मुख्य सामग्रीवर वगळा

79 अन - नाजिआत

79 अन - नाजिआत 
*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 
1 त्या ( वाऱ्यांची) शपथ जे प्रचंड शक्तीने सर्व काही उपटून काढतात. 2 आणि त्या वाऱ्यांची जे हळुवार वाहतात. 3 आणि त्या ( ढगांची,) जे वेगाने तरंगत असतात. 4 आणि त्यांची, जे एकमेकांच्या पुढे जातात. 5 त्यांची, जे ( निर्मात्याच्या ) आदेशांना अमलात आणतात. 6 ज्या दिवशी भयानक भूकंपाने ( संपूर्ण पृथ्वी ) हादरून जाईल. 7 आणि त्या पाठोपाठ ( आणखी ) हादरे बसतील. 8 त्या दिवशी ( लोकांची) हृदये ( त्या दहशतीमुळे वेगाने) धडधडू लागतील. 9 त्यांच्या नजरा खाली खिळलेल्या असतील. 10 ( पुनरुत्थानास नाकारणारे) म्हणतात, '(मृत्यूनंतर) आम्हाला (जिवंत करून) पुन्हा पूर्वीच्या स्थितीत आणले जाणार का? 11 जेव्हा आम्ही जीर्ण हाडे बनलेले असू?' 12 ते म्हणतात, 'असे झाले, तर ते परतणे, नुकसानाची गोष्ट असेल. 13 ' (पण जेव्हा ती शेवटची घटका त्यांच्यावर येईल,) एका जोराची हाकाटी असेल. 14 आणि लगेच, ते ( सर्व जीर्ण हाडे झालेले) मैदानात हजर होतील!
15 तुम्हाला मूसाचा वृत्तांत पोचला का? 16 जेव्हा त्याच्या पालनकर्त्याने तुवाच्या पवित्र खोऱ्यापाशी त्यास हाक दिली होती. 17 (आणि म्हटले), ' फिरऔनकडे जा, तो सर्व मर्यादा ओलांडून विद्रोही बनलेला आहे.' 18 आणि त्याला सांगा, 'तू ( मार्गभ्रष्टतेच्या घाणीपासून ) स्वतःला शुचिर्भूत करू इच्छितोस का?' 19 तू ईशभिरु बनावेस म्हणूस मी तुला तुझ्या पालनकर्त्याचा मार्ग दाखवू का?' 20 त्यानंतर मूसाने त्याला ( अल्लाहच्या सामर्थ्याची एक ) मोठी खूण दाखविली. 21 पण त्याने खोटे ठरविले व मानण्यास नकार दिला. 22 (मूसाच्या विरुद्ध ) उपाय योजण्यासाठी तो बेमुरवतपणे तिथून निघून गेला. 23 आणि त्याने आपल्या सर्व लोकांना एकत्र बोलाविले. 24 आणि म्हणाला, 'मीच तुमचा सर्वश्रेष्ठ भाग्यविधाता आहे. ' 25 पण अल्लाहने त्याच्या मुसक्या आवळल्या ( आणि विद्रोही माणसाचा) या जगात व यानंतरच्या जगात (कसा शेवट होतो याचा इशारा देणारे उदाहरण त्याला बनविले ). 26 निःसंदेह, यात प्रत्येक ईशभिरु माणसासाठी  धडा आहे. 
27 (लोकांनो !) तुम्हाला निर्माण करणे अधिक कठीण आहे की, त्या आकाशाला निर्माण करणे ( अधिक कठीण आहे), ज्याला अल्लाहने निर्माण केले आहे. 28 त्याचे ( विशाल ) घुमट उंच स्थापित केले आणि त्यास दोषरहित बनवले. 29 आणि त्याने त्याची रात्र काळोखी बनविली व त्यातून प्रकाशमान दिवस प्रकट केला. 30 आणि त्यानंतर पृथ्वीला विस्तीर्ण केले. 31 आणि तिच्यातून तिचे पाणी काढले व चारा निर्माण केला.32 आणि पर्वतांना तिच्यावर भक्कमपणे स्थापित केले. 
33 हे सर्व तुमच्या आणि तुमच्या गुराढोरांसाठी उपजीविकेचे साधन आहे. 34 आणि जेव्हा ते भयंकर संकट येईल. 35 त्या दिवशी माणसाने ( जगात) जे-जे केले आहे, ते त्याला आठवेल. 36 आणि पाहणाऱ्यासाठी  नरक प्रकट केला जाईल. 37 ज्याने उद्दामपणे वर्तन केलेले असेल. 38 आणि केवळ जगातील जीवनास प्राधान्य दिलेले असेल. 39 तर नरक अशाच माणसाचे अटळ ठिकाण आहे. 40 पण जो आपल्या पालनकर्त्यासमोर ( हजार होऊन जाब द्यावा लागणार) अशी जाण ठेवून होता. आणि ज्याने वाईट मनोकामनाचे अनुसरण करण्यापासून स्वतःचे रक्षण केले असेल. 41 तर स्वर्ग त्याचे ठिकाण असेल. 42 (पैगंबर!) ते त्या शेवटच्या घटकेविषयी विचारतात की, ती  केव्हा येणार आहे? 43 पण तिच्याविषयी तुम्ही कसे सांगू शकणार ? 44 ( कारण) ती केव्हा येईल, हे केवळ तुझ्या पालनकर्त्यालाच माहीत आहे. 45 तुमचे काम त्यांना केवळ सावध करणे एवढेच आहे, जे तिचे भय बाळगतात. 46 त्या दिवशी जेव्हा ते ती पाहतील, तेव्हा त्यांना वाटेल की, ते केवळ एक संध्याकाळ किंवा एक सकाळ यापेक्षा जास्त (मृत्यूपूर्वीच्या) जगात राहिले नाहीत. 
============================
अनुवादक-अब्दुर -रहमान चाऊस ,नांदेड 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लुकमान यांचा सत्य वृत्तांत....

