मुख्य सामग्रीवर वगळा

66 अत-तहरीम

66  अत-तहरीम (Holding something to be forbidden)

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू आणि कृपाळू आहे.
1 पैगंबर ! तुम्ही आपल्या पत्नींच्या  प्रसन्नतेखातर  त्या गोष्टीला (स्वतःसाठी) का अवैध ठरवता, जी अल्लाहने तुमच्यासाठी वैध ठरविलेली आहे. पण अल्लाह फार क्षमाशील व दयाळू आहे.

2 अल्लाहने तुम्हाला आपल्या शपथांमधून मुक्त होण्याचे (नियमासहित) आधीच बजावलेले आहे, कारण अल्लाह तुमचा साम्भाळकर्ता आहे. आणि तोच सर्व काही जाणणारा व बुद्धिमान आहे.

3 आणि (एकदा असे घडले की,) पैगंबराने आपल्या पत्नींपैकी एकीला एखादी गोपनीय गोष्ट सांगितली. पण तिने ती गोष्ट गुप्त ठेवली नाही. आणि अल्लाहने पैगंबराला याबद्दल सूचित केले. तेव्हा पैगंबराने तिला त्यांपैकी काही भाग सांगितला आणि काही भाग सांगायचे टाळले. मग जेव्हा पैगंबराने आपल्या पत्नीस हे सांगितले, (जे त्यास अल्लाहद्वारे कळविण्यात आले होते), तेव्हा तिने विचारले, 'तुम्हाला याविषयी कोणी सांगितले?' पैगंबराने उत्तर दिले, ' मला त्याने हे सांगितले जो सर्व काही जाणणारा आहे व प्रत्येक गोष्टीविषयी जागरूक आहे.             4 (पैगंबराच्या पत्नींनो !) जर तुम्ही दोघी पश्चातापदग्ध होऊन अल्लाहकडे वळाल, तर (ते तुमच्या हिताचे असेल) (कारण) तुमची मने आधीच (जे योग्य आहे) त्यापासून दूर गेलेली आहेत. पण जर तुम्ही दोघी पैगंबराच्या विरुद्ध एकमेकींना मदत कराल, तर (लक्षात ठेवा) पैगंबरांचा साहाय्यकरता अल्लाह आहे आणि  जिब्रील (हा स्वर्गदूत) आणि सत्कृत्ये करणारे श्रद्धावंत आणि याव्यतिरिक्त (सर्व इतर) स्वर्गदूत त्याला साहाय्य करणारे आहेत. 5 (पैगंबराच्या पत्नींनो !) जर पैगंबराने तुम्हाला घटस्फोट दिला, तर त्याचा पालनकर्ता तुमच्याजागी तुमच्याहून अधिक चांगल्या पत्नी त्याला देऊ शकतो. ज्या, अल्लाहप्रति समर्पित अशा, श्रद्धावंत, आज्ञाधारक, नेहमी अल्लाहसमोर लीन असलेल्या, निष्ठावंत उपासक, उपवास करणाऱ्या, ज्या विधवा व कुमारिकाही असतील.

6  श्रद्धावंतांनो  ! तुम्ही स्वतःला व तुमच्या कुटुंबियांना त्या (नरकाच्या) आगीपासून वाचवा जिचे इंधन माणसे व दगड असतील. जिचे (रखवालदार म्हणून) कठोर व प्रचंड शक्तिशाली (अल्लाहचे) दूत नियुक्त आहेत. अल्लाहने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या बाबतीत ते जराशीदेखील कुचराई करीत नाहीत. ते अगदी तेच करतात, जे करण्याचा त्यांना आदेश दिला जातो. 7 सत्य नाकारण्यावर आग्रही राहिलेल्या लोकांनो ! आज कोणत्याही सबबी प्रस्तुत करू नका. तुम्हाला त्याचाच मोबदला देण्यात येत आहे, जे तुम्ही करीत होता.

