मुख्य सामग्रीवर वगळा

71नूह (Noah)

71नूह 
*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 
1 आम्ही नूहला त्याच्या लोकांकडे पैगंबर बनवून पाठविले. (त्यास आम्ही म्हटले की), आपल्या  लोकांना, त्यांच्यावर दुःखदायी शिक्षा येण्यापूर्वी, सावध कर. 2 (नूहने) म्हटले, 'माझ्या बांधवांनो ! मला तुमच्याकडे स्पष्टरित्या सावध करणारा बनवून पाठविले गेले आहे. 3 तुम्ही (केवळ) अल्लाहची उपासना करा, आणि त्याची नेहमी जाण ठेवा आणि माझ्या आज्ञेचे पालन करा. 4 अल्लाह तुमच्या चुका माफ करून टाकेल, आणि एका निर्धारित अवधीपर्यंत तुम्हाला उसंत देईल. पण जेव्हा अल्लाहने निर्धारित केलेली वेळ येते, मग तिला कोणत्याही प्रकारे टाळता येत नाही. कदाचित तुम्हाला हे समजले असते, तर (बरे झाले असते).'
(दीर्घ काळापर्यंत संदेश पोचविण्याचे कर्तव्य पार पडल्यानंतर) नूहने (अल्लाहकडे) प्रार्थना केली, 'हे प्रभू ! मी आपल्या लोकांना अहोरात्र (तुझ्याकडे) येण्याचे आवाहन केले. 6 पण माझ्या सततच्या आवाहनाने, ते (तुझ्यापासून) केवळ दूर आणि दूर गेले. 7 आणि जेव्हा-जेव्हा मी त्यांना बोलविले की, (त्यांनी तुझ्याकडे वळावे) व तू त्यांना क्षमा करावी. पण त्यांनी प्रत्येक वेळेस आपली बोटे आपल्या कानात घातली आणि आपल्या वस्त्रांनी स्वतःला झाकून घेतले. आणि त्यांनी हट्टीपणा व मगरुरीचे प्रदर्शन केले. 8 मग मी त्यांना जाहीररित्याही (सन्मार्गाकडे) येण्याचे आवाहन केले. 9 आणि त्यांना सार्वजनिक पातळीवर आणि खासगीत वैयक्तिक पातळीवर (सर्वप्रकारे) समजावून सांगितले. 10 'मी (त्यांना) म्हटले, 'आपल्या पालनकर्त्याकडे क्षमायाचना करा, खरोखर, तो अत्यंत क्षमाशील आहे. 11 तो तुमच्यासाठी आकाशातून भरपूर पर्जन्यवृष्टी करेल. 12 आणि तुमच्या संपत्ती व संतती मध्ये वाढ कारे. आणि तुमच्यासाठी बागा फुलवेल व नद्या प्रवाहित करेल. 13 तुम्हाला झाले तरी काय की, तुम्ही अल्लाहला सर्वोच्च आदरणीय समजत नाही? 14 वास्तविक पाहता, त्यानेच तुम्हाला विविध अवस्थांमधून नेऊन, निर्माण केलेले आहे.15 तुम्ही कधी (चिंतनपूर्वक) अवलोकन केले नाही का की, अल्लाहने एकावर एक सात आकाश कशाप्रकारे पूर्ण संतुलनासह निर्माण केलेले आहेत? 16 आणि (आकाशात) चंद्राला (प्रतिबिंबित) प्रकाश देणारा आणि सूर्याला देदीप्यमान दीपक बनविले आहे. 17 आणि अल्लाहने कशाप्रकारे तुम्हाला पृथ्वीतून उपजविले आणि (वनस्पतीप्रमाणे) वाढीस लावले.' 18 आणि नंतर (मृत्युद्वारे) पुन्हा तो त्याच मातीत परत नेईल. आणि मग पुन्हा तुमचे पुनरुत्थान करेल. 19 (पाहा!) अल्लाहने तुमच्यासाठी पृथ्वीला कशाप्रकारे विस्तीर्ण बनवले आहे. 20 यासाठी  की,  तुम्हाला तिच्या खुल्या मार्गांवर संचार करता यावा, (म्हणजे अशी तिची रचना केली).'
21 नूहने पुढे म्हटले, ' हे प्रभू ! त्यांनी माझ्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून, अशा माणसाचे अनुसरण केले, ज्याच्या संपत्तीने व संततीने केवळ त्याच्या विनाशात भर घातली.'
22 आणि त्यांनी माझ्याशी कटकारस्थानांचा (दीर्घ) खेळ खेळला. 23 आणि ते (आपल्या अनुयायांना) म्हणाले , 'तुम्ही आपल्या उपास्यांचा कधीही त्याग करू नका, ना वद्दचा, ना सुवाचा त्याग करा. तसेच ना यागूस , ना याऊक, ना नस्रचा त्याग करा.' 24  'आणि त्यांनी अनेकांना बहकावून सोडले. म्हणून (हे प्रभू !) तू आता या दुराचाऱ्यांच्या मार्गभ्रष्टतेत आणखी वाढ कर.' 25 (परिणामी) त्यांच्या दुर्ष्कृत्यांमुळे त्यांना बुडवून टाकण्यात आले. आणि त्यानंतर त्यांना नरकाच्या आगीत दाखल केले गेले. अशाप्रकारे त्यांना अल्लाहपासून वाचविणारा कोणीही साहाय्यकर्ता लाभला नाही. 
 26 नूहने  (अल्लाहकडे) प्रार्थना केली, ' हे प्रभू ! या सत्य नाकारणाऱ्या श्रद्धाहीनांपैकी एकालाही भूतलावर (जिवंत) सोडू नकोस. 27 तू जर त्यांना सोडून दिलेस, तर ते तुझ्या भक्तांना बहकविण्याचे (पाप) सुरूच ठेवतील. आणि त्यांच्यापोटी जो जन्माला येईल, तो पापी व कृतघ्नच असेल. 28 हे प्रभू ! मला व माझ्या आईवडिलांना क्षमा कर. तसेच सर्व श्रद्धावंत पुरुषांना व श्रद्धावंत स्त्रियांना क्षमा कर. आणि दुराचाऱ्यांच्या अन्य कशात नव्हे, तर केवळ विनाशात भर घाल.'
-----------------------------------------------------------
अनुवादक -अब्दुर रहमान चाऊस , नांदेड 

