💐चॅप्टर 112 अल इखलास 💐
*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 (पैगंबर ! हे लोक अल्लाहविषयीं विचारतात), तुम्ही त्यांना सांगा, 'अल्लाह एकच आहे, 2 तो आत्मनिर्भर (व स्वयंपूर्ण) आहे. 3 ना तो कोणाला (अपत्यरूपी) जन्म देतो. ना तो कोणापासून जन्माला आलेला आहे (असा आहे अल्लाह). 4 आणि त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही.'
[कुराण 112 :1 -4 ]
--------------------------------------------------------
💐चॅप्टर 113 अल फ़लक 💐
*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 (पैगंबर !)सांगा, 'सकाळ निर्माण करणाऱ्या पालनकर्त्याचे मी शरण प्राप्त करू इच्छितो. 2 त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीच्या अपायापासून (स्वतःला वाचविण्यासाठी).3 आणि रात्रीच्या अपायापासून , जेव्हा ती सर्वत्र (अंधार ) पसरवते. 4 तसेच त्यांच्या अपायापासून जे काही गूढ प्रयास करून फुंकर मारतात. 5 तसेच मत्सर बाळगणारा जेव्हा मत्सर बाळगतो, त्याच्या अपायापासून वाचवण्यासाठी ( त्याचे शरण अवश्य आहे).' [कुराण 113 : 1 -5 ]
--------------------------------------------------------
💐चॅप्टर 114 अन नास💐
* आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 (पैगंबर!) सांगा, 'मी लोंकाच्या पालनकर्त्याचे शरण प्राप्त करू इच्छितो, 2 जो लोकांचा सर्वाधिपती 3 (व) लोकांचा ईश्वर आहे, 4 जो लपून बहकाविण्याचे काम करतो अशा (सैतानाच्या) अपायापासून (स्वतःला वाचविण्यासाठी मला त्याचे शरण हवे आहे.) 5 जो लोकांच्या मनात वाईट विचार भरतो, 6 मग तो जिन्नांपैकी असो वा मनुष्यांपैकी.' [कुराण 114 : 1 -6 ]
--------------------------------------------------------
#कुराणचा_काही_अंश
अब्दुर रहमान चाऊस, (नांदेड) यांचे भाषांतर)
हे कुराण मधील कुल चे चॅप्टर्स, जेव्हा व्यक्ती आजारी असतो, त्याला नजर लागते, कुणाची बददुआ लागते, वाईट शक्तीचा त्याच्यावर परिणाम होतो.तेव्हा हे चॅप्टर्स ( सुरे) यांचे मनापासून वाचन केले जाते. आणि त्या वाईट शक्तीचा परिणाम कमी व्हावा आणि नष्ट व्हावा, म्हणून प्रार्थना केली जाते.
टिप्पण्या