प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noah(नोहा) यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ... 59 आम्ही नूह (अ.) ला त्याच्या लोकसमूहाकडे पाठविले त्याने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवांनो! अल्लाहची भक्ती करा, त्याच्याव्यतिरिक्त तुमचा कोणीही ईश्वर नाही. मला तुमच्याबाबतीत एका भयंकर दिवसाच्या प्रकोपाचे भय वाटते.’’ 60 त्याच्या जनसमूहातील सरदारांनी उत्तर दिले, ’’आम्ही तर असे पहतो की तुम्ही उघड पथभ्रष्टतेत अडकले आहात.’’ 61 नूह (अ.) ने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवानो! मी कोणत्याच पथभ्रष्टतेत पडलेलो नाही, उलट मी सर्व जगांच्या पालनकर्त्याचा प्रेषित आहे. 62 मी तुम्हाला आपल्या पालनकर्त्याचे संदेश पोहोचवितो व मी तुमचा हितचिंतक आहे आणि मला अल्लाहकडून ते सर्वकाही माहीत आहे जे तुम्हाला माहीत नाही. 63 काय तुम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की तुमच्यापाशी खुद्द तुमच्याच जातीबांधवांपैकी एका माणसाद्वारे तुमच्या पालनकर्त्याकडून स्मरण आले, जेणेकरून तुम्हाला सावध करावे आणि तुम्ही दुर्वर्तनापासून वाचावे आणि तुम्हावर कृपा केली जावी?’...
85 अल - बुरुज आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1 नक्षत्रांचे वेगवेगळे समूह असलेल्या त्या आकाशाची शपथ. 2 वचन दिलेल्या (त्या पुनरुत्थानाच्या) दिवसाची शपथ. 3 साक्ष देणाऱ्याची आणि ज्याच्याविषयी साक्ष दिली जाते त्याची शपथ. 4 नाश पावले खंदकवाले. 5 जो (खंदक) इंधनाने भडकविलेल्या आगीने भरलेला होता. 6 ते त्याच्यापाशी बसलेले होते. 7 श्रद्धावंतांबरोबर जे (अत्याचार) केले जात होते, ते पाहण्यासाठी (तिथे बसलेले होते). 8 त्यांच्याशी त्यांचे शत्रुत्व केवळ यासाठी होते की, त्यांनी अल्लाहवर श्रद्धा धारण केली, जो सर्वशक्तिमान आहे, सर्व प्रकारच्या स्तुतीस पात्र आहे. 9 त्याचीच सत्ता आहे आकाशात आणि पृथ्वीवर आणि तो प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून आहे. 10 जे लोक श्रद्धावंत पुरुष व श्रद्धावंत स्त्रिया यांचा छळ करतात. आणि त्याबद्दल त्यांनी पश्चात्ताप केला नाही तर अशांना निश्चितपणे नरकात (विविध) शिक्षा भोगाव्या लागतील. (शिवाय) त्यांना जळण्याची शिक्षाही भोगावी लागेल. 11 पण जे लोक श्रद्धा धारण करून सत्कर्मे करतात, त्यांना मोबदल्यात अशा बागा प्रदान केले जातील, ज्यातून पाण्याचे (नयनरम्य...