नूह अ. यांची सत्यकथा....
जेव्हा मानवजात या जगात पसरली…काही लोकांनी अल्लाहची शिकवण लक्षात ठेवली पण जास्त करून लोकांनी लक्षात ठेवली नाही…ते अल्लाहविषयी विसरून गेले आणि दगडाच्या प्रतिमा बनवून आराधना करू लागले…त्यांना अल्लाहची शिकवण आठवून देण्यासाठी, अल्लाहने एक संदेशवाहक त्यांच्याकडे पाठविला… नूह (नोआ), जो त्यावेळचा एकच चांगला माणूस होता…

नूहने लोकांना सांगितले की, चांगले बनण्यासाठी, अल्लाहची आज्ञा पाळा…आणि त्याच्या वचनावर विश्वास ठेवा की, जर ते चांगले होतील तर ते वापस स्वर्गात जातील…त्याने त्यांना फक्त अल्लाहची प्रार्थना करण्यास सांगितले, जो त्यांना बनविणारा आहे आणि दगडाच्या प्रतिमेची आराधना न करण्यास सांगितले…पण लोक खूप आज्ञा भंग करणारे होते…त्यांनी पुरुषांच्या, स्त्रीच्या, सिंहांच्या, घोड्याच्या आणि खूप काही प्राण्यांच्या पुतळ्यांची आराधना करने चालूच ठेवले…

नूहने त्यांना समजावले की, "हे दगड तुम्हाला काहीही देऊ शकत नाही…जर तुम्हाला काही पाहिजे आहे, तर त्यासाठी अल्लाहला मागा…"

नूह ने कारण दिले, "तुम्ही सूर्य, चंद्र, पृथ्वी आणि आकाश पाहत नाही का? यांना कोणी बनविले…अल्लाहने या सर्वांना बनविले…तुम्हाला जाणीव होत नाही का की अल्लाहने तुम्हालाही बनविले आणि तुम्हाला मृत्युनंतर अल्लाहकडेच वापस जायचे आहे…"

नूहने विनवणी केली," मी म्हणत नाही की मी अल्लाहचा दूत आहे…किंवा मला जे अज्ञात आहे त्याचे ज्ञान आहे…मी हेही म्हणत नाही की माझ्याकडे लपलेला खजिना आहे…मी फक्त एवढेच म्हणत आहे की एकाच अल्लाहला माना आणि तुमच्या स्वतःच्या चांगल्यासाठी त्याची आज्ञा पाळा…माझा विश्वास करा…मला या बदल्यात काहीही नको आहे…"