8 श्रद्धावंतांनो!    प्रामाणिकपणे पश्चाताप करून अल्लाहकडे वळा, नवल नव्हे, तुमचा पालनकर्ता तुमची वाईट कृत्ये माफ करून टाकेल आणि तुम्हाला अशा बागांमध्ये प्रवेश देईल, ज्यांमधून पाण्याचे (नयनरम्य) प्रवाह (सदैव) वाहत असतील. त्या दिवशी          (म्हणजे न्यायाच्या दिवशी), अल्लाह पैगंबरास व त्याचे अनुसरण करणाऱ्या श्रद्धावंतांना अपमानित करणार नाही. त्यांच्या (सद्गुणांचा) प्रकाश त्यांच्यासमोर व त्याच्या उजव्या बाजूस धावत असेल. आणि ते म्हणतील, 'हे प्रभू ! आमच्यासाठी आमच्या या प्रकाशास सदैव तळपत ठेव. आणि आम्हाला क्षमा कर. खरोखर, तुला प्रत्येक गोष्टीवर पूर्ण नियंत्रण प्राप्त आहे.'

9 पैगंबर ! (अल्लाहचे शत्रू असलेल्या) सत्य नाकारणाऱ्या लोकांशी व दांभिक लोकांशी जिहाद करा. आणि त्यांच्याप्रति दयामाया दाखवू नका. त्यांचे अंतिम स्थान नरक आहे आणि ते खरोखर फार वाईट स्थान आहे.

अल्लाह सत्य नाकारणाऱ्या लोकांसाठी नूहची पत्नी व लूतची पत्नी यांचे उदाहरण सादर करीत आहे. ज्या आमच्या दोन सदाचारी भक्तांशी विवाहबद्ध होत्या. मग त्यांनी त्यांच्याशी (म्हणजे आपल्या पतींशी) विश्वासघात केला. त्यामुळे (न्यायाच्या दिवशी) अल्लाहच्या मर्जीच्या विरुद्ध , ते त्यांच्या कोणत्याही प्रकारे कामी येऊ शकणार नाहीत. आणि त्या दोघींना सांगितले जाईल, ' नरकाच्या आगीत प्रवेश करा, इतर प्रवेश करणाऱ्यांबरोबर.'

11 आणि इमान धारण केलेल्या लोकांसाठी अल्लाह फिरऔनच्या पत्नीचे उदाहरण समोर ठेवत आहे. तिने (अल्लाहशी प्रार्थना केली) म्हणाली, ' हे प्रभू ! माझ्यासाठी स्वर्गात तुझ्या सान्निध्यात एक घर बनव, आणि मला फिरऔन व त्याच्या कुकृत्यांपासून वाचव  आणि मला अत्याचारी लोकांपासून मुक्ती दे.' असेच      (दुसरे उदाहरण) इमरानची मुलगी मरियम  हिचे आहे, जिने आपले शील सुरक्षित ठेवले. मग आम्ही तिच्यात आमचा आत्मा फुंकला. आणि तिने आपल्या पालनकर्त्याच्या वचनांचे व त्याच्या ग्रंथाचे (पूर्ण) समर्थन केले. आणि ती आज्ञाधारक (भक्तांपैकी) होती.
________________________________
अब्दुर रहमान चाऊस,नांदेड  यांचे भाषांतर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लुकमान यांचा सत्य वृत्तांत....

