मुख्य सामग्रीवर वगळा

83 अल - मुतफफिफिन

83 अल - मुतफफिफिन  

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 

1 नाश पावणार आहेत ते, जे कमी माप देतात. 2 जे स्वतःसाठी घेताना पुरेपूर माप घेतात. 3 पण इतरांना मापून किंवा वजन करून देतांना कमी देतात. 4 अशा लोकांना या गोष्टीची जाणीव नाही का की, त्यांना उठवून उभे केले जाणार आहे? 5 (जाब देण्यासाठी) एका भयंकर दिवशी. 6 ज्या दिवशी संपूर्ण मानवजात, सर्वांचा मालक असलेल्या (अल्लाहसमोर) उभी राहील? 7 खरोखर, दुष्ट लोकांच्या कृत्यांचा रेकॉर्ड सिज्जीनमध्ये असेल. 8 आणि तुम्हाला काय माहीत, 'सिज्जीन ' काय आहे? 9 ते लिहून ठेवलेले महारेकॉर्ड आहे. 10 सत्य नाकारणारे नाश पावणार आहेत, त्या दिवशी. 11 जे न्यायाच्या दिवसाला खोटे ठरवितात. 12 त्यास तोच ठरवितो जो मर्यादांचे उल्लंघन करणारा पापी आहे. 13 जेव्हा त्याला आमचे संदेश ऐकविले जातात, तेव्हा तो म्हणतो, 'या केवळ आधीच्या लोकांच्या कहाण्या आहेत.' 14 नव्हे ! वस्तुस्थिती ही आहे की, त्यांच्या दुष्कृत्यांचा, त्यांच्या हृदयावर गंज चढलेला आहे. 15 निश्चितपणे ! त्या दिवशी त्यांना त्यांच्या पालनकर्त्यापासून दूर ठेवले जाईल (ते पालनकर्त्याला पाहू शकणार नाहीत). 16 मग ते नरकाच्या आगीत प्रवेश करतील. 17 आणि त्यांना सांगितले जाईल, 'हाच तो (नरक) आहे, ज्यास तुम्ही खोटे ठरवीत होता.'

18 पण सदाचारी लोकांचा रेकॉर्ड इल्लिय्यीनमध्ये सुरक्षित ठेवलेला आहे. 19 आणि इल्लिय्यीन म्हणजे काय? हे तुम्हाला कसे कळणार? 20 तो एक महारेकॉर्ड आहे. 21 तो रेकॉर्ड अल्लाहच्या सर्वात नजीक असलेल्या स्वर्गदूतांच्या निगराणीत आहे. 22 निःसंदेह, सदाचारी लोक सर्वसुखसंपन्न (अशा स्वर्गात) असतील. 23 (शाही) आसनांवर बसून (अल्लाहच्या सामर्थ्याच्या सर्वत्र झळकत असलेल्या खुणा) पाहत असतील. 24 त्यांच्या चेहऱ्यांवर (खऱ्या अर्थाने) प्रसन्नता असल्याचे तुम्हाला जाणवेल. 25 त्यांना सीलबंद शुध्द् मद्यार्क पिण्यासाठी दिले जाईल. 26 ज्याच्या सील मधून कस्तुरीचे सुगंध येत असेल, या त्या गोष्टी आहेत ज्याची इच्छुकांनी इच्छा बाळगायला हवी. 27 आणि त्या पेयात तसनीमचे मिश्रण असेल. 28 (तसनीम  हा स्वर्गातील) एक असा झरा ज्यातून अल्लाहचे सान्निध्य लाभलेले लोक पितील. 29 जे लोक अपराधी होते, ते श्रद्धावंतांची खिल्ली उडवायचे. 30 आणि त्यांच्या जवळून जाताना ते एक-दुसऱ्याकडे पाहून डोळे मिचकावीत असत. 31 आणि जेव्हा ते आपल्या लोकांकडे परत येत, तेव्हा ते (त्या ईशभिरु लोकांविषयी ) मस्करी करीत परत येत असत. 32 आणि जेव्हा ते त्यांना पाहत असत, तेव्हा ते तिरस्काराने असे म्हणायचे, 'हे वाट चुकलेले लोक आहेत.' 33 वास्तविक पाहता, यांना श्रद्धावंतांवर रखवालदार म्हणून पाठविण्यात आलेले नव्हते. 34 पण आज (न्यायाच्या दिवशी) श्रद्धावंत लोक त्या सत्य नाकारणाऱ्या लोकांवर हसतील. 35 शाही आसनांवर बसून (श्रद्धाहीनांची काय दशा झाली,) ते पाहत असतील. 36 (म्हणतील,) 'सत्य नाकारणाऱ्यांना त्यांच्या कृत्यांचा पुरेपूर बदला मिळाला ना !'

=============================================


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लुकमान यांचा सत्य वृत्तांत....