नूह एक खूप सहनशील व्यक्ती होता…त्याने लोकांना उपदेश करून अल्लाहचा संदेश देणे नऊशे (900) वर्षांपर्यंत चालू ठेवले… त्याला खूप मोठे आयुष्य होते…पण फक्त काहीच चांगल्या लोकांनी अल्लाहचा संदेश स्वीकार केला…

नूह खूप नाखूष होता…त्याने अल्लाहकडे प्रार्थना केली…अल्लाह बोलला," नूह, दुःखी होऊ नकोस…तुझ्याकडून जितके झाले तितके तू खूप चांगले काम केले आहे…हे दुष्ट लोकं एक भयानक शिक्षा भोगण्याच्या लायक आहेत…ते नष्ट होतील…त्यांना या शिक्षेपासून आता कुणीही वाचवू शकणार नाही…"

अल्लाहने नूहला एका मोठ्या वादळविषयी सांगितले, जे या विश्वास न करणाऱ्या लोकांना जिवे मारेल…अल्लाहने नूहला सल्ला दिला की एक लांब नाव बनव आणि त्यावर स्वतःला आणि तुझ्या अनुयायींना, येणाऱ्या पूरापासून सुरक्षित करण्याची पूर्ण तयारी कर…

जेव्हा लोकांनी पाहिले की नूह नाव बनवीत आहे…ते त्याच्याकडे पाहून हसले…आणि म्हणाले की," तर तू पूरा साठी तयारी करत आहे, नाही का? आणि तू त्यात (नावेत) स्वतःला वाचवशील? हss."..पण नूहने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि नाव बनविणे चालू ठेवले…

जेव्हा नाव तयार झाली, तेव्हा अल्लाहने नूहला आज्ञा केली की, वादळ येण्याआधी, त्याच्या अनुयायींना, आणि सगळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या, एका जोडीला त्याच्यासोबत, नावेत घेऊन जाण्यास सांगितले…

नूहने, अल्लाहने जी आज्ञा केली होती, ते सर्व केले…पण नूहला त्याच्या मुलाविषयी, कानान विषयी काळजी वाटत होती…ज्याने अल्लाहची आज्ञा पाळली नव्हती…तो विश्वास करणारा नव्हता…. नूहने अल्लाहला विचारले, कानान चे काय होईल?…तो माझ्या कुटुंबातला आहे….तो वाचविला जाईल का?
आणि अल्लाहने उत्तर दिले," नाही, नूह, जो माझी आज्ञा पाळत नाही, तो तुझ्या कुटुंबातला नाही…आणि तुला त्याच्यासाठी वाईट वाटले नाही पाहिजे…तुझे कुटुंब त्यांच्यात आहे ज्यांनी तुझ्या अल्लाहची आज्ञा पाळली आणि तुझीही…

शेवटी जेव्हा सगळी तयारी पूर्ण झाली तेव्हा एक वादळ आले…कुणीही याआधी एवढे मोठे वादळ पाहिले नव्हते…ती एक शिक्षा होती ज्याचे अल्लाहने वचन दिले होते…की जर लोकांनी त्यांची पद्धत( रस्ता) बदलली नाही तर अल्लाह वादळ पाठवेल…खूप जोरदार पाऊस आकाशातून खाली आला (ढग फाटले) आणि जमिनीतून पाणी उफाळून वर आले…

जसे ते सर्व नावेत बसले, नूहने पुन्हा कानानला आवाज दिला…आणि अल्लाहची आज्ञा पाळायला आणि त्याचा संदेश स्वीकार करायला सांगितला ज्यामुळे तो वाचेल…पण कानान खरच फार हट्टी होता…तो म्हणाला," नाही…मी येणार नाही…मी पर्वत चढेन आणि स्वतःला वाचवेन…" पण त्यानंतर लगेच एक मोठी लाट त्यांच्यामध्ये आली आणि कानान, त्याच्या सोबतच्या दुसऱ्या सर्व विश्वास न करणाऱ्या लोकांसोबत मरण पावला…

नूहची नाव जुडी पर्वता जवळ पोहोचली (आताचे अरारात पर्वत जे तुर्कीत आहे)
ते सर्व लोक जे नाव मध्ये होते ते वाचविले गेले…

नूहला दुसरा आदम म्हणतात…कारण जवळपास प्रत्येक जण त्या भयंकर पुरामध्ये मरण पावला होता…फक्त नूह आणि त्याचे काही अनुयायी, या जगात पुन्हा नवीन जीवन सुरू होण्यासाठी वाचविले गेले होते…लोकं एक भयानक शिक्षा भोगण्याच्या लायक आहेत…ते नष्ट होतील…त्यांना या शिक्षेपासून आता कुणीही वाचवू शकणार नाही…"

