69अल -हाक्का (The Sure Reality) *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1 ती अटळरित्या घडणारी घटका. 2 काय आहे ती अटळ घटका? 3 ती अटळ घटका काय आहे, हे तुम्हाला कशामुळे ज्ञात होईल? 4 समूद व आद या जमातींनी अचानकपणे आदळणाऱ्या आपत्तीला खोटे ठरविले होते. 5 समूद ही जमात एका भयंकर स्फोटाने नष्ट केली गेली. 6 आणि आद ही जमात देखील बेफाम अशा वादळाद्वारे नष्ट केली गेली. 7 त्याद्वारे अल्लाहने सात रात्री व आठ दिवस त्यांना अखंडपणे वेढून ठेवले. पाहणारा पाहू शकतो की, ते तिथे असे पालथे पडलेले आहेत की, जणू ते खजुरीच्या वृक्षाच्या खाली पडलेल्या फांद्या आहेत. 8 तुम्हाला आता त्यांचे कोणतेही अवशेष दिसतात का? 9 अशाचप्रकारे फिरऔनने आणि त्याच्या पूर्वीच्या लोकांनी, तसेच उलथवून टाकलेल्या वस्त्यांमधील लोकांनीही अपराधी कृत्ये केली होती. 10 त्यांनी आपल्या पालनकर्त्याकडून आलेल्या पैगंबराची अवज्ञा केली. परिणामी (शेवटी) अल्लाहने त्यांना कठोरपणे फैलावर घेतले. 11 (लोकांनो! जेव्हा नूहच्या काळात) जेव्हा पाण्याने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या, तेव्हा आम्हीच तरंगत्या नौकेत तुम्हाला (म्हणजेच ...
कुराण चे चॅप्टर्स 1-114