लुकमान यांचा सत्य वृत्तांत.... *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  12 आम्ही लुकमान यास विवेक प्रदान केले होते. व त्यास असे सांगितले होते की, अल्लाहप्रति नेहमी कृतज्ञ राहा. जो कोणी (अल्लाहप्रति) कृतज्ञ राहील तर त्यात त्याचेच भले आहे. तसेच जो कोणी कृतघ्नतेचे प्रदर्शन करील तर अल्लाह स्वयंपूर्ण आहे (त्याला भक्तांच्या आभाराची गरज नाही), तोच आहे सदा स्तुतीस पात्र ! 13 लुकमान (जो एक विवेकशील माणूस होता एकदा) आपल्या मुलास उपदेश करताना म्हणाला, 'हे माझ्या मुलं ! कोणालाही (कधीही) अल्लाहचे समकक्ष ठरवू नकोस. कारण कोणालाही अल्लाहच्या ईश्वरत्वामध्ये सहभागी ठरविणे, फार मोठे अत्याचारी कृत्य आहे.'  14 (अल्लाह म्हणतो) 'आम्ही मानवाला त्याच्या आईवडलांच्या बाबतीत (भली वागणूक करण्याची) ताकीद दिली.' त्याच्या आईने त्याला दुःखावर दुःख सहन करून त्याला आपल्या पोटात ठेवले. मग दोन वर्षांपर्यंत तो पूर्णपणे तिच्यावर अवलंबून राहिला (म्हणजे दोन वर्षांपर्यंत ती त्याला अंगावर दूध पाजवीत राहिली). (आम्ही म्हणालो की, तू माझ्या आणि आपल्या आईवडिलांप्रति आभार व्यक्त क...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noha यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noah(नोहा) यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...  59  आम्ही नूह (अ.) ला त्याच्या लोकसमूहाकडे पाठविले त्याने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवांनो! अल्लाहची भक्ती करा, त्याच्याव्यतिरिक्त तुमचा कोणीही ईश्वर नाही. मला तुमच्याबाबतीत एका भयंकर दिवसाच्या प्रकोपाचे भय वाटते.’’ 60  त्याच्या जनसमूहातील सरदारांनी उत्तर दिले, ’’आम्ही तर असे पहतो की तुम्ही उघड पथभ्रष्टतेत अडकले आहात.’’ 61  नूह (अ.) ने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवानो! मी कोणत्याच पथभ्रष्टतेत पडलेलो नाही, उलट मी सर्व जगांच्या पालनकर्त्याचा प्रेषित आहे. 62  मी तुम्हाला आपल्या पालनकर्त्याचे संदेश पोहोचवितो व मी तुमचा हितचिंतक आहे आणि मला अल्लाहकडून ते सर्वकाही माहीत आहे जे तुम्हाला माहीत नाही. 63  काय तुम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की तुमच्यापाशी खुद्द तुमच्याच जातीबांधवांपैकी एका माणसाद्वारे तुमच्या पालनकर्त्याकडून स्मरण आले, जेणेकरून तुम्हाला सावध करावे आणि तुम्ही दुर्वर्तनापासून वाचावे आणि तुम्हावर कृपा केली जावी?’...

67 अल - मुल्क Dominion (The sovereignty)

67 अल - मुल्क Dominion(The sovereignty) *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1 असीम समृद्ध आहे तो, ज्याच्या हाती समस्त विश्वाची (ची) सत्ता आहे. प्रत्येक वस्तुमात्रावर त्याचेच नियंत्रण आहे. 2 त्यानेच तुमची कसोटी पाहण्यासाठी जीवन व मृत्यू निर्माण केले. तुमच्यापैकी कोण चांगली कामे करतो, (हे त्याला पाहायचे आहे). तो सर्वशक्तिमान (असूनही) फार क्षमाशील आहे. 3 ज्याने एकावर एक असे सात आकाश निर्माण  केले. कृपावंत (अल्लाहच्या) निर्मितीमध्ये तुम्हाला कोणताही दोष असल्याचे आढळून येणार नाही. (एकदा पाहिल्याने दोष न आढळल्यास) पुन्हा एकदा पाहा, की , तुम्हाला आढळतो का कुठे काही दोष ? 4 मग आणखी पुन्हा - पुन्हा पाहा, (प्रत्येक वेळेस) तुमच्या (दोष शोधणाऱ्या) नजरा थकून व निराश होऊन तुमच्याकडे परततील (पण अल्लाहच्या निर्मितीमध्ये दोष कुठेही आढळणार नाही). 5 आणि आम्ही पृथ्वीसाठी सर्वात जवळ असलेल्या आकाशाला दिव्यांनी सजवलेले आहे. आणि (वाईट हेतूने आपल्या मर्यादा ओलांडणाऱ्या) सैतानांना पिटाळून लावण्याचे त्यांना साधन बनविले आहे.आणि त्यांच्यासाठी धगधगत्या आगीची (भयंकर) शिक्षा तयार आहे. 6  ज...