अल्लाहने नूहला एका मोठ्या वादळविषयी सांगितले, जे या विश्वास न करणाऱ्या लोकांना जिवे मारेल…अल्लाहने नूहला सल्ला दिला की एक लांब नाव बनव आणि त्यावर स्वतःला आणि तुझ्या अनुयायींना, येणाऱ्या पूरापासून सुरक्षित करण्याची पूर्ण तयारी कर…

जेव्हा लोकांनी पाहिले की नूह नाव बनवीत आहे…ते त्याच्याकडे पाहून हसले…आणि म्हणाले की," तर तू पूरा साठी तयारी करत आहे, नाही का? आणि तू त्यात (नावेत) स्वतःला वाचवशील? हss."..पण नूहने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि नाव बनविणे चालू ठेवले…

जेव्हा नाव तयार झाली, तेव्हा अल्लाहने नूहला आज्ञा केली की, वादळ येण्याआधी, त्याच्या अनुयायींना, आणि सगळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या, एका जोडीला त्याच्यासोबत, नावेत घेऊन जाण्यास सांगितले…

नूहने, अल्लाहने जी आज्ञा केली होती, ते सर्व केले…पण नूहला त्याच्या मुलाविषयी, कानान विषयी काळजी वाटत होती…ज्याने अल्लाहची आज्ञा पाळली नव्हती…तो विश्वास करणारा नव्हता…. नूहने अल्लाहला विचारले, कानान चे काय होईल?…तो माझ्या कुटुंबातला आहे….तो वाचविला जाईल का?
आणि अल्लाहने उत्तर दिले," नाही, नूह, जो माझी आज्ञा पाळत नाही, तो तुझ्या कुटुंबातला नाही…आणि तुला त्याच्यासाठी वाईट वाटले नाही पाहिजे…तुझे कुटुंब त्यांच्यात आहे ज्यांनी तुझ्या अल्लाहची आज्ञा पाळली आणि तुझीही…

शेवटी जेव्हा सगळी तयारी पूर्ण झाली तेव्हा एक वादळ आले…कुणीही याआधी एवढे मोठे वादळ पाहिले नव्हते…ती एक शिक्षा होती ज्याचे अल्लाहने वचन दिले होते…की जर लोकांनी त्यांची पद्धत( रस्ता) बदलली नाही तर अल्लाह वादळ पाठवेल…खूप जोरदार पाऊस आकाशातून खाली आला (ढग फाटले) आणि जमिनीतून पाणी उफाळून वर आले…

जसे ते सर्व नावेत बसले, नूहने पुन्हा कानानला आवाज दिला…आणि अल्लाहची आज्ञा पाळायला आणि त्याचा संदेश स्वीकार करायला सांगितला ज्यामुळे तो वाचेल…पण कानान खरच फार हट्टी होता…तो म्हणाला," नाही…मी येणार नाही…मी पर्वत चढेन आणि स्वतःला वाचवेन…" पण त्यानंतर लगेच एक मोठी लाट त्यांच्यामध्ये आली आणि कानान, त्याच्या सोबतच्या दुसऱ्या सर्व विश्वास न करणाऱ्या लोकांसोबत मरण पावला…

नूहची नाव जुडी पर्वता जवळ पोहोचली (आताचे अरारात पर्वत जे तुर्कीत आहे)
ते सर्व लोक जे नाव मध्ये होते ते वाचविले गेले…

नूहला दुसरा आदम म्हणतात…कारण जवळपास प्रत्येक जण त्या भयंकर पुरामध्ये मरण पावला होता…फक्त नूह आणि त्याचे काही अनुयायी, या जगात पुन्हा नवीन जीवन सुरू होण्यासाठी वाचविले गेले होते…


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लुकमान यांचा सत्य वृत्तांत....