लुकमान यांचा सत्य वृत्तांत.... *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  12 आम्ही लुकमान यास विवेक प्रदान केले होते. व त्यास असे सांगितले होते की, अल्लाहप्रति नेहमी कृतज्ञ राहा. जो कोणी (अल्लाहप्रति) कृतज्ञ राहील तर त्यात त्याचेच भले आहे. तसेच जो कोणी कृतघ्नतेचे प्रदर्शन करील तर अल्लाह स्वयंपूर्ण आहे (त्याला भक्तांच्या आभाराची गरज नाही), तोच आहे सदा स्तुतीस पात्र ! 13 लुकमान (जो एक विवेकशील माणूस होता एकदा) आपल्या मुलास उपदेश करताना म्हणाला, 'हे माझ्या मुलं ! कोणालाही (कधीही) अल्लाहचे समकक्ष ठरवू नकोस. कारण कोणालाही अल्लाहच्या ईश्वरत्वामध्ये सहभागी ठरविणे, फार मोठे अत्याचारी कृत्य आहे.'  14 (अल्लाह म्हणतो) 'आम्ही मानवाला त्याच्या आईवडलांच्या बाबतीत (भली वागणूक करण्याची) ताकीद दिली.' त्याच्या आईने त्याला दुःखावर दुःख सहन करून त्याला आपल्या पोटात ठेवले. मग दोन वर्षांपर्यंत तो पूर्णपणे तिच्यावर अवलंबून राहिला (म्हणजे दोन वर्षांपर्यंत ती त्याला अंगावर दूध पाजवीत राहिली). (आम्ही म्हणालो की, तू माझ्या आणि आपल्या आईवडिलांप्रति आभार व्यक्त क...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noha यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noah(नोहा) यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...  59  आम्ही नूह (अ.) ला त्याच्या लोकसमूहाकडे पाठविले त्याने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवांनो! अल्लाहची भक्ती करा, त्याच्याव्यतिरिक्त तुमचा कोणीही ईश्वर नाही. मला तुमच्याबाबतीत एका भयंकर दिवसाच्या प्रकोपाचे भय वाटते.’’ 60  त्याच्या जनसमूहातील सरदारांनी उत्तर दिले, ’’आम्ही तर असे पहतो की तुम्ही उघड पथभ्रष्टतेत अडकले आहात.’’ 61  नूह (अ.) ने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवानो! मी कोणत्याच पथभ्रष्टतेत पडलेलो नाही, उलट मी सर्व जगांच्या पालनकर्त्याचा प्रेषित आहे. 62  मी तुम्हाला आपल्या पालनकर्त्याचे संदेश पोहोचवितो व मी तुमचा हितचिंतक आहे आणि मला अल्लाहकडून ते सर्वकाही माहीत आहे जे तुम्हाला माहीत नाही. 63  काय तुम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की तुमच्यापाशी खुद्द तुमच्याच जातीबांधवांपैकी एका माणसाद्वारे तुमच्या पालनकर्त्याकडून स्मरण आले, जेणेकरून तुम्हाला सावध करावे आणि तुम्ही दुर्वर्तनापासून वाचावे आणि तुम्हावर कृपा केली जावी?’...

67 अल - मुल्क Dominion (The sovereignty)

67 अल - मुल्क Dominion(The sovereignty) *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1 असीम समृद्ध आहे तो, ज्याच्या हाती समस्त विश्वाची (ची) सत्ता आहे. प्रत्येक वस्तुमात्रावर त्याचेच नियंत्रण आहे. 2 त्यानेच तुमची कसोटी पाहण्यासाठी जीवन व मृत्यू निर्माण केले. तुमच्यापैकी कोण चांगली कामे करतो, (हे त्याला पाहायचे आहे). तो सर्वशक्तिमान (असूनही) फार क्षमाशील आहे. 3 ज्याने एकावर एक असे सात आकाश निर्माण  केले. कृपावंत (अल्लाहच्या) निर्मितीमध्ये तुम्हाला कोणताही दोष असल्याचे आढळून येणार नाही. (एकदा पाहिल्याने दोष न आढळल्यास) पुन्हा एकदा पाहा, की , तुम्हाला आढळतो का कुठे काही दोष ? 4 मग आणखी पुन्हा - पुन्हा पाहा, (प्रत्येक वेळेस) तुमच्या (दोष शोधणाऱ्या) नजरा थकून व निराश होऊन तुमच्याकडे परततील (पण अल्लाहच्या निर्मितीमध्ये दोष कुठेही आढळणार नाही). 5 आणि आम्ही पृथ्वीसाठी सर्वात जवळ असलेल्या आकाशाला दिव्यांनी सजवलेले आहे. आणि (वाईट हेतूने आपल्या मर्यादा ओलांडणाऱ्या) सैतानांना पिटाळून लावण्याचे त्यांना साधन बनविले आहे.आणि त्यांच्यासाठी धगधगत्या आगीची (भयंकर) शिक्षा तयार आहे. 6  ज...