मुख्य सामग्रीवर वगळा

77 अल - मुरसलात (Those sent forth)

77 अल - मुरसलात (Those sent forth)
*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 
1 त्या वाऱ्यांची शपथ जे एका मागून एक पाठविले जातात. 2 आणि मग ते वादळाची गती धारण करतात. 3 आणि जे (पाऊस वर्षिणाऱ्या) ढगांना दूरवर पसरवितात. 4 मग त्यांना एकमेकांपासून वेगळे करतात. 5 (त्यांची) शपथ जे आपल्याबरोबर (अल्लाहकडून) उपदेश (ग्रंथ) घेऊन येतात. 6 काहींसाठी क्षमा तर काहींसाठी सावधानतेचा इशारा. 7 ज्या गोष्टीचे तुम्हाला वचन दिले जात आहे, ती निश्चितपणे घटित होणार आहे. 
8 (ती घटना तेव्हा घटित होईल ) जेव्हा तारे निस्तेज होऊन जातील. 9 आणि जेव्हा आकाश फाटून जाईल. 10 आणि जेव्हा पर्वत धुळीप्रमाणे विखुरले जातील. 11 आणि जेव्हा निर्धारित समयी पैगंबरांना एकत्र आणले जाईल. 12 या सर्व गोष्टी कोणत्या दिवसासाठी टाळल्या जात होत्या. 13 न्यायाच्या दिवसासाठी. 14 आणि तुम्हाला काय माहीत की, न्यायाचा दिवस म्हणजे आहे तरी काय? 15 सत्याला असत्या ठरविणारे, नाश पावणार आहेत, त्या दिवशी. 16 आम्ही आधीच्या (अपराध्यांना) नष्ट केले नाही का? 17 आणि आम्ही त्यांच्या नंतरच्या (अपराध्यांनाही) त्यांच्या पाठोपाठ (विनाशाच्या खाईत) जायला लावू. 18 कारण आम्ही अपराध्यांसोबत असाच व्यवहार करीत असतो. 19 सत्याला असत्य ठरविणारे नाश पावणार आहेत, त्या दिवशी. 
20 (लोकांनो !) आम्ही तुम्हास एका तुच्छ वीर्यबिंदूपासून निर्माण केलेले नाही का? 21 मग त्यास एका सुरक्षित ठिकाणी ठेवले, (म्हणजेच गर्भाशयात). 22 एका निर्धारित मुदतीपर्यंत. 23 अशाप्रकारे आम्ही (गर्भाच्या) वाढीचे टप्पे निश्चित केले. होय ! आम्ही किती कुशल रचनाकार आहोत ! 24 सत्याला असत्य ठरविणारे नाश पावणार आहेत, त्या (न्यायाच्या) दिवशी. 25 आम्ही पृथ्वीला (भरपूर गोष्टी) स्वतःमध्ये सामावून ठेवणारी बनविलेले नाही का? 26 जीवितांसाठी आणि मृतांसाठी. 27 आणि तिच्यावर आम्ही उंच पर्वत उभे केले. आणि तुम्हाला पिण्यासाठी गोड  पाण्याची व्यवस्था केली. 28 सत्याला असत्या ठरविण्याचे (कुकृत्य) केलेले लोक नाश पावणार आहेत, त्या दिवशी.
29 (त्या दिवशी त्यांना सांगितले जाईल), 'चला आता त्या गोष्टीकडे (म्हणजेच नरकाच्या आगीकडे) जिला तुम्ही खोटे ठरवीत असत. 30 चला  त्या (आगीच्या) सावलीकडे जिचे तीन भाग आहेत (तीन कॉलम आहेत.)' 31 जी ना छाया देणारी आहे, ना ज्वालेपासून रक्षण करणारी आहे. 32 त्या सावलीतून महालाएवढ्या उंचच्या उंच ठिणग्या फेकल्या जातील. 33 (त्या उसळणाऱ्या ठिणग्या अशा दिसतील) जणू पिवळ्या उंटांचा (कळप) आहे. 34 सत्याला असत्य ठरविणारे नाश पावणार आहेत, त्या दिवशी. 35 हा असा दिवस आहे जेव्हा लोक अवाक झालेले असतील. 36 आणि त्यांना सबबी सादर करण्याची परवानगी दिली जाणार नाही. 37 सत्याला असत्य ठरवीत राहिलेले लोक, (न्यायाच्या) दिवशी नाश पावणार आहेत. 38 (तेव्हा सांगितले जाईल) हा फैसल्याचा दिवस होय. आम्ही तुम्हाला व तुमच्या पूर्वीच्या सर्व लोकांना एकत्रित केलेले आहे. 39 जर तुमच्याकडे काही युक्ती असेल तर ती माझ्याविरुद्ध (आता) लढवा. 40 नाश पावणार आहेत, सत्य नाकारणारे, त्या दिवशी. 
41 (याउलट) (अल्लाहकडे जाब देण्याची) जाण ठेवून होते, ते लोक (आनंददायी) सावल्या व पाण्याचे (नयनरम्य) झरे यांच्या सान्निध्यात असतील. 42 त्यांना हवी असतील, ती फळे (उपलब्ध असतील). 43 (सांगितले जाईल,) 'खा व प्या व मजा करा, त्या कृत्यांच्या बक्षीसाप्रीत्यर्थ, जी तुम्ही करीत असत. 44 आम्ही सदाचरणी लोकांना अशाप्रकारे बक्षीस देत असतो.' 45 सत्य नाकारणारे नाश पावणार आहेत, त्या दिवशी. 46 (पापी लोकांनो!) खा आणि चार दिवस मौज करून घ्या (पृथ्वीतलावर). निःसंदेह ! तुम्ही पापी आहात ! 47 पण सत्य नाकारण्यावर आग्रही राहिलेले लोक नाश पावणार, त्या दिवशी. 48 जेव्हा त्यांना सांगितले जाते की, (अल्लाहसमोर) नमन करा, तर ते तसे करीत नाहीत. 49 सत्य नाकारण्यावर आग्रही राहिलेले लोक नाश  पावणार आहेत, त्या दिवशी, 50 (अल्लाहचा सुरक्षित ग्रंथ असलेल्या) या कुराणाशिवाय ते अन्य कशावर विश्वास ठेवणारे बनतील?
----------------------------------------------------------------------------
अनुवादक-अब्दुर रहमान चाऊस, नांदेड 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लुकमान यांचा सत्य वृत्तांत....