लुकमान यांचा सत्य वृत्तांत.... *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  12 आम्ही लुकमान यास विवेक प्रदान केले होते. व त्यास असे सांगितले होते की, अल्लाहप्रति नेहमी कृतज्ञ राहा. जो कोणी (अल्लाहप्रति) कृतज्ञ राहील तर त्यात त्याचेच भले आहे. तसेच जो कोणी कृतघ्नतेचे प्रदर्शन करील तर अल्लाह स्वयंपूर्ण आहे (त्याला भक्तांच्या आभाराची गरज नाही), तोच आहे सदा स्तुतीस पात्र ! 13 लुकमान (जो एक विवेकशील माणूस होता एकदा) आपल्या मुलास उपदेश करताना म्हणाला, 'हे माझ्या मुलं ! कोणालाही (कधीही) अल्लाहचे समकक्ष ठरवू नकोस. कारण कोणालाही अल्लाहच्या ईश्वरत्वामध्ये सहभागी ठरविणे, फार मोठे अत्याचारी कृत्य आहे.'  14 (अल्लाह म्हणतो) 'आम्ही मानवाला त्याच्या आईवडलांच्या बाबतीत (भली वागणूक करण्याची) ताकीद दिली.' त्याच्या आईने त्याला दुःखावर दुःख सहन करून त्याला आपल्या पोटात ठेवले. मग दोन वर्षांपर्यंत तो पूर्णपणे तिच्यावर अवलंबून राहिला (म्हणजे दोन वर्षांपर्यंत ती त्याला अंगावर दूध पाजवीत राहिली). (आम्ही म्हणालो की, तू माझ्या आणि आपल्या आईवडिलांप्रति आभार व्यक्त क...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noha यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noah(नोहा) यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...  59  आम्ही नूह (अ.) ला त्याच्या लोकसमूहाकडे पाठविले त्याने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवांनो! अल्लाहची भक्ती करा, त्याच्याव्यतिरिक्त तुमचा कोणीही ईश्वर नाही. मला तुमच्याबाबतीत एका भयंकर दिवसाच्या प्रकोपाचे भय वाटते.’’ 60  त्याच्या जनसमूहातील सरदारांनी उत्तर दिले, ’’आम्ही तर असे पहतो की तुम्ही उघड पथभ्रष्टतेत अडकले आहात.’’ 61  नूह (अ.) ने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवानो! मी कोणत्याच पथभ्रष्टतेत पडलेलो नाही, उलट मी सर्व जगांच्या पालनकर्त्याचा प्रेषित आहे. 62  मी तुम्हाला आपल्या पालनकर्त्याचे संदेश पोहोचवितो व मी तुमचा हितचिंतक आहे आणि मला अल्लाहकडून ते सर्वकाही माहीत आहे जे तुम्हाला माहीत नाही. 63  काय तुम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की तुमच्यापाशी खुद्द तुमच्याच जातीबांधवांपैकी एका माणसाद्वारे तुमच्या पालनकर्त्याकडून स्मरण आले, जेणेकरून तुम्हाला सावध करावे आणि तुम्ही दुर्वर्तनापासून वाचावे आणि तुम्हावर कृपा केली जावी?’...

67 अल - मुल्क Dominion (The sovereignty)

67 अल - मुल्क Dominion(The sovereignty) *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1 असीम समृद्ध आहे तो, ज्याच्या हाती समस्त विश्वाची (ची) सत्ता आहे. प्रत्येक वस्तुमात्रावर त्याचेच नियंत्रण आहे. 2 त्यानेच तुमची कसोटी पाहण्यासाठी जीवन व मृत्यू निर्माण केले. तुमच्यापैकी कोण चांगली कामे करतो, (हे त्याला पाहायचे आहे). तो सर्वशक्तिमान (असूनही) फार क्षमाशील आहे. 3 ज्याने एकावर एक असे सात आकाश निर्माण  केले. कृपावंत (अल्लाहच्या) निर्मितीमध्ये तुम्हाला कोणताही दोष असल्याचे आढळून येणार नाही. (एकदा पाहिल्याने दोष न आढळल्यास) पुन्हा एकदा पाहा, की , तुम्हाला आढळतो का कुठे काही दोष ? 4 मग आणखी पुन्हा - पुन्हा पाहा, (प्रत्येक वेळेस) तुमच्या (दोष शोधणाऱ्या) नजरा थकून व निराश होऊन तुमच्याकडे परततील (पण अल्लाहच्या निर्मितीमध्ये दोष कुठेही आढळणार नाही). 5 आणि आम्ही पृथ्वीसाठी सर्वात जवळ असलेल्या आकाशाला दिव्यांनी सजवलेले आहे. आणि (वाईट हेतूने आपल्या मर्यादा ओलांडणाऱ्या) सैतानांना पिटाळून लावण्याचे त्यांना साधन बनविले आहे.आणि त्यांच्यासाठी धगधगत्या आगीची (भयंकर) शिक्षा तयार आहे. 6  ज...