहचे समकक्ष ठरवू नकोस. कारण कोणालाही अल्लाहच्या ईश्वरत्वामध्ये सहभागी ठरविणे, फार मोठे अत्याचारी कृत्य आहे.'  14 (अल्लाह म्हणतो) 'आम्ही मानवाला त्याच्या आईवडलांच्या बाबतीत (भली वागणूक करण्याची) ताकीद दिली.' त्याच्या आईने त्याला दुःखावर दुःख सहन करून त्याला आपल्या पोटात ठेवले. मग दोन वर्षांपर्यंत तो पूर्णपणे तिच्यावर अवलंबून राहिला (म्हणजे दोन वर्षांपर्यंत ती त्याला अंगावर दूध पाजवीत राहिली). (आम्ही म्हणालो की, तू माझ्या आणि आपल्या आईवडिलांप्रति आभार व्यक्त क...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noha यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noah(नोहा) यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...  59  आम्ही नूह (अ.) ला त्याच्या लोकसमूहाकडे पाठविले त्याने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवांनो! अल्लाहची भक्ती करा, त्याच्याव्यतिरिक्त तुमचा कोणीही ईश्वर नाही. मला तुमच्याबाबतीत एका भयंकर दिवसाच्या प्रकोपाचे भय वाटते.’’ 60  त्याच्या जनसमूहातील सरदारांनी उत्तर दिले, ’’आम्ही तर असे पहतो की तुम्ही उघड पथभ्रष्टतेत अडकले आहात.’’ 61  नूह (अ.) ने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवानो! मी कोणत्याच पथभ्रष्टतेत पडलेलो नाही, उलट मी सर्व जगांच्या पालनकर्त्याचा प्रेषित आहे. 62  मी तुम्हाला आपल्या पालनकर्त्याचे संदेश पोहोचवितो व मी तुमचा हितचिंतक आहे आणि मला अल्लाहकडून ते सर्वकाही माहीत आहे जे तुम्हाला माहीत नाही. 63  काय तुम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की तुमच्यापाशी खुद्द तुमच्याच जातीबांधवांपैकी एका माणसाद्वारे तुमच्या पालनकर्त्याकडून स्मरण आले, जेणेकरून तुम्हाला सावध करावे आणि तुम्ही दुर्वर्तनापासून वाचावे आणि तुम्हावर कृपा केली जावी?’...

67 अल - मुल्क Dominion (The sovereignty)

67 अल - मुल्क Dominion(The sovereignty) *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1 असीम समृद्ध आहे तो, ज्याच्या हाती समस्त विश्वाची (ची) सत्ता आहे. प्रत्येक वस्तुमात्रावर त्याचेच नियंत्रण आहे. 2 त्यानेच तुमची कसोटी पाहण्यासाठी जीवन व मृत्यू निर्माण केले. तुमच्यापैकी कोण चांगली कामे करतो, (हे त्याला पाहायचे आहे). तो सर्वशक्तिमान (असूनही) फार क्षमाशील आहे. 3 ज्याने एकावर एक असे सात आकाश निर्माण  केले. कृपावंत (अल्लाहच्या) निर्मितीमध्ये तुम्हाला कोणताही दोष असल्याचे आढळून येणार नाही. (एकदा पाहिल्याने दोष न आढळल्यास) पुन्हा एकदा पाहा, की , तुम्हाला आढळतो का कुठे काही दोष ? 4 मग आणखी पुन्हा - पुन्हा पाहा, (प्रत्येक वेळेस) तुमच्या (दोष शोधणाऱ्या) नजरा थकून व निराश होऊन तुमच्याकडे परततील (पण अल्लाहच्या निर्मितीमध्ये दोष कुठेही आढळणार नाही). 5 आणि आम्ही पृथ्वीसाठी सर्वात जवळ असलेल्या आकाशाला दिव्यांनी सजवलेले आहे. आणि (वाईट हेतूने आपल्या मर्यादा ओलांडणाऱ्या) सैतानांना पिटाळून लावण्याचे त्यांना साधन बनविले आहे.आणि त्यांच्यासाठी धगधगत्या आगीची (भयंकर) शिक्षा तयार आहे. 6  ज...