लुकमान यांचा सत्य वृत्तांत.... *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  12 आम्ही लुकमान यास विवेक प्रदान केले होते. व त्यास असे सांगितले होते की, अल्लाहप्रति नेहमी कृतज्ञ राहा. जो कोणी (अल्लाहप्रति) कृतज्ञ राहील तर त्यात त्याचेच भले आहे. तसेच जो कोणी कृतघ्नतेचे प्रदर्शन करील तर अल्लाह स्वयंपूर्ण आहे (त्याला भक्तांच्या आभाराची गरज नाही), तोच आहे सदा स्तुतीस पात्र ! 13 लुकमान (जो एक विवेकशील माणूस होता एकदा) आपल्या मुलास उपदेश करताना म्हणाला, 'हे माझ्या मुलं ! कोणालाही (कधीही) अल्लाहचे समकक्ष ठरवू नकोस. कारण कोणालाही अल्लाहच्या ईश्वरत्वामध्ये सहभागी ठरविणे, फार मोठे अत्याचारी कृत्य आहे.'  14 (अल्लाह म्हणतो) 'आम्ही मानवाला त्याच्या आईवडलांच्या बाबतीत (भली वागणूक करण्याची) ताकीद दिली.' त्याच्या आईने त्याला दुःखावर दुःख सहन करून त्याला आपल्या पोटात ठेवले. मग दोन वर्षांपर्यंत तो पूर्णपणे तिच्यावर अवलंबून राहिला (म्हणजे दोन वर्षांपर्यंत ती त्याला अंगावर दूध पाजवीत राहिली). (आम्ही म्हणालो की, तू माझ्या आणि आपल्या आईवडिलांप्रति आभार व्यक्त क...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noha यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noah(नोहा) यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...  59  आम्ही नूह (अ.) ला त्याच्या लोकसमूहाकडे पाठविले त्याने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवांनो! अल्लाहची भक्ती करा, त्याच्याव्यतिरिक्त तुमचा कोणीही ईश्वर नाही. मला तुमच्याबाबतीत एका भयंकर दिवसाच्या प्रकोपाचे भय वाटते.’’ 60  त्याच्या जनसमूहातील सरदारांनी उत्तर दिले, ’’आम्ही तर असे पहतो की तुम्ही उघड पथभ्रष्टतेत अडकले आहात.’’ 61  नूह (अ.) ने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवानो! मी कोणत्याच पथभ्रष्टतेत पडलेलो नाही, उलट मी सर्व जगांच्या पालनकर्त्याचा प्रेषित आहे. 62  मी तुम्हाला आपल्या पालनकर्त्याचे संदेश पोहोचवितो व मी तुमचा हितचिंतक आहे आणि मला अल्लाहकडून ते सर्वकाही माहीत आहे जे तुम्हाला माहीत नाही. 63  काय तुम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की तुमच्यापाशी खुद्द तुमच्याच जातीबांधवांपैकी एका माणसाद्वारे तुमच्या पालनकर्त्याकडून स्मरण आले, जेणेकरून तुम्हाला सावध करावे आणि तुम्ही दुर्वर्तनापासून वाचावे आणि तुम्हावर कृपा केली जावी?’...

67 अल - मुल्क Dominion (The sovereignty)

67 अल - मुल्क Dominion(The sovereignty) *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1 असीम समृद्ध आहे तो, ज्याच्या हाती समस्त विश्वाची (ची) सत्ता आहे. प्रत्येक वस्तुमात्रावर त्याचेच नियंत्रण आहे. 2 त्यानेच तुमची कसोटी पाहण्यासाठी जीवन व मृत्यू निर्माण केले. तुमच्यापैकी कोण चांगली कामे करतो, (हे त्याला पाहायचे आहे). तो सर्वशक्तिमान (असूनही) फार क्षमाशील आहे. 3 ज्याने एकावर एक असे सात आकाश निर्माण  केले. कृपावंत (अल्लाहच्या) निर्मितीमध्ये तुम्हाला कोणताही दोष असल्याचे आढळून येणार नाही. (एकदा पाहिल्याने दोष न आढळल्यास) पुन्हा एकदा पाहा, की , तुम्हाला आढळतो का कुठे काही दोष ? 4 मग आणखी पुन्हा - पुन्हा पाहा, (प्रत्येक वेळेस) तुमच्या (दोष शोधणाऱ्या) नजरा थकून व निराश होऊन तुमच्याकडे परततील (पण अल्लाहच्या निर्मितीमध्ये दोष कुठेही आढळणार नाही). 5 आणि आम्ही पृथ्वीसाठी सर्वात जवळ असलेल्या आकाशाला दिव्यांनी सजवलेले आहे. आणि (वाईट हेतूने आपल्या मर्यादा ओलांडणाऱ्या) सैतानांना पिटाळून लावण्याचे त्यांना साधन बनविले आहे.आणि त्यांच्यासाठी धगधगत्या आगीची (भयंकर) शिक्षा तयार आहे. 6  ज...