2 लोकांना असे वाटते कि काय? त्यांच्या केवळ (तोंडाने) इतके बोलण्यावर त्यांना सोडून दिले जाईल कि, 'आम्ही श्रद्धा धारण केली आहे.' आणि त्यांना आजमावून पहिले जाणार नाही? 3 आम्ही त्या लोकांनाही आजमावून पहिले होते, जे यांच्यापूर्वी होऊन गेले. निश्चितच अल्लाह त्या लोकांना चिन्हांकित करून त्यांची निवड करेल, ज्यांनी स्वतःला सत्यवचनी सिद्ध केले असेल. तसेच तो असत्यावर (आधारित जीवन जगलेल्यांनाही) चिन्हांकित करून बाजूला काढेल.
[कुरआन 29:2-3]
=============================================
214 तुम्हाला असे वाटते की काय, कुठल्याही कष्टमय परिस्थितीतून गेल्याशिवाय तुम्ही स्वर्गात प्रवेशास असेच पात्र ठराल? पण तुमच्यावर त्या श्रद्धावंतांप्रमाणे कष्टमय परिस्थिती आलीच नाही जे तुमच्या आधी होऊन गेले. त्यांच्यावर संकट आणि दुःखाचे प्रसंग आले, ज्यामुळे ते इतके हादरले की, पैगंबर आणि त्याच्याबरोबर असलेल्या श्रद्धावंतांच्या तोंडून असे शब्द बाहेर पडले, 'अल्लाहकडून साहाय्य येईल तरी केव्हा?' निःसंशय अल्लाहचे साहाय्य अगदी जवळ आहे.
[कुरआन 2:214]
=============================================
199 (पैगंबर!) (तुम्ही त्यांच्याशी) क्षमाशीलतापूर्वक व्यवहार करा, आणि भले कृत्य करण्याची ताकीद द्या, आणि अशा लोकांपासून दूर राहा, ज्यांनी स्वतःला अज्ञानी ठेवणेच पसंत केले.
200 आणि जर सैतानी विचाराने तुमचे मन विचलित केले तर अल्लाहकडे शरण मागा, निश्चितच तो सर्व काही ऐकणारा आणि सर्व काही जाणणारा आहे.
201 आणि जे लोक अल्लाहच्या उपस्थितीची जाण ठेवणारे आहेत, त्यांना जेव्हा सैतानी विचारांचा स्पर्श होतो तेव्हा ते ताबडतोब सतर्क होतात आणि लगेच त्यांचे डोळे उघडतात.
=========================================
159 पैगंबर ! ही तर अल्लाहचीच कृपा आहे की, तुम्ही त्यांच्याप्रति मृदू स्वभाव असलेले आहात, आणि तुम्ही जर उग्र स्वभावाचे आणि कठोर मनाचे असता, तर ते लोक निश्चितच तुम्हाला सोडून निघून गेले असते. (पैगंबर!) त्यांना (तुम्ही) क्षमा करा आणि (अल्लाहकडे) त्यांच्यासाठी क्षमेची याचना करा आणि (महत्त्वाच्या प्रश्नांवर) त्यांच्याशी सल्लामसलत करा. मग जेव्हा (एखाद्या कृती योजनेविषयी) निर्णय घ्याल तर अल्लाहवर (दृढ ) विश्वास ठेवा. आणि ते लोक अल्लाहला प्रिय आहेत , जे त्याच्यावर विश्वास ठेवतात. 160 आणि जर अल्लाहने तुम्हाला मदत केली तर कोणीही तुम्हाला मात देऊ शकत नाही, पण जर त्याने तुमच्याकडून त्याची मदत काढून घेतली, तर त्याच्याशिवाय दुसरा कोण आहे जो तुम्हाला मदत करू शकतो? म्हणून विश्वास ठेवणाऱ्यांनी अल्लाहवरच विश्वास ठेवायला पाहिजे.
161 कोणताही पैगंबर असे करणे शक्य नाही की, तो (अल्लाहच्या संदेशांपैकी) काही भाग लपवून ठेवेल, आणि जो कोणी लपवून ठेवण्याचे असे कृत्य करेल, तो त्या लपविलेल्या गोष्टीला पुनरुत्थानाच्या दिवशी आपल्या बरोबर घेऊन येईल. मग प्रत्येकाला, त्याने कर्मरूपी जी कमाई केली असेल, तिचा पुरेपूर मोबदला दिला जाईल, आणि कोणावरही अन्याय केला जाणार नाही. 162 अल्लाहच्या मर्जीनुसार जीवन व्यतीत करणारा माणूस, त्या माणसासारखा कसा होऊ शकतो, ज्याने स्वतःवर अल्लाहचा राग ओढवून घेतला? त्याचे ठिकाण तर नरकात आहे. किती भयावह ठिकाण आहे ते! 163 अल्लाहच्या दृष्टीत त्यांचे (पूर्णपणे) वेगवेगळे दर्जे आहेत, आणि अल्लाह ते सर्व पाहत आहे जे काही ते करीत आहेत.
====================================
[3: 159-163]
टिप्पण्या