मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

उल्का लेबलसह पोस्ट दाखवत आहे

81 अत- तकवीर

 81 अत- तकवीर  *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  1 जेव्हा सूर्य गुंडाळून टाकला जाईल. 2 आणि जेव्हा तारे तेजशून्य होतील. 3 आणि जेव्हा पर्वतांना चालविले जाईल. 4 आणि जेव्हा दहा महिन्यांचा गर्भ असलेल्या उंटिणी मोकाट सोडून दिल्या जातील. 5 जेव्हा जंगली जनावरांना एकत्र आणले जाईल. 6 आणि जेव्हा (सुनामीप्रमाणे) समुद्र खवळतील. 7 जेव्हा सर्व लोकांची (त्यांच्या कृत्यांनुसार) विविध गटांत विभागणी केली जाईल. 8 आणि जेव्हा जिवंत गाडल्या गेलेल्या तान्ह्या मुलीला विचारले जाईल. 9 कोणत्या अपराधापोटी तिला मारून टाकण्यात आले? 10 आणि जेव्हा लोकांचे कर्मपत्र उघडले जातील. 11 जेव्हा आकाशाचे आवरण खेचून त्यास उघडे केले जाईल. 12 आणि जेव्हा नरकाची आग भडकविली जाईल. 13 जेव्हा स्वर्ग जवळ आणले जाईल. 14 तेव्हा प्रत्येकाला नीट कळून जाईल की, त्याने स्वतःसाठी काय तयार केलेले आहे.  15 मी मागे हटणाऱ्या ताऱ्यांना साक्ष ठेवतो. 16 त्या ग्रहांनाही जे आपल्या कक्षेत फिरतात व अस्त पावतात. 17 आणि त्या रात्रीचीही (शपथ) जी सरत असते. 18 आणि त्या पहाटेची, जेव्हा ती उदय पावते ( मी या सर्व गोष्टींची शप...

74अल मुद्दस्सीर (One wrapped up)

74 अल मुद्दस्सीर *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  1 स्वतःवर चादर पांघरून असलेल्या (पैगंबरा!) 2 उठ आणि लोकांना सावध कर. 3 आणि आपल्या  पालनकर्त्याचे स्तुतीगान कर. 4 आपली वस्त्रे स्वच्छ ठेव. 5 आणि सर्व प्रकारच्या अपवित्रतेपासून स्वतःला दूर ठेव. 6 आणि परोपकारी कृत्य करून बदल्यात अधिक प्राप्त करण्याची इच्छा बाळगू नको. 7 (संदेश पोचविताना, जे विघ्न  येतील) ते आपल्या  पालनकर्त्याखातर सहन कर.  8 मग जेव्हा (पुनरुत्थानाचे) शिंग फुंकण्यात येईल. 9 तो फार कठीण दिवस असेल. 10 सत्य नाकारत राहिलेल्या लोकांसाठी मुळीच सुखकर असणार नाही. 11 त्याच्याबरोबर मला एकटा सोडा, ज्याला मी निर्माण केलेले आहे (त्याला मी पाहून घेईन). 12 आणि त्याला मी विपुल प्रमाणात धनसंपत्ती दिली. 13 आणि त्याच्याबरोबर असणारी मुले. 14 आणि त्याच्यासाठी सर्व प्रकारची साधने उपलब्ध केली. 15 पण तो (माझे आभार म्हणण्याऐवजी,) मी त्याला आणखी जास्त द्यावे, अशी लालसा बाळगतो. 16 कदापि नाही! तो तर आमच्या संदेशांचा शत्रू आहे. 17 लवकरच मी त्याला अशा पर्वतावर चढायला लावीन, (ज्यावर चढून त्याचे) फार वाईट हाल ह...

73 अल - मुज्जम्मिल (Folded in Garments)

73 अल - मुज्जम्मिल  *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  1 स्वतःवर चादर पांघरून असलेल्या (हे पैगंबर!) 2 रात्रीच्या समयी (नमाजामध्ये अल्लाहसमोर) उभे राहा, रात्रीचा काही भाग. 3 (म्हणजे) रात्रीचा अर्धा भाग किंवा त्यापेक्षा काही कमी. 4 किंवा त्यापेक्षा थोडासा अधिक. कुराणाचे पठण करताना, सावकाश पण विचारपूर्वक (पठण) करा. 5 आम्ही तुमच्यावर (आमचे संदेश पोचविण्याचे) फार मोठे दायित्व सोपवीत आहोत (तर त्यासाठी तुम्ही तयार असा.) 6 निश्चितच, रात्रीच्या समयी (प्रार्थनेसाठी) उठणे कठीण (असले तरी) स्वतःच्या मनावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. आणि तेव्हा (प्रार्थनाही) मनापासून (माणूस) करू शकतो.  7 कारण दिवसा तुम्हाला (संदेश पोचविण्याच्या जबाबदारी संबंधाने) बरीच कामे असतात. 8 (दिवस असो वा रात्र) आपल्या पालनकर्त्याच्या नावाचे (प्रत्येक प्रसंगी) स्मरण करीत राहा आणि संपूर्ण निष्ठेने त्याच्याप्रती समर्पित असा. 9 तो पूर्व आणि पश्चिम यांचा (म्हणजे संपूर्ण जगाचा) मालक आहे. त्याच्याशिवाय दुसरा कोणीच उपासनेयोग्य नाही. म्हणून त्यालाच तुम्ही आपला साम्भाळकर्ता...

72अल - जिन्न (The jinn)

72 अल  - जिन्न  *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  1 (पैगंबर!) लोकांना सांगा, ' माझ्याकडे असा संदेश प्रकट करण्यात आला आहे की, जिन्नच्या  एका समूहाने या कुराणास ऐकले, तेव्हा ते आपल्या (साथीदारांना) म्हणाले, "आम्ही (अगदी) भारावून टाकणारे असे कुराण ऐकले आहे. 2 जो सन्मार्ग दाखवणारा आहे, आणि म्हणून आम्ही त्यावर श्रद्धा धारण केली, आणि आम्ही कोणालाही आमच्या पालनकर्त्याचे समकक्ष ठरविणार नाही. 3 आमच्या पालनकर्त्याची  महिमा फार मोठी आहे. त्याने स्वतःसाठी ना पत्नी बनविली, ना पुत्र. 4 आमच्यातील मूर्ख अल्लाहविषयी काही असत्य व निराधार विधाने करीत असत. 5 आम्हाला तर वाटले होते, माणूस व जिन्न अल्लाहविषयी खोट्या गोष्टी कधीही उच्चारणार नाहीत. 6 माणसांमध्ये काही असे होते, जे भूतकाळात जिन्नपैकी काहींचा आश्रय मागायचे, असे करून त्यांनी केवळ त्या जिन्नांच्या गर्वात वाढ केली होती. 7 आणि जसे तुम्हाला वाटत होते, तसेच त्यांनाही वाटत होते की, अल्लाहने कधीही कोणालाही पैगंबर बनवून पाठविलेले नाही (ना पुढे पाठवेल.)  8 आम्ही आकाशाकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला ...