मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

संपत्ती लेबलसह पोस्ट दाखवत आहे

79 अन - नाजिआत

79 अन - नाजिआत  *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  1 त्या ( वाऱ्यांची) शपथ जे प्रचंड शक्तीने सर्व काही उपटून काढतात. 2 आणि त्या वाऱ्यांची जे हळुवार वाहतात. 3 आणि त्या ( ढगांची,) जे वेगाने तरंगत असतात. 4 आणि त्यांची, जे एकमेकांच्या पुढे जातात. 5 त्यांची, जे ( निर्मात्याच्या ) आदेशांना अमलात आणतात. 6 ज्या दिवशी भयानक भूकंपाने ( संपूर्ण पृथ्वी ) हादरून जाईल. 7 आणि त्या पाठोपाठ ( आणखी ) हादरे बसतील. 8 त्या दिवशी ( लोकांची) हृदये ( त्या दहशतीमुळे वेगाने) धडधडू लागतील. 9 त्यांच्या नजरा खाली खिळलेल्या असतील. 10 ( पुनरुत्थानास नाकारणारे) म्हणतात, '(मृत्यूनंतर) आम्हाला (जिवंत करून) पुन्हा पूर्वीच्या स्थितीत आणले जाणार का? 11 जेव्हा आम्ही जीर्ण हाडे बनलेले असू?' 12 ते म्हणतात, 'असे झाले, तर ते परतणे, नुकसानाची गोष्ट असेल. 13 ' (पण जेव्हा ती शेवटची घटका त्यांच्यावर येईल,) एका जोराची हाकाटी असेल. 14 आणि लगेच, ते ( सर्व जीर्ण हाडे झालेले) मैदानात हजर होतील! 15 तुम्हाला मूसाचा वृत्तांत पोचला का? 16 जेव्हा त्याच्या पालनकर्त्याने तुवाच्या पवित्र खोऱ्यापाशी त्यास हाक...

74अल मुद्दस्सीर (One wrapped up)

74 अल मुद्दस्सीर *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  1 स्वतःवर चादर पांघरून असलेल्या (पैगंबरा!) 2 उठ आणि लोकांना सावध कर. 3 आणि आपल्या  पालनकर्त्याचे स्तुतीगान कर. 4 आपली वस्त्रे स्वच्छ ठेव. 5 आणि सर्व प्रकारच्या अपवित्रतेपासून स्वतःला दूर ठेव. 6 आणि परोपकारी कृत्य करून बदल्यात अधिक प्राप्त करण्याची इच्छा बाळगू नको. 7 (संदेश पोचविताना, जे विघ्न  येतील) ते आपल्या  पालनकर्त्याखातर सहन कर.  8 मग जेव्हा (पुनरुत्थानाचे) शिंग फुंकण्यात येईल. 9 तो फार कठीण दिवस असेल. 10 सत्य नाकारत राहिलेल्या लोकांसाठी मुळीच सुखकर असणार नाही. 11 त्याच्याबरोबर मला एकटा सोडा, ज्याला मी निर्माण केलेले आहे (त्याला मी पाहून घेईन). 12 आणि त्याला मी विपुल प्रमाणात धनसंपत्ती दिली. 13 आणि त्याच्याबरोबर असणारी मुले. 14 आणि त्याच्यासाठी सर्व प्रकारची साधने उपलब्ध केली. 15 पण तो (माझे आभार म्हणण्याऐवजी,) मी त्याला आणखी जास्त द्यावे, अशी लालसा बाळगतो. 16 कदापि नाही! तो तर आमच्या संदेशांचा शत्रू आहे. 17 लवकरच मी त्याला अशा पर्वतावर चढायला लावीन, (ज्यावर चढून त्याचे) फार वाईट हाल ह...

69अल -हाक्का (The Sure Reality)

69अल -हाक्का (The Sure Reality) *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  1 ती अटळरित्या घडणारी घटका. 2 काय आहे ती अटळ घटका? 3 ती अटळ घटका काय आहे, हे तुम्हाला कशामुळे ज्ञात होईल? 4 समूद व आद या जमातींनी अचानकपणे आदळणाऱ्या  आपत्तीला खोटे ठरविले होते. 5 समूद ही जमात एका भयंकर स्फोटाने नष्ट केली गेली. 6 आणि आद ही जमात देखील बेफाम अशा वादळाद्वारे नष्ट केली गेली. 7 त्याद्वारे अल्लाहने सात रात्री व आठ दिवस त्यांना अखंडपणे वेढून ठेवले. पाहणारा पाहू शकतो की, ते तिथे असे पालथे पडलेले आहेत की, जणू ते खजुरीच्या वृक्षाच्या खाली पडलेल्या फांद्या आहेत. 8 तुम्हाला आता त्यांचे कोणतेही अवशेष दिसतात का? 9 अशाचप्रकारे फिरऔनने आणि त्याच्या पूर्वीच्या लोकांनी, तसेच उलथवून टाकलेल्या वस्त्यांमधील लोकांनीही अपराधी कृत्ये केली होती. 10 त्यांनी आपल्या पालनकर्त्याकडून आलेल्या पैगंबराची अवज्ञा केली. परिणामी (शेवटी) अल्लाहने त्यांना कठोरपणे फैलावर घेतले. 11 (लोकांनो! जेव्हा नूहच्या काळात) जेव्हा पाण्याने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या, तेव्हा आम्हीच तरंगत्या नौकेत तुम्हाला (म्हणजेच ...

68अल -कलम (The Pen or Nun)

68 अल -कलम (The Pen or Nun) *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  1 नून  लेखणीची शपथ , आणि ते जे काही (लेखणीने) लिहितात (त्याची शपथ).  2 (पैगंबर !) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कृपेने वेडसर नाही आहात. 3 निश्चितच, तुमच्यासाठी कधीही न संपणारे चांगले प्रतिफळ आहे. 4 सद्वर्तनाच्या बाबतीत तुम्ही आदर्श आहात , यात मुळीच शंका नाही. 5 लवकरच तुम्हीही पाहाल आणि तेही  पाहतील की........ 6 तुमच्यापैकी वेडाने झपाटलेला कोण होता. 7 तुमचा  पालनकर्ताच चांगल्याप्रकारे जाणतो की, कोण त्याच्या मार्गापासून ढळला आहे. आणि कोण त्याच्या मार्गावर आढळपणे मार्गस्थ आहे, हेही त्याला चांगले ठाऊक  आहे.  8 म्हणून तुम्ही सत्य नाकारणाऱ्यांच्या (आवडी-निवडीच्या) प्रभावात येऊ नका. 9 ते तर अशी इच्छा बाळगून आहेत की, तुम्ही थोडे नमते घ्यावे आणि तेही थोडे नमते घेतील. 10 तुम्ही सारख्या शपथा घेऊन बोलणाऱ्या नीच माणसाचे म्हणणे मान्य मारू नका. (त्यावर विश्वास करू नका). 11 आणि जो (माघारी कोणाचीही) निंदानालस्ती व चहाड्या करीत फिरतो. 12 आणि जो सत्कृत्यांस प्रतिबंध करणारा, मर्यादांचे उल्ल...

70अल- मआरिज (The ways of Ascent)

 70 अल - मआरिज (The ways of Ascent) *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  1 त्या अटळ शिक्षेविषयी शंका घेणाऱ्याने ती (लवकर) यावी म्हणून मागणी केली. 2 सत्य नाकारणाऱ्या लोकांपासून तिला कोणीही दूर सारू शकत नाही. 3 जेव्हा ती अल्लाहकडून येईल, जो सदैव उंच असणाऱ्या प्रमुख स्थानांचा मालक आहे. 4 त्याच्याकडे स्वर्गदूत व जिब्रील (प्रमुख स्वर्गदूतांपैकी एक)(दररोज) चढून जात असतात. जो दिवस (म्हणजे पृथ्वीवरील) पन्नास हजार वर्षांचा असल्याप्रमाणे असतो. 5 (श्रद्धावंतांनो!) तुम्ही सहनशीलतेचा अंगीकार करा, ---- सकारात्मक सहनशीलतेचा. 6 लोकांना (न्यायाचा दिवस) फार दूर असल्याचे वाटते. 7 पण आम्ही त्यास फार जवळ असल्याचे पाहत आहोत. 8 त्या दिवशी आकाश वितळलेल्या तांब्यासारखे (लाल) होईल. 9 आणि पर्वत लोकरीच्या पिंजलेल्या पुंजक्याप्रमाणे होईल. 10 आणि कोणीही मित्र आपल्या मित्राविषयी विचारपूस (देखील) करणार नाही. 11 जरी ते एकमेकांना समोर पाहतील (तरीही कोणी कोणाला विचारणार नसेल), तेव्हा अपराधी माणसामध्ये (एका प्रकारची व्यर्थ) इच्छा जागृत होईल की, त्या दिवसाच्या शिक्षेपासून सर्...