लुकमान यांचा सत्य वृत्तांत.... *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  12 आम्ही लुकमान यास विवेक प्रदान केले होते. व त्यास असे सांगितले होते की, अल्लाहप्रति नेहमी कृतज्ञ राहा. जो कोणी (अल्लाहप्रति) कृतज्ञ राहील तर त्यात त्याचेच भले आहे. तसेच जो कोणी कृतघ्नतेचे प्रदर्शन करील तर अल्लाह स्वयंपूर्ण आहे (त्याला भक्तांच्या आभाराची गरज नाही), तोच आहे सदा स्तुतीस पात्र ! 13 लुकमान (जो एक विवेकशील माणूस होता एकदा) आपल्या मुलास उपदेश करताना म्हणाला, 'हे माझ्या मुलं ! कोणालाही (कधीही) अल्लाहचे समकक्ष ठरवू नकोस. कारण कोणालाही अल्लाहच्या ईश्वरत्वामध्ये सहभागी ठरविणे, फार मोठे अत्याचारी कृत्य आहे.'  14 (अल्लाह म्हणतो) 'आम्ही मानवाला त्याच्या आईवडलांच्या बाबतीत (भली वागणूक करण्याची) ताकीद दिली.' त्याच्या आईने त्याला दुःखावर दुःख सहन करून त्याला आपल्या पोटात ठेवले. मग दोन वर्षांपर्यंत तो पूर्णपणे तिच्यावर अवलंबून राहिला (म्हणजे दोन वर्षांपर्यंत ती त्याला अंगावर दूध पाजवीत राहिली). (आम्ही म्हणालो की, तू माझ्या आणि आपल्या आईवडिलांप्रति आभार व्यक्त क...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noha यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noah(नोहा) यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...  59  आम्ही नूह (अ.) ला त्याच्या लोकसमूहाकडे पाठविले त्याने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवांनो! अल्लाहची भक्ती करा, त्याच्याव्यतिरिक्त तुमचा कोणीही ईश्वर नाही. मला तुमच्याबाबतीत एका भयंकर दिवसाच्या प्रकोपाचे भय वाटते.’’ 60  त्याच्या जनसमूहातील सरदारांनी उत्तर दिले, ’’आम्ही तर असे पहतो की तुम्ही उघड पथभ्रष्टतेत अडकले आहात.’’ 61  नूह (अ.) ने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवानो! मी कोणत्याच पथभ्रष्टतेत पडलेलो नाही, उलट मी सर्व जगांच्या पालनकर्त्याचा प्रेषित आहे. 62  मी तुम्हाला आपल्या पालनकर्त्याचे संदेश पोहोचवितो व मी तुमचा हितचिंतक आहे आणि मला अल्लाहकडून ते सर्वकाही माहीत आहे जे तुम्हाला माहीत नाही. 63  काय तुम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की तुमच्यापाशी खुद्द तुमच्याच जातीबांधवांपैकी एका माणसाद्वारे तुमच्या पालनकर्त्याकडून स्मरण आले, जेणेकरून तुम्हाला सावध करावे आणि तुम्ही दुर्वर्तनापासून वाचावे आणि तुम्हावर कृपा केली जावी?’...

67 अल - मुल्क Dominion (The sovereignty)

67 अल - मुल्क Dominion(The sovereignty) *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1 असीम समृद्ध आहे तो, ज्याच्या हाती समस्त विश्वाची (ची) सत्ता आहे. प्रत्येक वस्तुमात्रावर त्याचेच नियंत्रण आहे. 2 त्यानेच तुमची कसोटी पाहण्यासाठी जीवन व मृत्यू निर्माण केले. तुमच्यापैकी कोण चांगली कामे करतो, (हे त्याला पाहायचे आहे). तो सर्वशक्तिमान (असूनही) फार क्षमाशील आहे. 3 ज्याने एकावर एक असे सात आकाश निर्माण  केले. कृपावंत (अल्लाहच्या) निर्मितीमध्ये तुम्हाला कोणताही दोष असल्याचे आढळून येणार नाही. (एकदा पाहिल्याने दोष न आढळल्यास) पुन्हा एकदा पाहा, की , तुम्हाला आढळतो का कुठे काही दोष ? 4 मग आणखी पुन्हा - पुन्हा पाहा, (प्रत्येक वेळेस) तुमच्या (दोष शोधणाऱ्या) नजरा थकून व निराश होऊन तुमच्याकडे परततील (पण अल्लाहच्या निर्मितीमध्ये दोष कुठेही आढळणार नाही). 5 आणि आम्ही पृथ्वीसाठी सर्वात जवळ असलेल्या आकाशाला दिव्यांनी सजवलेले आहे. आणि (वाईट हेतूने आपल्या मर्यादा ओलांडणाऱ्या) सैतानांना पिटाळून लावण्याचे त्यांना साधन बनविले आहे.आणि त्यांच्यासाठी धगधगत्या आगीची (भयंकर) शिक्षा तयार आहे. 6  ज...